डोळ्यांखालची काळी वर्तुळे गायब करण्यासाठी वापरा नारळाचे तेल

तणाव, कमी झोप यांमुळे डोळ्याच्याखाली काळी वर्तुळे तयार होतात. या वर्तुळांमुळे व्यक्तीचा चेहरा सतत तणावग्रस्त आणि त्याचबरोबर अनाकर्षक दिसू लागतो. अ‍ॅलर्जी , डोळे चोळणं , पाण्याची कमतरता ,आनुवांशिकता ,व्यसन, जीवनसत्त्वांची कमतरता आणि पिगमेण्टेशनमुळेही डोळ्यांखाली काळी वर्तुळे निर्माण होतात. घरगुती उपाय करून वर्तुळे कमी करता येऊ शकतात. त्यापैकी एक घरगुती उपाय म्हणजे खोबरेल तेलाचा वापर करणे.

खोबरेल तेलाचा ‘असा’ करा वापर –

१) चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावा. त्यानंतर खोबरेल तेलाने डोळ्यांच्या भोवती हलक्या हाताने मालिश करा. हे तेल रात्रभर डोळ्यांच्या भोवती राहू द्यावे.

२) खोबरेल तेल आणि हळदीच्या मिश्रणानेही डोळ्याच्या भोवती लावा.

३) कच्ची हळदीच्या पेस्टमध्ये खोबरेल तेल घालून ही पेस्ट डोळ्यांच्या भोवती लावावी. ही पेस्ट डोळ्यांच्या भोवती लावून पंधरा मिनिटे राहू द्यावी. नंतर ओल्या कापसाने किंवा स्वच्छ, मऊ कपडा ओला करून घेऊन त्याने ही पेस्ट पुसून काढावी.

४) खोबरेल तेलामध्ये थोडेसे बेसन, लिंबाच्या रसाचे काही थेंब आणि मध घालून हे मिश्रण डोळ्यांच्या भोवती लावावे आणि हलक्या हाताने काही मिनिटे मालिश करावी. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करावा.

५) खोबरेल तेल आणि बदामाचे तेल सारख्या प्रमाणार घेऊन डोळ्यांच्या भोवती हलक्या हाताने मालिश करावी. हे तेल रात्रभर चेहऱ्यावर राहू द्या.

खोबरेल तेलामध्ये असलेले स्निध पदार्थ त्वचेला आर्द्रता प्रदान करून पोषण देणारे आहेत. अनेकदा डोळ्यांच्या भोवतीची त्वचा कोरडी पडून काळी वर्तुळे निर्माण होत असतात. खोबरेल तेलाच्या वापराने हा कोरडेपणा नाहीसा होऊन काळी वर्तुळे हे नाहीशी होण्यास मदत होते.

अशी बनवा पेस्ट – नारळाचे तेल तुम्ही काहीही मिक्स न करताही वापरू शकता. मात्र डोळ्यांखालील काळी वर्तुळे घालवण्यासाठी एका वाटीत एक चमचा नारळाचे तेल घ्या. यात एक किसलेले बदाम आणि अर्धा चमचा किसलेला बटाटा आणि एक चमचा दूध मिसळून पेस्ट बनवून घ्या. 

अशी लावा पेस्ट – आता ही पेस्ट डोळ्यांच्या चारही बाजूला बोटांच्या सहाय्याने लावा. या पेस्टने एक मिनिट मसाज करा. त्यानंतर हे मिश्रण बंद डोळ्यांवर लावून २० ते २५ मिनिटे ठेवून द्या. 

नारळाच्या तेलाचा अशा वापराने तुम्ही डोळ्यांच्या खालची वर्तुळे घालवू शकता. काळी वर्तुळे एकदा आल्यास ती लवकर जात नाही त्यामुळे त्यासाठी घरगुती उपचारच बेस्ट ठरतात. नारळाचे तेल बोटांना लावून हळूवारपणे डोळ्यांवर मसाज करा. रात्री झोपताना हे करा. आठवडाभर नियमितपणे हा उपचार केल्यास तुम्हाला स्वत:लाच फरक जाणवू लागेल. नारळाच्या तेलासोबत बदामाचे तेलही यावर फायदेशीर ठरते. बदामाच्या तेलामध्ये ई जीवनसत्व असते जे त्वचेसाठी फायदेशीर असते. 

Leave a Reply

Your email address will not be published.