पोटाची बेंबी झाली असेल काळसर, तर वापरा सोपा घरगुती उपाय… मुलींनी एकदा नक्की करून पहा…

नाभी अर्थात बेंबी हा आपल्या शरीराचा एक संवेदनशील भाग असतो. पण बरेचदा शरीराच्या इतर अवयवांच्या तुलनेत बेंबीची स्वच्छता करण्याकडे आपल्यापैकी काही जणांचं दुर्लक्षच होतं.

पण बेंबी रोज नीट स्वच्छ न केल्यास पटकन काळी पडते हे तुम्हाला माहीत आहे का. नाभीवर काळपटपणा पटकन येऊ लागतो आणि त्यामुळे तुम्हाला नक्कीच लाज वाटणार. त्यामुळे क्रॉप टॉप अथवा साडी नेसताना जर अशी काळसर बेंबी दिसली तर कोणाला आवडेल.

सुंदर आणि स्वच्छ नाभी अर्थात बेंबी नक्कीच लोकांचं लक्ष वेधून घेते. विशेषत साडी नेसल्यावर. तसं तर बेंबी स्वच्छ करण्यासाठी आणि काळेपणा दूर करण्यासाठी बाजारामध्ये अनेक उत्पादने आहेत. पण त्यापैकी बऱ्याच उत्पादनांमध्ये केमि कल्स असल्याने बेंबीला नुकसान पोहचण्याची शक्यता असते.

आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे काही सोपे घरगुती उपा य सांगणार आहोत ज्याचा उपयोग करून तुम्ही तुमची नाभी अधिक सुंदर आणि आकर्षक करू शकता.

हळद

बेंबीचा काळेपणा दूर करण्यासाठी हळद अतिशय फायदेशीर ठरते. हळद ही नैस र्गिक अँटि सेप्टिक असल्याने बेंबीसारख्या संवेद नशील भागावर त्याचा बिनधास्त उपयोग करता येतो.

तुम्हाला त्वरीत बेंबीचा काळेपणा दूर करायचा असेल तर अर्धा चमचा हळद घ्या. त्यामध्ये दुधाची साय अर्थात मलई, दूध आणि बेसन मिक्स करा आणि याची पेस्ट बनवा. ही पेस्ट तुम्ही बेंबीला लावा.

साधारण 10 मिनिट्स बेंबीवर ही पेस्ट सुकू द्या. त्यानंतर धुवा. दिवसातून दोन वेळा हा प्रयोग तुम्ही करू शकता. पटकन बेंबीचा काळेपणा निघून जाईल.

बेसन

बेसन त्वचेला स्वच्छ करण्यासह त्वचेवर असणारे काळे डाग काढण्यासाठीही उपयुक्त ठरते. याचा वापर करण्यासाठी तुम्ही एका बाऊलमध्ये बेसन,  मोहरीचे तेल आणि थोडेसे दूध असं मिश्रण एकत्र करा.

ही पेस्ट तयार झाली की साधारण अर्धा तास बेंंबीला लाऊन ठेवा.  त्यानंतर थंड पाण्याने हा भाग स्वच्छ करा. काही दिवस नियमित तुम्ही ही पेस्ट वापरल्यास, बेंबीवरील काळपटपणा दूर होऊन स्वच्छ झालेली दिसेल. बेंबीत साचलेला सर्व मळ निघून  जाण्यास बेसन मदत करते.

बे किंग सोडा

बे किंग सोड्याने तर भांड्यांवरीलही काळे डाग जातात तर त्वचा ही तर अत्यंत नाजूक गोष्ट आहे. बेकिंग सोडा अजिबातच हानि कारक नाही.

हा वापरण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा आणि दूध एकत्र करून त्याची पेस्ट तयार करा आणि बेंबीला काही वेळ लाऊन ठेवा. तुम्हाला हवं तर तुम्ही हाताच्या कोपऱ्याला अथवा गुडघ्यालादेखील याचा वापर करून घेऊ शकता. दिवसातून दोन  वेळा या पेस्टचा तुम्ही बेंबीवर प्रयोग केल्यास, काळेपणा दूर होईल आणि हाताच्या कोपऱ्याचाही काळेपणा दूर होण्यासाठी याची मदत होईल.

ऑ लि व्ह ऑईल

ऑ लि व्ह ऑईल हे त्वचेला नैसर्गिकरित्या उजळवते. ऑलिव्ह ऑईल हातावर घ्या  आणि साधारण 10 मिनिट्स तुम्ही बेंबीला लाऊन मालिश करा.

असं केल्याने काही दिवसातच तुम्हाला बेंबीवरील मळ जाऊन आणि काळेपणा जाऊन  त्वचा पुन्हा पहिल्यासारखी उजळलेली दिसेल. तसंच तुमची त्वचा चांगली मॉई स्चरा ईजही राहील.

चारोळी

चारोळी ही आपण नेहमी केवळ मसाला दूध अथवा लाडूमध्ये वापरताना पाहिली आहे. पण तुम्हाला त्वचेसाठीही याचा उपयोग करता येतो.

चारोळीमध्ये मध, लिंबू रस आणि गुलाबपाणी मिक्स करून पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट बेंबीला लावा.  नियमित याचा उपयोग करा आणि फरक पाहा. काळेपणा काहीच दिवसात निघून गेलेला दिसेल. तुम्ही याचाही वापर हाताच्या कोपऱ्यावर अथवा गुडघ्याला काळेपणा आला असेल तर करू शकता.

नारळाचे तेल

नारळाच्या तेलामध्ये अँ टि बॅ क्टे रि यल गुण असतात. 10 मिनिट्स नारळाच्या तेलाने तुम्ही नाभीला मा लिश करा आणि त्यानंतर कापसाच्या मदतीन बेंबीच्या आसपासची आणि आतील जागा स्वच्छ करा.

असं तुम्ही नियमित केल्यास, काही दिवसातच तुम्हाला बेंबी पुन्हा पहिल्यासारखी उजळलेली दिसेल आणि काळेपणाही दूर होईल. तसंच त्वचा अधिक मॉ ई स्च रा ईज राहील.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा.

अशाच माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published.