ओठ गुलाबी करायचेत? ‘या’ घरगुती उपायांनी तात्काळ गुलाबी होतील ओठ, जाणून घ्या

चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी करत असतो. चेहऱ्याचा महत्त्वाचा आणि आकर्षक भाग म्हणजे तुमचे ओठ. सुंदर ओठांसाठी तुम्हाला काही चांगल्या सवयी असायला हव्यात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजिबात धु म्रपान करू नये. दुसरं म्हणजे कमी कॉफी प्यावी. घरातून बाहेर पडताना चांगल्या दर्जाचं लिप बाम वापरणं अत्यंत गरजेचं आहे. इतकं करूनही जर तुमचे ओठ काळे पडत असतील तर त्यासाठी आम्ही तुम्हाला काळे ओठ गुलाबी होण्यासाठी उपाय सांगत आहोत. ज्यामुळे तुमचे ओठ पहिल्यासारखेच गुलाबी राहतील.ओठ लाल होण्यासाठी उपाय काय आहेत हे जाणून घेणं महत्त्वाचे आहे. ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी उपाय अनेक आहेत. खरं तर ओठ काळे का पडतात हे आधी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी उपाय आपण पाहूया आणि त्याआधी आपण जाणून घेऊया ओठ काळे का पडतात त्याची काही महत्त्वाची कारणे.

ओठ काळे पडण्याची कारणे

ओठ काळे का पडतात असा प्रश्न आपल्याला नेहमीच सतावतो. पण त्याचीही अनेक कारणे आहेत. ही कारणे काही नैसर्गिक आहेत तर काही आपण स्वतःहून ओढवून घेतलेली आहेत. त्यापैकी महत्त्वाचे कारण म्हणजे आपला उन्हात असलेला वावर. आपण बऱ्याचदा उन्हात फिरताना त्वचेची काळजी घेतो पण ओठांची घेत नाही. तसंच तुम्हाला काही अलर्जी असतील तर त्यामुळेही ओठ काळे पडतात. त्याशिवाय मुंबईसारख्या शहरांमध्ये असलेले प्रदूष णही ओठ काळे पडण्याला जबाबदार आहे. तुम्हाला ओठ गुलाबी राखून ठेवायचे असतील तर तुम्ही तुमचं कॉ फी पिण्याचं प्रमाणही कमी करायला हवे.  त्याशिवाय सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे महिलांनी ओठांवर सतत लिप स्टिक लावणे. लिप स्टिकमध्ये अनेक केमिक ल्स असतात आणि तुम्ही जास्त वेळ ओठांवर सतत लिप स्टिक लावून ठेवल्यास ओठांवर नैसर्गिक गुलाबी रंग निघून जातो आणि ओठांवरील काळे डाग वाढतात. आता आपण ओठ गुलाबी करण्यासाठी घरगुती उपाय कोणते आहेत ते पाहूया.

काळे ओठ गुलाबी करण्याचे उपाय

काळे ओठ पडल्यानंतर गुलाबी कसे करावे असा प्रश्न नेहमीच असतात. पण ओठ गुलाबी करण्यासाठी तुम्हाला घरगुती उपाय करता येतात. त्यासाठी तुम्हाला वेगळे काही प्रयोग करायची गरज नाही. आम्ही तुम्हाला इथे काही घरगुती उपाय सांगणार आहोत. तुम्ही नक्की याचा वापर करून पाहा.

बीट रूट ज्युस

कसा वापरावा – बीटचा रस काढून घ्यावा. तुम्ही नुसता रसही तुमच्या ओठांना लावून ओठांचा मसाज करू शकता अथवा तुम्ही त्यामध्ये मध घालूनही तुमच्या ओठांना लावल्यास त्याचा योग्य परिणाम तुम्हाला काही दिवसातच दिसून येईल. तुमचे ओठ गुलाबी करण्यासाठी बीटचा रस हा चांगला पर्याय आहे. नैसर्गिक ए क्स्फोलि एटर असल्याने काळ्या ओठांवर याचा चांगला परिणाम होतो.

कधी वापरावा – बीटाचा रस हा नैसर्गिक असल्याने तुम्ही कधीही वापरू शकता. पण तुम्हाला त्याचा योग्य परिणाम हवा असेल तर तुम्ही झोपण्याआधी तुमच्या ओठाला बीटाचा रस लावा आणि रात्रभर तुमच्या ओठांवर हा रस तसाच राहू द्या. सकाळी उठल्यानंतर तुम्ही ओठ स्वच्छ गार पाण्याने धुवा. तुम्हाला नैसर्गिक गुलाबी रंग ओठांना आलेला दिसून येईल.

ऑ लिव्ह ऑईल

कसा वापरावा – ऑ लिव्ह ऑईलचे 2-3 थेंब रोज ओठाला लावा. त्यामुळे तुमच्या ओठांचा काळेपणा कमी होईल आणि तुमच्या ओठांना हवा असणारा ओलावादेखील मिळेल.

कधी वापरावा – ऑ लिव्ह ऑईल हेदेखील एक नैसर्गिक तेल आहे. यामुळे तुमचे ओठ मऊ आणि मुलायम राहायला मदत मिळते. त्याशिवाय यातील गुणांमुळे ओठांवरील काळेपणा निघून जायला मदत मिळते. तुम्ही कधीही दिवसभरात हे तेल ओठाला लावू शकता.

लिंंबाचा रस

कसा वापरावा – लिंबाचा रस आपल्या केस आणि त्वचेसाठी एक महत्त्वाचा उपाय आहे. पण याचा परिणाम ओठांवरही खूपच चांगला होतो. लिंबाच्या रसाचे 2-3 थेंब ओठावर लाऊन मसाज करावा. त्याचा परिणाम लगेच दिसून येतो. ओठांवरील काळेपणा कमी होतो आणि ओठ मऊ मुलायम होतात.

कधी वापरावा – तुम्ही रात्री झोपताना लिंबाचा रस ओठांना लावून ठेवलात आणि साधारण अर्धा तासाने ओठ स्वच्छ केलेत तरीही याचा चांगला परिणाम होऊ शकतो. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रात्रभरही ठेवू शकता. पण याचा जास्त वापर करू नका.

केशर आणि दही

कसा वापरावा – तुमच्या स्वयंपाकघरामध्ये केशर असल्यास, त्याचे दोन ते तीन धागे दह्यात घाला. दह्यामध्ये 15-20 मिनिट्स केसर तसंच राहू द्या. ही पेस्ट मुलायमपणे तुमच्या ओठांना लावा आणि मग मसाज करा. त्वरीत याचा परिणाम तुम्हाला दिसेल.

कधी वापरावा – तुम्ही दिवसभरात कधीही या पेस्टचा वापर तुमच्या ओठांवर करू शकता. फक्त तुम्ही हे लावल्यानंतर कोणत्याही प्रकारे तणावात राहू नका. तुम्हाला याचा परिणाम लगेच मिळेल.

बटर

कसा वापरावा – बटर अर्थात मस्का वा लोण्याचा वापर हा ओठांचा नैसर्गिक रंग परत आणण्यासाठी करता येऊ शकतो. रोज सकाळ संध्याकाळ तुम्ही ओठांवर बटर लावा. घरी केलेलं लोणी असेल तर जास्तच चांगलं. यामुळे तुमचे ओठ खूपच सुंदर होतात.

कधी वापरावा – तुम्ही मस्का अथवा लोणी दिवसभरात कधीही वापरू शकता. तुमच्या घरात कायम हा पदार्थ असतो त्यामुळे तुम्ही काम करत असताना अथवा कुठेही जातानासुद्धा ओठांवर याचा वापर करू शकता.

बटाट्याचा रस

कसा वापरावा – ओठाचा काळेपणा दूर करण्यासाठी बटाटादेखील खूपच फायदेशीर आहे. बटाट्याचा रस काढून घ्या आणि रोज हा रस ओठाला लावा. रोज असं केल्यानंतर तुम्हाला स्वतःलाच याचा फरक जाणवेल. बटाटा हा शरीरावरील काळेपणा काढून टाकण्यासाठी उपयुक्त ठरतो. यातील ए क्सफो लिएट करणारे घटक अधिक फायदा करून देतात.

कधी वापरावा – कोणत्याही वेळी तुम्ही बटाट्याचा रस वापरू शकता.  फक्त रस काढून ठेवू नका. बटाट्याचा रस काढल्यानंतर तुम्ही त्वरीत त्याचा वापर तुमच्या ओठांवर करा. त्याचा परिणाम लवकरच तुम्हाला दिसून येईल.

तिळाचे तेल

कसा वापरावा – रात्री झोपण्यापूर्वी तिळ्याच्या तेलाचे काही थेंब तुम्ही तुमच्या ओठाला लावा. असं रोज करा. यामुळे तुमचे ओठ गुलाबी होण्यास मदत होते.

कधी वापरावा – रोज रात्री झोपण्यापूर्वी याचा वापर नक्की करा आणि तुम्हाला हवा तसा ओठांचा नैसर्गिक गुलाबी रंग तुम्ही मिळवू शकता.

गुलाबाच्या पाकळ्या

कसा वापरावा – गुलाबी गुलाबाच्या पाकळ्या घेऊन त्या दुधात घालाव्यात आणि त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट ओठावर लाऊन काही वेळ तशीच ठेवा. दूध तुमच्या ओठांचा काळेपणा दूर करण्यास मदत करतं. तर गुलाबाच्या पाकळ्यांमुळे तुमचे ओठ गुलाबी आणि आकर्षक दिसण्यास मदत होते.

कधी वापरावा – तुम्ही साधारण संध्याकाळी घरी आल्यानंतर याचा वापर केलात तरी चालेल. तुम्ही घरी असाल तर दुपारच्या वेळीही तुम्ही याचा वापर करू शकता.

डाळिंबाचे दाणे

कसा वापरावा – एक चमचा डाळिंबाचे दाणे वाटून घ्या. त्यामध्ये दोन चमचे दूध मिसळा. ही पेस्ट तुमच्या ओठांवर स्क्रब करा आणि काही वेळ स्क्रब करत राहा. यामुळे तुमच्या ओठांवरील डे ड स्किन दूर होईल आणि ओठांचा नैसर्गिक रंग परत यायला मदत होईल.

कधी  वापरावा – डाळिंबाच्या दाण्यात नैसर्गिकता असते. त्यामुळे तुम्ही कधीही कोणत्याही वेळी हे वापरू शकता. तुम्हाला डाळिंबाच्या दाण्याने कोणत्याही प्रकारची अ लर्जी अथवा त्रास होणार नाही.

कोथिंबीर

कसा वापरावा – कोथिंबीर आणि ओठ असा अर्थातच तुम्हाला प्रश्न पडेल. पण खरं आहे. कोथिंबीर आपल्या ओठांसाठी खूपच फायदेशीर आहे. रात्री झोपण्यापूर्वी ताज्या कोथिंबीरीची काही पानं ओठांवर चोळा आणि रात्रभर ते तसंच राहू द्या. सकाळी उठल्यानंतर तुम्हाला स्वतःला त्याचा फरक जाणवेल.

कधी वापरावा – रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही कोथिंबीरचा उपयोग तुमच्या ओठांसाठी करून घेतलात तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा मिळेल.

दूध आणि हळद

कसा वापरावा – एक चमचा दुधामध्ये अर्धा चमचा हळद मिक्स करून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट तुम्ही तुमच्या ओठांना लावा आणि पाच मिनिट्स तसंच राहू द्या. हळदीमध्ये असणाऱ्या अँ टिसे प्टिक गुणांमुळे ओठ गुलाबी होण्यासाठी मदत मिळते. हे मिश्रण सुकल्यानंतर ते स्क्रब करून काढा त्यानंतर गरम पाण्याने ओठ धुवा आणि मग त्यावर लिप बाम लावा.

कधी वापरावा – दिवसभरात तुम्ही कधीही हा प्रयोग करून पाहू शकता. तुम्हाला त्यासाठी केवळ दहा मिनिट्स तुमच्या रोजच्या आयुष्यातून काढायची आहेत.

पुदीना आणि लिंबू

कसा वापरावा – साधारण 5-6 पुदीन्याची पानं क्रश करून घ्या. त्यामध्ये अर्ध्या लिंंबाचा रस पिळा.  त्यामध्ये थेंबभर मध मिसळा आणि ही पेस्ट तुम्ही ओठांवर लावा.

कधी वापरावा – दिवसभरात कधीही तुम्ही हा प्रयोग करू शकता. तुम्हाला याचा नक्कीच काळे ओठ गुलाबी करण्यासाठी फायदा मिळेल.

तुमच्या ओठांना ए क्सफो लिएट कसे कराल.

ओठांची काळजी घेण्यासाठी ओठ ए क्सफो लिएट करणेही गरजेचे आहे. तुम्हाला जर नैसर्गिक ओठ गुलाबी हवे असतील तर त्यासाठी ए क्सफो लिएट करायचं म्हणजे नक्की काय करायचं ते आपण बघूया.

रात्री ओठांना हा यड्रे ट ठेवा.

सकाळी जेव्हा तुम्ही जागे होता तेव्हा तुम्हाला तुमचे ओठ कोरडे झाले आहेत असं नक्कीच जाणवत  असेल. ओठांचा हा कोरडेपपणा कमी करण्यासाठी झोपताना ओठांवर हा यड्रे टिंग क्रीम लावून झोपण्याची सवय लावा. ए.सी.मध्ये झोपल्यामुळे तुमचे ओठ कोरडे पडतात पण जर तुम्ही पे ट्रोलि यम जेली अथवा तूप ओठांवर लावलं तर तुमचे ओठ सुकणार नाहीत.

ओठांना मसाज करा.

ओठांना मॉ श्चराई झिं गची गरज अधिक असते. कारण आधीच सांगितल्याप्रमाणे तुमच्या ओठांची त्वचा इतर त्वचेपेक्षा अधिक नाजूक असते. यासाठी दररोज तुमच्या ओठांवर पाच मिनीटे तेलाने मसाज करा. यासाठी तुम्ही नारळाचे तेल, ऑ लिव्ह ऑईल, बदामाचे तेल वापरू शकता. चांगला परिणाम साधण्यासाठी रोज ओठांना तेल लावा. ओठांवर तेलाने मसाज केल्यामुळे रक्ता भिस रण सुधारते आणि ओठांचे आरोग्य वाढते. 

ओठांना स्क्रब करा.

लिप केअर मधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्क्रबिंग. कारण स्क्रब केल्यामुळे तुमच्या ओठांवरील डे डस्कीन निघून जाते. ज्यामुळे ओठांची त्वचा स्वच्छ आणि निरोगी होते. ओठांना वारंवार इनफे क्शन होत नाही. यासाठी तुम्ही एखादं सौम्य स्क्रब ओठांवर लावा. शिवाय तुम्ही तुमच्या ओठांची काळजी घेण्यासाठी मध, साखरेचा वापर करून घरच्या घरीदेखील एखादं स्क्रब तयार करू शकता.

लिप बाम नेहमी तुमच्या बॅगेत ठेवण्याची सवय लावा.

आजकाल वातावरणात सतत बदल होत असतात. कोणत्याही ऋतूमध्ये वातावरण बदलत असते. यासाठीच तुमच्या बॅगेत लिप बाम ठेवण्याची सवयच लावा. कधी कधी कडक उन्हातून ए.सी. मध्ये गेल्यामुळे अथवा ए.सी. मधून उन्हात गेल्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. यासाठीच लिप बाम बॅगेत ठेवण्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

माहिती आवडली असेल तर शेयर करा आणि आमचं पेज लाइक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.