कच्च्या दुधात मिसळा ‘हे’ दोन पदार्थ आणि नियमित करा वापर… त्वचा होईल सुंदर आणि तजेलदार…

कच्चं दूध हे आपल्या आरो ग्यासाठी फायदेशीर समजले जाते. तसंच तर कच्च्या दुधाचे बरेच फायदे आहेत. मात्र, आपली त्वचा अधिक तजेलदार करण्यासाठी कच्चे दूध अधिक फायदेशीर ठरते.

कच्चे दूध हे चेहऱ्याची नैसर्गिक चमक तशीच राखण्यास मदत करते. कच्च्या दुधात आढळणारे तत्व त्वचा अधिक तजेलदार बनविण्यासाठी अधिक फायदेशीर ठरते. तसंच चेहऱ्यावर डाग, सुरकुत्या काढण्यासाठी आणि त्वचा अधिक तरूण दिसण्यासाठी कच्चे दूध खूपच फायदेशीर ठरते.

तुम्हालाही  मुलायम आणि डागविरहित त्वचा हवी असेल तर तुम्ही तुमच्या त्वचेसाठी कच्च्या दुधाचा वापर करू शकता. कच्च्या दुधाचा तुम्ही वापर तर कराच. पण त्याचबरोबर तुम्हाला नेहमी त्वचा तजेलदार हवी असेल तर तुम्ही कच्च्या दुधामध्ये अधिक दोन पदार्थांचा वापर करू शकता.

त्याबद्दलच आपण या लेखातून पाहणार आहोत. तुम्हाला जर डागविरहित त्वचा हवी असेल तर कच्चं दूध हा नैसर्गिक उपाय आहे. यामध्ये अँ टिए जिंग गुण आढळतात.

कच्चे दूध कसे आहे त्वचेसाठी फायदेशीर

कच्च्या दुधाचे त्वचेसाठी काही महत्त्वाचे फायदे आहेत ते नक्की काय आहेत ते पाहूया. त्याशिवाय कच्च्या दुधात दोन पदार्थ तुम्ही वापरलेत तर तुमच्या त्वचेसाठी अधिक फायदा होतो.

त्वचा चमकदार होण्यासाठी.

त्वचेला करते नैसर्गिकरित्या मॉईस्चराईज्ड.

मुरूमांपासून करते बचाव.

त्वचा अधिक मऊ आणि मुलायम बनवते.

त्वचेवरून डाग आणि मुरूमं दूर करून त्वचा अधिक तजेलदार बनवते.

त्वचेच्या समस्यांसाठी अधिक फायदेशीर.

कच्च्या दुधात मिसळा हे दोन पदार्थ आणि मिळवा अधिक तजेलदार त्वचा

पपई आणि कच्चे दूध

दुधामध्ये पपई मिक्स  करून त्वचेला नियमित लावल्यास त्वचा अधिक निरो गी आणि तजेलदार होते. पपईमध्ये  एका प्रकारचे एं जाईम असते, जे डे ड स्किन काढून टाकून चेहऱ्यावरील डाग दूर करण्यास फायदेशीर ठरते.

चेहऱ्यावर सुरकुत्या, डाग असतील तर पपईचा गर काढून त्यात कच्चे दूध नीट मिक्स करा आणि व्यवस्थित फेटून घ्या. ही पे स्ट तुम्ही चेहऱ्याला लावा आणि साधारण 10 मिनिट्स तुम्ही चेहऱ्यावर तशीच राहू द्या.

जेव्हा ही पेस्ट सुकेल तेव्हा चेहरा थंड पाण्याने धुवा. त्वचेची सम स्या असेल आणि ज्यांना चेहऱ्यावर अधिक सुरकुत्या येत असतील त्यांनी पपई आणि कच्च्या दुधाचे हे  मिश्रण नियमित वापरायला हवे.

कच्च्या दुधामध्ये अँ टिए जिंग तत्व असल्याने सुरकुत्या असणाऱ्यांना याचा फायदा मिळतो आणि त्चचा अधिक तरूण दिसू लागते. तसंच त्वचा अधिक तजेलदार दिसते आणि सुरकुत्या निघून जाण्यासही मदत मिळते.

मध आणि कच्चे दूध

मध आणि कच्चे दूध हे केवळ आरो ग्यासाठीच नाही तर तुमच्या त्वचेसाठीही अत्यंत उपयुक्त ठरते. या दोन्हीचे मिश्रण त्वचेवर साचलेली धूळ, घाण स्वच्छ करण्यासाठी उपयोगी ठरते.

कच्च्या दुधामध्ये तुम्ही एक लहान चमचा मध मिक्स करा आणि हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. साधारण 10-15 मिनिट्स तसंच ठेवा. नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा आणि असे नियमित केल्यास, तुम्हाला स्वतःला त्याचा योग्य परिणाम दिसून येईल.

मध आणि कच्च्या दुधाचे हे मिश्रण तुमचा चेहरा अधिक मऊ आणि मुलायम बनवून तुमची त्वचा अधिक चमकदार आणि तजेलदार नैसर्गिकरित्या राखण्यास मदत करते.

माहिती आवडली असेल तर मित्र मैत्रिणींसोबत शेयर करा.

अशाच माहितीपूर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published.