या ७ गोष्टी कधीही एकत्र खाऊ नका, शरीरावर होऊ शकतो वाईट परिणाम


योग्यआहार – विहार केल्याने आपणदीर्घकाळआरोग्यटिकवून ठेवू शकतो, हे प्राचीनभारतीयलोकजाणून होते. त्यांनी आपल्याला आयुर्वेदिकशास्त्रातून काही नियमघालून दिले आहेत. ते जरदैनंदिनआयुष्यात पाळले तर, छोट्या छोट्या तक्रारी म्हणजे केस गळणे, थकवा, त्वचेवरडाग, फोड येणे, आळस, पोटकायम बिघडणे, ऍसिडिटी, डोकेदुखी, अंगदुखी अश्या तक्रारी हद्दपारहोतील. सगळं खाऊनही वजन न वाढणे किंवा कमी खाऊनही सततवजन वाढणे ह्याचा अर्थ, कदाचित तुम्ही विरुद्धअन्नखातअसाल.

प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार सगळ्या पदार्थांचा परिणामशरीरावर वेगवेगळा होत असतो, त्यामुळे एखाद्याला झालेला त्रास आपल्याला होत नाही आणि आपल्याला झालेला त्राससगळ्यांनाचहोईल असे नाही. तरी सुद्धा जे अन्न आयुर्वेदाने विरूद्ध-अन्न सांगितले आहे, ते कोणीही एकत्रखाऊ नये. त्याचे दुष्परिणामकळत – नकळत प्रत्येकाला भोगावे लागतात. पाहूया कि कोणते खाद्यपदार्थविरुद्धान्नआहेत आणि ते एकत्र खाणे का टाळावे

१) दूध :दुधात जे प्रोटीन असते ते प्राणिजन्य प्रथिने असतात. त्याबरोबर असे काही पदार्थ खाणे टाळावे ज्यामुळे त्वचेचे विकार आणि पोटाचे आजारहोतात. दुधाबरोबर कधीही अंडे, मांस – मच्छी, कांदा, केळ, नमकीनफरसाण, आंबट फळे (लिंबू वर्गीय), मुळा, फणस, वांगी असे कोणतेही पदार्थ खाल्ल्याने ते एकमेकांना बिलकुल पचू देतनाहीत, दोघांनाही पचायला लागणारा वेळ वेगवेगळा असतो.
कांदा+दूध = त्वचारोग.
आंबट फळे+दूध = पोटाचे विकार.

२) दही :दुधाप्रमाणेचदह्याबरोबर सुद्धा फळे खाऊनयेत, त्याने कफाचा उद्रेक होतो, कफफुफ्फुसातजाऊन बसतो आणि infection चा धोका वाढतो. दही आणि उडीदएकत्र खाणे खुपघातक आहे, त्याने अचानकरक्तदाब वाढतो, हृदयविकारहोतात. त्यामुळे दहिवडे खाणे आरोग्याला अतिशयघातक आहे.

३) बीयर, कोल्ड्रिंक्स : इत्यादी बरोबरनमकीन शेंगदाणे खूपलोकखातअसतात, पण ही सवय तुम्हाला महागात पडू शकते, कारणबीयर, कोल्ड्रिंक्सपिल्यानंतरशरीरात पाण्याचे प्रमाण कमी होते, (dehydration) आणि त्यातचअजूनखारटपदार्थ खाल्ले तरशरीरातीलसोडियम झपाट्याने वाढते आणि पाणी पातळी अजूनचघटत जाते, ह्यामुळे चक्कर येणे, जीव घाबरणे, उलट्या होणे, घाम येणे अशी लक्षणं दिसूनयेतात.

४) तूप :सगळ्यातपौष्टिक समजले जाणारे तूप एरव्ही वरदान आहे, पणतूप हे तांब्याच्या भांड्यात कधीही ठेवू नये, त्यामुळे तूप विषारी होते, तसेचतूप आणि मधसमप्रमाणातघेतल्यासविषतयार होते.

५) टमाटे+काकडी आणि गाजर+लिंबू : टमाटे व काकडीची एकत्रकोशिंबीर करणे काही शहाणपणाचे नाही, त्यामुळे पोट फुगते प्रचंडगॅसेसतयारहोतात. गाजर आणि लिंबू एकत्र केल्याने छातीतजळजळ आणि मूत्रविकारहोतात.

६) जेवणामध्ये किंवा नंतरलगेचअतिथंड किंवा अति गरमपेयघेऊ नये, यामध्ये, आईसक्रीम, कोल्ड्रिंक्स, चहा, कॉफी ह्याचा समावेश होतो.

७) मांसाहार करणारे लोकजास्त आजारी पडतात असे निदर्शनास आले आहे, पण त्याचे कारण, मांसाहार करताना त्यासोबतविरुद्वअन्न खाणे हे आहे. मांसाहार करताना बरोबरदूध, दही, चीझ, मोड आलेले पदार्थ, बटाटा, स्टार्च इत्यादी टाळावे, तसेच मांसाहारी पदार्थ तिळाच्या तेलात बनवू नये. नॉनव्हेजबर्गरबरोबरफ्रेंचफ्राईज हे घातक ठरते, पणफॅशनम्हणूनसर्रास ते खातांना आपण बघतो, ह्यामुळे शुगर, वजन वाढणे, गॅसेस ह्यांचे त्रास दुपटीने वाढतात.

वेगवेगळ्या हॉटेल, कॅफे, रेस्टॉरंटमध्ये सततविविध चवी देण्यासाठी, कशामध्ये काहीही एकत्रकरूननवीनडिशबनवतात. ह्यामुळे आपल्या जिभेचे भरपूरलाडहोतात, पणपोट आणि ईतरअनेक अवयवांना हे त्रास भोगावे लागतात. पुढच्या वेळी काही खातांना वरची लिस्टचेक करायला विसरू नका, कारणआरोग्य चांगले असेलतरच बाकीचे आनंदआयुष्यातआपण उपभोगू शकतो

Leave a Reply

Your email address will not be published.