संध्याकाळी 7 नंतर व्हायचं पुण्यात लॉकडाऊन, जाणून घ्या जोशी अभ्यंकर खटल्याबद्दल!

पुणे शहरात जेव्हा विश्व नावाच्या एका हॉटेलच्या मालकाचा मुलगा प्रकाश हेगडे अचानक दिसेनासा झाला तेव्हा शहरात खळबळ माजली. ही घटना सहा-सात महिने जुनी होते आहे न होते आहे, तोपर्यंत विजयनगर कॉलनीतल्या अच्युत जोशी, त्यांची पत्नी उषा जोशी आणि मुलगा आनंद जोशी यांची ह*त्या झाली. तिघांचेही खू*न नायलॉनच्या दोरीचा गळ्याभोवती फा*स आवळून करण्यात आले होते. त्यांच्या बंगल्यामध्ये सर्वत्र एक सुगंधी अत्तर शिंपडण्यात आले होते. पोलिसी कुत्र्यांनी (डॉग स्क्वाड) माग काढून नये हा एकच उद्देश या सुगंधी अत्तारापाठी असावा हे स्पष्ट होते.

या घटनेनंतर ३-४ महिने जातात न जातात तोच अभ्यंकर कुटुंबातील ५ जणांचा खू*न करण्यात आला. यामध्ये वयोवृद्ध काशिनाथशास्त्री अभ्यंकर, इंदिराबाई, नात, नातू आणि घरकाम करणाऱ्या सखुबाई यांचा समावेश होता. थोड्या दिवसाच्या अंतराने घडलेल्या या ८ खुनानंतर पूर्ण पुणे शहर भयग्रस्त झाले होते. संध्याकाळी ७-७.३० ला तुळशीबागेसारख्या गजबजलेल्या बाजारपेठा ओस पडायला लागल्या.

जोशी आणि अभ्यंकर या दरोड्यांच्या मधल्या काळात पुण्यातील बाफना कुटुंबावर असाच परंतु अयशस्वी दरोडा पडला होता. बाफनांचे कुटुंबीय आणि घरातील नोकर यांनी मिळून दरोडेखोरांना परतावून लावले होते

तत्कालीन सहाय्यक आयुक्त हुल्याळकर आणि इन्स्पेक्टर दमामे यांचे शोध चालू असतानाच मार्च १९७७ रोजी बंडगार्डन येथे नदीच्या एक प्रे*त तरंगताना आढळले. एका अज्ञात तरुणाला लोखंडी शिडीवर बांधून पाण्यात फेकले गेले होते. या तपासाची माहिती घेताना दमामे यांच्या लक्षात आले की ज्या दोरीने या तरुणाचे प्रे*त शिडीवर बांधण्यात आले होते त्या दोरीच्या गाठी आणि जोशी-अभ्यंकर यांच्या खु*नात बांधलेल्या गाठी एकसारख्या आहेत. एक तर्क निश्चित झाला की जोशी-अभ्यंकर आणि बंडगार्डनवर सापडलेलं प्रे*त या मागे एकच गुन्हेगार आहे. थोड्याच दिवसात हे प्रे*त अनिल गोखले नावाच्या एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे आहे अशी ओळख पटली.

हुल्याळकरांनी तपासकामाची दिशा बदलून पुन्हा एकदा सर्व कागदपत्रे आणि वर्तमानपत्राची कात्रणे वाचायचा सपाटा लावला. अशाच एका कात्रणात खु*नी कोण या प्रश्नाचे पहिले उत्तर त्यांना दिसायला लागले. हे कात्रण एका छोट्या स्थानिक वर्तमानपत्राचे होते. जेव्हा एकाही मोठ्या वर्तमानपत्रात घटनास्थळावरचे मृत व्यक्तीचे फोटो उपलब्ध नव्हते, तेव्हा या छोट्या वृत्तपत्रात मात्र लगेच दुसऱ्या दिवशी प्रे*ताचे फोटो छापले गेले होते. हे कसे शक्य आहे? . या फोटोचे क्रेडीट राजेंद्र जक्कल नावाच्या व्यक्तीचे होते. त्या वर्तमानपत्राच्या क्राईम रिपोर्टरला चौकशीसाठी बोलावण्यात आल्यानंतर त्याने चोळखण आळीतील एका फोटो स्टुडीओच्या मुलाने हे फोटो दिले असे सांगितले.अनिल गोखलेच्या केसचे पुढे काय झाले याची चौकशी ४-५ तरुण वारंवार करत आहेत. अशी माहिती त्यांना संबंधित पोलीस स्टेशनकडून मिळाली. या तरुणांपैकी एकाचे नाव होते राजेंद्र जक्कल !!

जक्कल हे नाव सलग दुसऱ्यांदा आल्यावर संशयित जक्कलला चौकशीला बोलावणे फार सोप्पे होते. पण यामुळे संशयित तपास कामाच्या भागातच सावध झाला असता. यासाठी त्या ४ तरुणांपैकी जो मानसिकदृष्ट्या कमकुवत वाटत होता अशा सतीश गोरेला पहिल्यांदा माणिकराव दमामे यांनी ताब्यात घेतले. अपेक्षेप्रमाणे तपासाच्या पहिल्या काही तासाच्या भडिमारातच गोरे पोपटासारखा बोलायला लागला. यानंतर जे सत्य पोलिसांच्या पुढे आले त्याने पुण्याचे पोलिसखाते हादरून गेले.

पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयातल्या ५ तरुणांना म्हणजे राजेंद्र जक्कल, दिलीप सुतार, शांताराम जगताप, मुनव्वर शाह, सुहास चांडक यांना अटक करण्यात आली. नायलॉनच्या दोरीच्या गाठींनी हे सर्व तरुण अनिल गोखलेच्या खु*नाशी जोडले गेले होतेच. पुढचे आव्हान त्याहून कठीण होते की या टोळीचा जोशी अभ्यंकर यांच्या खु*नाशी संबंध आहे हे सिद्ध करणे. पोलिसांकडे जे पुरावे होते ते परिस्थितीजन्य होते. या पुराव्यांच्या जोरावर या टोळीवर गुन्हा सिद्ध करणे केवळ अशक्य होते. याचा अर्थ असा नव्हे की परिस्थितीजन्य पुरावा दुबळा होता. पण साक्षीदारांची कमतरता या केसला कमजोर करत होती

काही दिवस पोलिसी तपासाच्या तव्यावर भाजून निघाल्यानंतर पाचपैकी एक सुहास चांडक लाही सारखा फुटायला लागला. माफीचा साक्षीदार म्हणून पोलिसांनी सुहास चांडकला अभय देण्याचे कबूल केल्यावर जोशी-अभ्यंकर-गोखले या सर्व खु*नासहित “विश्व”च्या मालकाच्या मुलाचा खू*नही यांनीच केल्याचं चांडकने कबूल केले. फरक इतकाच होता की बाकी सर्वांचे मृ*तदेह सापडले होते. हेगडेचा मृ*तदेह मात्र तोपर्यंत सापडला नव्हता. चांडकने दिलेल्या माहितीवरून सारसबागेतल्या एका तळ्यात ड्रममध्ये बंद असलेले हेगडेचे प्रे*त पण बाहेर काढण्यात आले. यानंतर घटनाक्रम निश्चित करून इतर साक्षीदार गोळा करण्याचे काम पोलिसांनी सुरु केले. एकूण १२६ साक्षीदार उभे केल्यानंतर पोलिसांना आणखी एका अयशस्वी दरोड्याची माहिती मिळाली. कोल्हापूरमधील एक श्रीमंत व्यापारी श्री काशीद यांच्या पेढीवर हे सर्वजण भेट देऊन आले होते. काशीद यांनी सर्व गुन्हेगारांना ओळखले. हा चेहरेपट्टी सिद्ध करणारा मोठा पुरावादेखील पोलिसांच्या हातात होता.

काहीवेळा गुन्हेगाराची हुशारी त्याच्या अंगलट कशी येते याचे उदाहरण म्हणजे या गुन्ह्यात वापरण्यात आलेली नायलॉनची दोरी, त्याची विशिष्ट गाठ, सुगंधी द्रव्याचा वापर, मृ*तांच्या तोंडात कोंबलेले जुन्या शर्टाचे बोळे. हे सर्व पुरावे गुन्हेगाराच्याच विरुद्ध उभे राहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *