जया एकादशी 2021… घरात इथे लावा दिवा. कर्ज फिटेल,सुख मिळेल, पैसा इतका येईल की…

माघ शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीस जया एकादशी म्हणतात. प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात. एक एकादशी कृष्ण पक्षात तर एक एकादशी शुक्ल पक्षात येते.वर्षाला अशा 24 एकादशी असतात. जर अधिक मास असेल तर त्या वर्षाला 26 एकादशी येतात.

माघ शुक्ल पक्षात या तिथीला जया एकादशी यांची पुन्यतिथी असते म्हणून ह्या दिवशी जया एकादशी येते. हिंदू धर्मात जया एकादशीच विशेष महात्म वर्णिले आहे. 23 फेब्रुवारी 2021 ला मंगळवारी या वर्षीची जया एकादशी येते.ती विशेष पुण्यदायी मानली जाते.ह्या तिथीस जगाचे पालनहर्ता भगवान श्रीहरी श्रीविष्णूचे पूजन केल्याने सुखाची प्राप्ती होते.

आपल्यावर जर कर्ज असेल, घेतलेले कर्ज फिटत नसेल अजून काही कर्ज समस्या असेल तर हे छोटे छोटे उपाय करा. हे उपाय केल्याने तुमच्यावरील कर्ज फिटेल, कर्जमुक्ती मिळेल. यासासाठी खालील उपाय करून पाहा…

जया एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे. स्वच्छ स्नान विधी करावी. श्रीहरी भगवान विष्णूची मनेभावे पूजा करावी. तुळशीची माळ घ्यावी.
” ओम नमो भगवताये वासुदेवाय नमः ” ह्या विष्णु मंत्राचा 1माळा म्हणजे 108 वेळा जप करावा. हा उपाय केल्याने भगवान विष्णूची आपल्यावर असीम कृपा होते. घरात सुख येते.

आजच्या दिवशी अजून एक उपाय कसा करायचा सांगत आहोत. आपल्या घरातील ताब्यांच्या धातूचा तांब्याभर पाणी घ्यावे.त्यात थोडी साखर टाकावी. हे साखर मिश्रित जल पिंपळाच्या बुंध्यावर टाकावे. दिवसभरातून कुठल्याही वेळी हा उपाय करू शकता.सकाळी केला तर उत्तमच
हा उपाय करताना ” ओम नमो भगवताये वासुदेवाय ” हा मंत्रजप करावा. पिपळाला प्रदक्षिणा घालावी ते शक्य नसेल तर स्वतःता भोवती प्रदक्षिणा घातली तरी चालेल.पिपळाच्या झाडाखाली गाईच्या तुपाचा दिवा लावावा. पिंपळाच्या झाडात विष्णूवास करतात त्यांच्या कृपेने यश प्राप्ती होते. कर्ज मुक्ती होते.

काही लोकांकडे खुप पैसा असून पण सुख नसते. नुसता पैसा असून चालत नाही त्यासाठी समाधान पण गरजेचे असते.या साठी अजून एक उपाय करावा.
जया एकादशीच्या दिवशी तुळशी समोर दिवा लावावा. तुळस ही विष्णूला अत्यंत प्रिय आहे. तुळशी भोवती प्रदक्षिणा घाला स्वतःभोती सुद्धा प्रदक्षिणा घालू शकता. “ओम वासुदेवाय नमः” किंवा “ओम भगवतायेनमः” हा मंत्र जपावा. ज्यांना शक्य असेल त्या कुटुंबातील सर्वांनी एकत्र येउन पूजा करावी असे केल्याने एकमेकांत प्रेम भावना उत्पन्न होते. केवळ पैशाच्या मागे धावू नका मानसिक सुख पण महत्वाचे आहे.

धनप्राप्ती,धनलाभ हवा असेल त्यांनी सकाळी लवकर उठून श्रीविष्णूची पूजा करावी त्यासोबत माता लक्ष्मीची पण पूजा करावी. माता लक्ष्मीला लवंग , गुलाबाची फुलं , लाल रंगाची फुलं प्रिय असतात ती अर्पण करावीत. श्रीविष्णूंना पिवळे फुलं , पिवळी फुले ,मिठाई प्रिय आहे ते अर्पण करावे. संध्याकाळी 9 वातीचा दिवा लावावा. आणि एक वातीचा दिवा म्हणजे नंदादीप लावावा. नंदादीप रात्रभर पेटता ठेवावा. ज्यांना हा उपाय सकाळी जमणार नाही त्यांनी संध्याकाळी केला तरी चालेल.हा उपाय केल्याने धन,वैभव, ऐश्वर्य प्राप्त होते. हा उपाय करताना ” ओम नारायणा” हा विष्णू मंत्र आणि ” ओम श्नीम् श्नीयाम् नमः ” हा लक्ष्मी मंत्र जप करावा.

हे उपाय नक्की करून बघा आणि कर्जमुक्ती , सुखाची प्राप्ती ,सुख समाधान मिळवा.

Leave a Reply

Your email address will not be published.