केसांसाठी असणारे कढीपत्त्याचे फायदे वाचाल तर आज पासूनच कढीपत्त्याचा वापर सुरू कराल…

फोडणीत जिरं आणि मोहरीसोबत कढीपत्ता टाकला की, असा मस्त खमंग वास सुटतो की, लगेचच भूक चाळवते. डाळ, आमटी, कढी यामध्ये कढीपत्ता आवर्जून घातला जातो. पण जेवणाला चव आणण्याव्यतिरिक्तही कढीपत्त्याचे भरपूर फायदे आहेत जे तुम्हाला माहीत हवेत.

जर तुम्ही डाळीत, आमटीत, भाजीत आलेला कढीपत्ता बाजूला काढून टाकत असाल तर तुम्ही तुम्ही आताच कढीपत्त्याचे सेवन सुरु करा तुम्हाला तुमच्यात झालेला बदल लगेच जाणवेल.

मग कढीपत्त्याचे हे फायदे जाणून घेण्यासाठी तयार आहात ना…

कढीपत्त्यामध्ये नेमकं काय असतं?

उग्र वासांच्या या पानामध्ये नेमकं असतं तरी काय? असा तुम्हाला प्रश्न पडणे अगदी स्वाभाविक आहे. पण कढीपत्त्यामध्ये काही विशेष गुणधर्म असतात. ते देखील तुम्हाला माहीत हवे.

कढीपत्त्यामध्ये कार्बोदकं, फाय बर, कॅल्शि अम, फॉस्फ रस, आर्यन आणि व्हिटॅ मिन C, व्हिटॅ मिन B आणि व्हिटॅ मिन E असते. जे तुमच्या आरो ग्यासाठी अत्यंत महत्वाचे असतात.

विविध स्तरावर शास्त्र ज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार कढीपत्ता हा आरो ग्यासाठी तर चांगला आहेच पण कढीपत्त्याच्या नित्य सेवनामुळे तुमचे केस आणि त्वचाही चांगली होती.

केसांसाठी कढीपत्ता आहे बहुगुणी

केसांसाठी कढीपत्ता बहुगुणी आहे हे अभ्यासातून सिद्ध झालेले आहेच. अनेकांना केसांच्या तक्रारी असतात. त्यात प्रामुख्याने केसग ळती, कोंडा आणि पांढरे केस, कोरडे केस ही केसांची समस्या अगदी सर्वसाधारण आहे. या सगळ्यावर कढीपत्ता अत्यंत गुणकारी आहे.

केसग ळती

चुकीचा आहार आणि वयोमानानुसार तुमच्या केसांमध्ये बदल होत असतात. कढीपत्त्यामध्ये असलेले केरे टीन आणि प्रोटी न तुमच्या केसांच्या वाढीसाठी चांगले असते. जर तुम्हाला केस गळतीचा त्रास असेल तर तुमच्यासाठी कढीपत्ता अगदीच योग्य आहे.

कढीपत्त्याच्या सेवनामुळे किंवा त्याच्या वापरामुळे तुमचे गेलेले केस परत येऊ शकतात. तुमची केस ग ळती थांबू शकते. तुम्हाला चमकदार आणि मजबूत केस मिळू शकतात.

केसांची वाढ

वर सांगित्याप्रमाणे तुमची केस ग ळती कढीपत्त्यामुळे कमी होऊ शकते. अगदी त्याचप्रमाणे केसांच्या वाढीला चालना मिळण्यासाठी कढीपत्ता हा उत्तम आहे. कढीपत्ता तुमच्या केसांची मूळ मजबूत करतात. या शिवाय जर तुमच्या स्काल्पवर घाण साचली असेल तर ती काढून तुमच्या केसांच्या वाढीला चालना देतात.

पांढरे केस काळे करण्यास मदत

अकाली केस पांढरे होण्याचा त्रास हल्ली अनेकांना होतो. अगदी 10 ते 15 या वयोगटातील मुलांचे केसही आजकाल लवकर पांढरे होतात. कढीपत्यामधील व्हिटॅ मिन E तुमच्या केसांचा काळा रंग टिकून राहतो. केस पांढरे होण्यापासून कढीपत्ता परावृत्त करते म्हणून तुमच्या आहारात कढीपत्ता असायला हवे.

कोंडा करते दूर

तुमच्या स्काल्पवरील घाण अर्थातच साचलेल्या रुपातील असलेला कोंडा कढीपत्ता काढून टाकते. कढीपत्त्याच्या सेवनामुळे किंवा वापरामुळे तुमच्या केसांसाठी त्रासदायक असलेला कोंडा कमी होतो. कोंडा परत होतही नाही.

स्काल्प करते मॉश्चराईझ

तुमच्या केसांमध्ये हात फिरवून पाहा. तुम्हाला तुमची स्काल्प कोरडी लागते का? स्काल्पला नखाने थोडे खाजवा. तुम्हालाही तुमच्या स्काल्पमधून पांढरे आल्यासारखे वाटते का? याचा अर्थ एकच की. तुमची स्काल्प कोरडी झाली आहे. तिला जर तुम्हाला मॉश्च राईज करायची असेल तर तुम्ही कढीपत्त्याचा वापर करायलाच हवा.

कढीपत्त्याचा असा करा वापर

कढीपत्त्यापासून बनवा हेअर मास्क

केसांच्या वाढीसाठी कढीपत्ता खूप चांगला आहे हे आम्ही तुम्हाला सांगितलंच आहे. आता तुम्हाला केसांच्या उत्तम वाढीसाठी चांगला हेअर मास्कही तयार करता येईल. तुम्ही दोन पदधतीने हेअर मास्क बनवू शकता.

कढीपत्ता आणि दही हेअर मास्क

कढीपत्त्याची काही पाने वाटून घ्या. त्यात तुम्ही तुमच्या केसांच्या लांबीनुसार दही घाला. तयार मास्क तुम्हाला तुमच्या केसांना लावायचा आहे. हा मास्क लावल्यानंतर तुम्हाला एकदम थंड वाटेल.

हा मास्क 20 ते 30 मिनिटे ठेवून तुम्ही केस धुवून टाका. आठवड्यातून एकदा हा मास्क केसांना लावा.

कढीपत्ता कांदा हेअर मास्क

आणखी एका प्रकारे तुम्ही हेअर मास्क बनवू शकता. काही कढीपत्त्याी पाने आणि कांदा यांची पेस्ट करुन घ्यावी. तयार मास्क तुम्ही तुमच्या केसांना लावावा. साधारण 30 मिनिटे केसांना लावून तुम्ही तुमचे केस धुवून टाका. तुम्हाला तुमचे केस मुलायम लागतील. जर कांद्यामुळे तुम्हाला तुमचे केस अधिक कोरडे वाटत असतील तर तुम्ही कांद्याचे त्यातील प्रमाण कमी करा.

कढीपत्त्याचे तेल

कढीपत्त्याचे तेल बनवणे अगदी सोपे आहे. यासाठी तुम्हाला लागेल नारळाचे तेल.

नारळाचे तेल गरम करुन त्यात तुम्हाला कढीपत्त्याची पाने टाकायची आहेत. पाने काळी होईपर्यंत तुम्हाला त्यात कढीपत्ता ठेवायचा आहे. आठवड्यातून दोनदा हे तेल तुम्हाला लावायचे आहे. तुम्हाला 15 दिवसात तुमच्यात झालेला फरक जाणवेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत शेयर करा.

अशाच सुंदर माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published.