कापराच्या ते लाचे फायदे

कापूर आपल्या अँटिबायोटिक आणि अँटीफंगल गुणधर्मामुळे पूजा-हवन साहित्याच्या व्यतिरिक्त आरोग्य आणि सौन्दर्यासाठी देखील फायदेशीर आहे. तर आपण याचा समावेश सौं दर्य प्रसाधनांमध्ये देखील केलास, तर आपल्या बऱ्याचश्या समस्या नाहीश्या होतील. कापूर जेवढे लाभदायक आहे तेवढेच अधिक कीमती आहे कापराचं तेल. कापराच्या तेलाचे जादुई फायदे जाणून घ्या. परंतु त्यापूर्वी आम्ही आपल्याला सांगत आहोत की कापराचं ते ल घरच्या घरी कसे बनवू शकता. 

तसे तर कापराचं ते ल बाजारपेठेत देखील उपलब्ध आहे, पण याला घरात देखील सहजरित्या तयार करू शकता. घरी बनविण्यासाठी नारळाच्या ते लात कापराचे काही तुकडे घाला आणि एखाद्या हवाबंद डब्यात भरून ठेवावं. काही काळा नंतर हे तेल कापराचे घटक शोषून घेतं आणि झाले कापराचे तेल तयार.


आता जाणून घेऊया याचे 8 जादुई फायदे.

1 कापराच्या तेलाला त्वचेवर लावल्यानं गळू-पुटकळी आणि मुरूम बरे होऊ लागतात. हे मुरुमांना कमी करतंच, त्याशिवाय त्वचेवरील मुरुमांच्या डागाला देखील मुळातून का ढून टाकतो.

2 एका टबमध्ये कोमट पाणी घेऊन त्यात थोडंसं कापराचं ते ल घाला. आता काही काळ त्यामध्ये आपले पाय बुडवून बसा. यामुळे आपल्या टाचा देखील स्वच्छ होतील आणि भेगा पडलेल्या टाचा देखील बऱ्या होतील. आपल्या पायात काही बुरशीजन्य सं सर्ग झाले असल्यास बुरशीजन्य सं सर्ग देखील नाहीशे होतील आणि वेदना पासून आराम मिळेल.


3 कापराचं ते ल केसांमध्ये लावल्यानं केस वेगाने वाढतात, बळकट होतात आणि गळणे थांबतात. यासाठी कापराचं ते ल दह्यात मिसळून केसांच्या मुळात लावावं आणि एक तासानंतर केसांना धुवावं.


4 त्वचेवर जळण्याचे किंवा फाटण्याचे डाग असल्यास कापराचं ते ल त्या जागी लावल्यानं डाग पुसट आणि फिकट होतात.

5 त्वचे चेकोणतेही त्रा स असो, कापराचं ते ल त्याला नाहीसे करून आपल्याला स्वच्छ, निरोगी, गुळगुळीत आणि डाग रहित त्व चा देतं.


6 अंतर्गत वेदनेमध्ये देखील कापराचं तेल खूप प्रभावी आहे. शरीराच्या कोणत्याही भागात वेदना होत असल्यास कापराचं हे ते ल कोमट करून त्या जागी चोळल्यानं वेदनेपासून आराम मिळतो.


7 ताण कमी करण्यासाठी कापराचं ते ल फायदेशीर असत. याला कपाळी लावा किंवा केसात याची मॉलिश केल्यानं तणाव कमी होतो. 


8 केस गळत असल्यास किंवा केसात कोंडा झाला असल्यास, कापराच्या ते लानं मालीश करावी. या दोन्ही समस्यांचा निराकरण होईल, केस परत येण्यास मदत मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published.