केळीच्या पानावर जेवण का करावे…

नैवेद्य दाखवायचा असो, सवाष्ण बोलवायची असो व ब्राम्हणांना जेवायला बोलावले असो. याप्रसंगी भोजन केळीच्या पानवर वाढण्याची प्रथा आपल्याकडे आहे. या प्रथेमागे धार्मिक अधिष्ठान तर आहेच शिवाय वैद्यकीय कारणेही आहेत. जाणून घेऊया त्याविषयी…

हिंदू धर्मग्रंथामध्ये केळीच्या झाडाला पवित्र मानण्यात आले आहे. काही विशेष पूजन कार्यामध्ये या झाडाच्या फांद्यांचा मंडपही तयार केला जातो. केळीचे झाड हे भगवान विष्णूला प्रिय आहे. यामुळे ज्या लोकांचे लग्न जमण्यास उशीर होतो आहे त्यांना या झाडाची पूजा करण्यास सांगितली जाते. वास्तूनुसारही केळीचे झाड घराच्या समोर अथवा बागेत लावणे शुभ मानले जाते.

भारतातील बऱ्याच भागांमध्ये या झाडाच्या पवित्रतेमुळे याचा उपयोग जेवण करण्यासाठी केला जातो. यामागे धार्मिक तसेच वैद्यकीय कारणही आहे. केळीच्या पानावर जेवण केल्याचे अनेक फायदे आहेत.

केळीच्या पानावर गरम भोजन वाढल्याने त्या पानांमधली असलेली पोषकतत्वे अन्नात मिसळतात, जे शरीरासाठी चांगले असते. केळीच्या पानवर जेवण केल्यास डाग- खाज, पुरळ, फोडं अशा समस्या दूर होतात.

केळीच्या पानांमध्ये अधिक प्रमाणात “एपिगालोकेटचीन गलेट” आणि इजीसीजीसारखे “पॉलिफिनोल्स अँटिअॉक्सीडेंट “आढळतात. याच पानांमार्फत अँटिअॉक्सीडेंट आपणास मिळतात. यामुळे त्वचा दिर्घकाळापर्यंत तरुण राहण्यास मदत मिळते.

मेंदूला होणारा रक्तप्रवाह सुरळीत चालू रहातो. केळीच्या पानावर जेवल्यास अन्न पचायला सोप्पे जाते.

केळीच्या पानावर खोबरेल तेल टाकून हे पान त्वचेवर गुंडाळल्यास त्वचेचा आजार ठीक होतो.

केळीचे पान पूर्ण सुकल्यावर त्या पानांचा चुरा जर थोड्या प्रमाणात चहात टाकला तर फुफ्फुसे व स्वरयंत्राचे आजार बरे होतात. 

शरीर आणि मन यांची सात्विकता वाढते

केळीचे पान सात्विक असल्याने जेवणाऱ्या व्यक्तीचे शरीर आणि मन यांची सात्विकता २ टक्के वाढू शकते.

शरीराची शुद्धी होते

केळीच्या पानातील चैतन्यामुळे शरीराची शुद्धी होते.

केळीचे पान वापरण्याची भारतीय परंपरा !

केळीच्या पानावर जेवणे, ही अशीच एक निसर्गाचा आणि आरोग्याचा सूक्ष्म विचार असणारी भारतीय परंपरा आहे. केळीच्या पानाची आरो ग्यदृष्ट्या आणि पर्यावरणदृ ष्ट्या असलेली उपयुक्तता आज आधुनिक विज्ञानाने सिद्ध झाली आहे.

मोठा आकार, लवचिकता, तंतुमयपणा आणि सहज उपलब्धता या वैशिष्ट्यांमुळे जेवायला ताटाऐवजी केळीचे पान घेण्याची परंपरा जवळजवळ संपूर्ण देशात विशेषत: दक्षिण भारतात वर्षानुवर्षे असलेली आढळते. काही अन्नपदार्थ शि-जवतांना भांड्याच्या तळाशी केळीचे पान घालण्याची पद्धतही होती, ज्यामुळे अन्नपदार्थाला एक मंद सुवास येतो.

तसेच तळाशी केळीचे पान घातल्यामुळे पदार्थ खाली लागून करपण्याचा धोकाही टळतो. अ-ळुवडीसारखे पदार्थ केळीच्या पानात गुंडाळून शिजवतात. अनेक ठिकाणी वेष्टन म्हणूनही केळीच्या पानाचा उपयोग करतात. केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत फक्त भारतातच नव्हे, तर इं-डोने-शिया, सिंगापूर, मलेशिया, फिलिपी-न्स, मे-क्सिको, मध्य अमेरिका या देशांमध्येही आढळते.

प्ला-स्टीक डिशपेक्षा केळीची पाने वापरणे पर्यावरणपूरक

सध्या कुठलाही घरगुती वा सार्वजनिक कार्यक्रम असल्यास सर्रास प्लास्टीकच्या वा थर्माकोलच्या डिश (ताटल्या) जेवणासाठी वापरल्या जातात. खाऊन झाल्यावर या डिश कचर्‍यात फेकून दिल्या जातात. यामुळे किती कचरा वाढतो ? केळीचे पान हा याला एक चांगला पर्याय आहे.

ते सहज विघटनशील असल्यामुळे पर्यावरणपूरक आहे. खेडेगावांमध्ये केळीची पाने घरच्या घरीच उपलब्ध होतात. शहरामध्ये ती विकत घ्यावी लागतात; पण ती उपलब्ध असतात. शहराच्या आजूबाजूच्या केळी बागायती करणार्‍या शेतकर्‍यांना केळ्यांबरोबरच केळीची पाने विकणे, हे एक चांगले उदरनिर्वाहचे साधन होऊ शकते.

मुंबईत दादर आणि इतर काही रेल्वे स्थानकांच्या बाहेर १० रुपयांना ४ वगैरे अशा मूल्यामध्ये केळीची पाने मिळतात. त्यामुळे ती ‘महाग’ नक्कीच नाहीत. घरगुती कार्यक्रमासाठी प्लास्टीक डिश वापरण्यापेक्षा केळीची पाने वापरण्यात अशक्य काहीच नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.