केस का गळतात?

स्त्री आणि पुरुष यांच्या सौंदर्याचा केस हे सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. केस गळायला लागणे ही मोठी समस्या ठरते. आजार, औषधे किंवा अनुवांशिकता अशी विविध कारणे केस गळण्याच्या मुळाशी असू शकतात.

एखाद्याला टक्कल पडू लागले की केसांबरोबर त्याचा आत्मविश्वासाचा ‘काऊंट’सुद्धा कमी होतो. दाट केस हे तारुण्याचे, पृष्ठ-त्वाचे तर टक्कल प्रौढत्वाचेच लक्षण मानले जाते. दररोज ५० ते १०० केस गळणे हे सामान्य समजले जाते. याचे कारण म्हणजे केसांच्या वाढीच्या सायकल प्रमाणे हेच केस साधारण १०० दिवसांनंतर पुन्हा उगवतात. त्यामुळे सामान्य व्यक्तीच्या डोक्यावर साधारण १,००,००० केस नेहमीच असतात. वयोमानाप्रमाणे व्यक्तीचे केस काही प्रमाणात विरळ होत जातात. अनुवांशिकताही ‘मेल पॅटर्न बॉल्डनेस’ किंवा ‘फि-मेल पॅ-टर्न’ प्रमाणे टक्कल पडण्याचे प्रमुख कारण असते. आई किंवा वडील किंवा दोन्ही यांच्या बाबतीत. कुटुंबातून जेनेटिकली हा घटक अंतर्भूत असेल तिथे ही स्थिती अधिक गंभीर असते. अशा प्रकारचे व्यक्ती आपल्या पंचवीशीतच केस घालवून टक्कल पडलेले आढळून येतात.

वजन कमी करण्यासाठी केलेले असंतुलित डायटिंग, गरोदरपणा, प्रसूती किंवा रजोनिवृत्तीमुळे हॉर्मो-नमध्ये होणारे बदल किंवा असंतुलन यामुळे तात्पुरती केसगळती होऊ शकते. शरीरातील अनेक हॉर्मोनच्या पातळीवर केसांची वाढ निर्भर असते. थाय-रॉइड, टेस्टो-स्टेरॉन, इ-स्ट्रोजेन हे त्यातील काही महत्त्वाचे घटक आहेत. कधीकधी शरीरातील प्रतिकार यंत्रणाच केसांच्या मूळावर आक्रमण करते. त्यामुळे एलोपेशिया एरियाटा वि-कार होतो. काही इतरही त्वचा वि-कार, जसे लायकेन प्लॅ-नस किंवा ल्युपस मध्ये केसगळती होते. काही औषधे जसे क-र्क रोग, आर्थ-रायटिस, नैराश्य, हृदय-विकार आदीवर वापरल्या जाणाऱ्या औषधांमुळे केस गळतात. शारीरिक किंवा मानसिक धक्का, मानसिक विकार ज्यात स्वतःचे केस ओढायची तीव्र इच्छा होणे यामुळेसुद्धा नकळतपणे केसांची गळती अनुभवली जाते.

काही अशा ‘हेअर स्टाइल’ ज्यामध्ये लेस ताणून बांधली जाते (पीगटेल किंवा कॉर्न-क्रो) किंवा जे केसांना वारंवार स्ट्रेटनिंग अथवा कुरळे करतात, अशा व्यक्तींना ट्रक्शन अलोपेशीया प्रकारची केस गळती होते. आमच्या अनुभवाने केस गळण्याविषयी लोकांमध्ये खूप जास्त जागरूकता आहे. मुलेमुली ताण-तणाव, प्रदूषण, वजन कमी करण्याचा दबाव, असंतुलित आहार, विविध प्रकारची व्यसने, विचित्र हेअर स्टाइल्स करण्याचा अट्टाहास या कारणांमुळे कमी वयातच केस गळण्यासारख्या समस्यांना सामोरे जात आहेत. एखाद्या व्यक्तीच्या केस गळण्याच्या कारणांचे अचूक निदान करणे तसे प्रत्येक रुग्णात शक्य होत नसले, तरीही त्या व्यक्तीच्या सविस्तर इतिहासावरून, केसांच्या तपासणीवरून आणि काही पॅथॉलॉजी टेस्टवरून एक ढोबळ निदान करून त्याचा उपचार सुचवणे शक्य असते. 

केस गळती सामान्य समस्या असून त्याची अनेक कारणे असतात. यामध्ये आजार, जेनेटिक कारणांचा समावेश आहे. केस गळण्याच्या पाच कारणांविषयी आणि त्यावरील सोप्या उपायांविषयी माहिती घेतली तर तुमचे केस कधीही गळणार नाहीत. रक्तामध्ये आयर्न कमी असल्याचा परिणाम केसांवर होतो. यामुळे केस गळतात. थायरॉइड प्रॉब्लेममुळे बॉडीमधील हार्मोन डिस्टर्ब होतात आणि केस गळू शकतात.

तसेच आहारामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटीनच्या कमतरतेने केस कमजोर होऊन गळतात. जास्त औषधे घेणे किंवा कीमोथेरपीसारख्या उपचारांमुळे केसांची मुळे कमजोर होतात. मानसिक तणावामुळे केसांच्या मुळांमध्ये कमजोरी येते. यामुळे केस गळतात. अशा कारणांमुळे होणारी केस गळती थांबवायची असल्यास योगा आणि मेडिटेशन करावे. योगा, प्राणायाम, व्यायामाच्या माध्यमातून रक्ताभिसरण क्रिया सुधारता येते. ताण आणि तणाव कमी होतो. त्यामुळे केस गळत नाहीत.

दारू, सिगारेट, उशिरापर्यंत जागणे, तणावासारख्या गोष्टी टाळा. यामुळे शरीर सशक्त राहते. केस गळती कमी होते. जंक फूड, तेलकट, तुपकट पदार्थ टाळा. त्याऐवजी फळे, हिरव्या पालेभाज्या, सुकामेवा, अंडी, दूध यांसारखे पदार्थ खा. केसांची वाढ चांगली होते. जास्त गरम पाण्याने अंघोळ करणे, केस वाळवण्यासाठी मशीनचा जास्त वापर केल्याने केसांची मुळे कमजोर होऊ शकतात. केमिकल असलेला शाम्पू आणि कलर्सऐवजी नैसर्गिक सौंदर्य प्रसाधनांचा वापर करावा.

Leave a Reply

Your email address will not be published.