केसांना तेल लावल्या नंतर या चूक करू नका नाहीतर महागात पडेल

केसांची निगा राखण्यासाठी केसांना नियमित तेल लावणं गरजेचं आहे. कोमट तेलाने केसांना मसाज केल्यामुळे तुमचा थकवा पटकन दूर होतो. केस मजबूत आणि घनदाट होण्यासाठी आठवड्यातून एक ते दोन वेळा केसांना हळूवार मसाज करणंही गरजेचं आहे.

शिवाय आजकाल धुळ माती प्रदूषण यामुळे केस गळण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. म्हणूनच नियमित हेअर मसाज करणं केसांच्या वाढ आणि पोषणासाठी गरजेचं ठरतं. मात्र केसांना तेलाचा मसाज करताना काही गोष्टींची काळजी घेणं फार गरजेचं आहे.

यासाठी जाणून घ्या केसांना तेल लावल्यावर कोणत्या गोष्टी करू नये. केसांना तेल लावल्यामुळे केसांना चांगले पोषण मिळते. म्हणूनच मसाज केल्यावर धुतलेल्या केसांना सुकवण्यासाठी ड्रायरचा वापर करू नका. नाहीतर तुम्ही केलेल्या हेअर मसाजचा काहीच फायदा होणार नाही.

यासाठीच हेअर मसाज हेअर स्पा केल्यावर ड्रायरचा वापर केल्यास तुमच्या केसांचं नुकसान होऊ शकतं. केसांना तेलाचा मसाज केल्यावर तुमच्या केसांच्या मुळांमधील त्वचाछिद्रे मोकळी होतात. त्यामुळे जर तुम्ही दिवसभर केसांना तेल लावून ठेवलं तर तुमच्या केसांचं नुकसान होण्याची शक्यता अधिक असते.

म्हणूनच केस धुण्याआधी एक ते दोन तास अथवा रात्री झोपण्यापूर्वी केसांना तेल लावा. ज्यामुळे केस वेळेवर धुता येतील. बऱ्याचदा केसांना तेल लावल्यावर ते घट्ट बांधून ठेवण्याची अनेकींना सवय असते. मात्र असं करणं केसांसाठी मुळीच चांगलं नाही.

केस घट्ट बांधून ठेवल्यामुळे ते तुटून गळण्याची शक्यता वाढते. त्यापेक्षा केसांचा सैलसर आंबाडा अथवा पोनीटेल बांधून ठेवणं सोयीचं ठरेल. शिवाय केसांना तेलाने मसाज केल्यानंतर अर्धा तासाने केस धुवून टाका. नाहीतर केसांवर धुळ माती प्रदूषण चिकटल्यामुळे त्यांचे नुकसान होण्याची शक्यता असते.

केसांना तेलाने मसाज केल्यामुळे केसांमध्ये गुंता होतो. सहाजिकच हे गुंतलेले केस नीट करण्यासाठी तुम्ही कंगव्याचा वापर करता. मात्र तेलाने मसाज केल्यावर लगेचच केसांवर कंगवा वापरणं योग्य नाही. कारण मसाज केल्यामुळे तुमच्या केसांची मुळं मोकळी आणि नाजूक झालेली असतात.

त्यामुळे त्यावर लगेचच कंगव्याचा वापर करणं चुकीचं ठरू शकतं. केसांना तेलाने मसाज करण्यासाठी अनेकजणी तेल कोमट न करता चक्क गरम करतात. मात्र तेल गरम केल्यामुळे तेलामधील पोषणतत्त्वं कमी होतात. यासाठीच तेल फक्त थोडसं कोमट करा. जर तुम्हाला तेल कोमट करायचं नसेल तर पाणी कोमट करा आणि त्यात तेलाचे काही थेंब टाका. ज्यामुळे तेल तुमच्या केसांच्या मुळांपर्यंत मुरेल.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.