चेहऱ्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी खारीक खूप उपयोगी ठरतो

थंडीच्या दिवसांमध्ये रोज खारीक खाल्ले पाहिजेत असं म्हटलं जातं. पण ह्या मागचं मोठं कारण म्हणजे खारीक खाण्याचे खुप फायदे आहेत. खारीक यांमुळे आपल्या शरीराला नेमके कोणते फायदे होतात हे आज आपण पाहणार आहोत.

1. खारीक यामध्ये calcium चे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे हाडं मजबूत होण्यासाठी खजूर यांचा खूप फायदा होतो.

2. त्याचप्रमाणे खारीक यामध्ये लोह सुद्धा मोठ्या प्रमाणात असते. हिमोग्लोबिन ची कमतरता भरुन काढण्यासाठी खारीक अतिशय उपयोगी ठरतो.

3. एखाद्या वेळी तुम्हाला अचानक थकवा जाणवला तर अशा वेळी दोन ते तीन खारीक खावे. खारीक यामध्ये ग्लूकोज अधिक प्रमाणात असल्याने शरीराला एक प्रकारची तरतरी मिळते.

4. खारीक यांमुळे शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते. त्यामुळे हृदयाचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी खजूर खूप फायदेशीर ठरतो.

5. चेहऱ्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी खारीक खूप उपयोगी ठरतो. खारीक यामुळे चेहऱ्यावरील आणि त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते आणि चेहरा व त्वचा अधिक उजळ होते.

6. खारीक यामध्ये जीवनसत्त्वे (vitamins) आणि प्रथिने (proteins) खूप अधिक प्रमाणात असतात. त्यामुळे बारीक असणार्‍या व्यक्तींनी रोज चार ते पाच खारीक खाल्ले तर वजन वाढविण्यासाठी मदत होईल.

7. खारीक यांमध्ये फायबर (fibre) चं प्रमाण खूप अधिक असतं. त्यामुळे पचन होण्यास अधिक मदत होते. रात्री खारीक पाण्यात भिजवून ठेवावे आणि सकाळी उठल्यावर खावे. त्यामुळे पचनसंस्था चांगल्या प्रकारे कार्य करते.

8. खारीक हा जीवनसत्त्व अ (vitamin A) चा उत्तम स्रोत आहे. त्यामुळे दृष्टी उत्तम राखण्यासाठी खारीक याची मदत होते.

9. खारीक कर्करोग (cancer) पासून बचाव करण्यास उपयोगी ठरतो. आतड्याचा कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर आणि त्याप्रमाणे फुफ्फुसाचा कॅन्सर पासून बचाव करण्यासाठी खारीक उपयोगी ठरतो.

10. अर्धांगवायूचा (लकवा) त्रास कमी करण्यासाठी दररोज एक खारीक खावा. जर तुम्हाला सर्दीचा त्रास असेल तर एक ग्लास दुधामध्ये पाच खारीक, काही काळीमिरी चे दाने व एक वेलची (इलायची) टाकून हे दूध चांगले उकळून घ्यावे आणि रात्री झोपण्यापूर्वी हे दूध घेतल्याने सर्दीचा त्रास कमी होण्यासाठी मदत होते.

आरोग्य आणि आहार सल्ला

अशा या बहुगुणी खारीक याचा आपल्या आहारामध्ये नक्किच समावेश करा. खारीक यांचे पचन चांगले व्हावे यासाठी तुम्ही दररोज व्यायाम, योगा, प्राणायाम केला पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published.