सुरकुत्या आणि पिंपल्स दूर करण्यासाठी कोथिंबीरचा खास फेसपॅक, तेलकट त्वचेसाठीही फायदेशीर!

घरात कोथिंबीरचा वापर वेगवेगळ्या पदार्थांमध्ये, भाज्यांमध्ये वेगळ्या टेस्टसाठी जातो. मात्र, कोथिंबीर त्वचेच्या समस्या दूर करण्यासही फायदेशी ठरते हे अनेकांना माहीत नसतं

कोथिंबीरचा वापर वेगवेगळ्या पदार्थांमध्ये, भाज्यांमध्ये वेगळ्या टेस्टसाठी जातो. मात्र, कोथिंबीर त्वचेच्या समस्या दूर करण्यासही फायदेशी ठरते हे अनेकांना माहीत नसतं. कोथिंबीरीत अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट, बीटा कॅरोटिन, व्हिटॅमिन सी आणि फोलेट असतात. जे त्वचेवरील केवळ फ्री रॅडिकल्सच दूर करत नाही तर त्वचा मुलायम आणि चमकदार करतात. 

कोथिंबीरमध्ये अ‍ॅंटी-फंगल प्रॉपर्टीज असतात जे कोणत्याही प्रकारच्या स्कीन इन्फेक्शनपासून बचाव करतातत. त्यासोबतच वाढत्या वयाचे त्वचेवर दिसणारे संकेतही दूर केले जातात. कोथिंबीर तेलकट त्वचेसाठीही फायदेशीर असते. याने त्वचेवरील अतिरिक्त ऑइल दूर केलं जातं. यामुळे त्वचेवर पिंपल्सही येत नाहीत

आता जर कोथिंबीरचे त्वचेसाठी इतके सगळे फायदे आहेत. तर याचा फेस मास्क किंवा पॅक लावण्यात काहीच गैर नाही. पण तुम्हाला हेही माहीत असलं पाहिजे की, कोथिंबीरमध्ये कोणत्या गोष्टी मिश्रित करून त्वचेवर सकारात्मक प्रभाव पडतो.

सुरकुत्या आणि ऑयली त्वचेचा पॅक

त्वचा ग्लोइंग आणि ऑइल फ्री करायची असेल तर कोथिंबीरच्या पानांची पेस्ट तयार करा आणि त्यात अ‍ॅलोवेरा आणि लिंबाचा रस मिश्रित करा. अ‍ॅलोवेराचा जेल वापरण्याऐवजी अ‍ॅलोवेराचा पानांमघधील गर अधिक चांगला ठरेल. आता हे मिश्रण चांगल्याप्रकारे चेहऱ्यावर लावून अर्धा तास तसच राहू द्या आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा. याने त्वचेवर केवळ चमकदारपणाच येणार नाही तर त्वचेवरील सुरकुत्याही दूर होतील.

डेड स्कीन  दूर करण्यासाठी पॅक

कोथिंबीर तांदळाच्या पिठात मिश्रित करून चेहऱ्यावर लावल्यास फायदा होतो. हे कॉम्बिनेशन त्वचेसाठी एक्सफोलिएटर म्हणून काम करतं. १ कप कोथिंबीरची पाने बारीक करा आणि २ चमचे तांदळाचं पीठ व एक लिंबाचा रस मिश्रित करा. हे मिश्रण चेहऱ्यावर अर्ध्या तासांसाठी लावून ठेवा नंतर चेहरा पाण्याने धुवावा.

त्वचेसाठी कोथिंबीरची पानं असतात लाभदायक 

त्वचेसंबंधित असणाऱ्या काही समस्या ज्याप्रमाणे पिंपल्स, कोरडी त्वचा, टॅनिंग यासाठी कोथिंबीरचा खूपच चांगला फायदा होतो. वास्तविक कोथिंबीरमध्ये अँंटीसेप्टिक आणि अँटीऑक्सीडंट गुण असतात जे तुमच्या त्वचेसाठी खूपच फायदेशीर आहेत. यामध्ये विटामिन सी असून तुमच्या फ्री रॅडिकल्सशी लढण्यास याची मदत होते  आणि एजिंगची लक्षणं दिसत असल्यास, यावर रोख लावण्यासही कोथिंबीरीची मदत होते. याशिवाय एक्झिमा आणि फंगल इन्फेक्शनसारख्या रोगांवरही कोथिंंबीर हा चांगला उपाय आहे. कोथिंबीरच्या पानांमध्ये चिमूटभर हळद घालून याची पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. त्यानंतर 15 मिनिट्स तसंच ठेवा आणि मग थंड पाण्याने तोंड स्वच्छ धुवा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील चमक वाढेल आणि चेहऱ्यावरली ब्लॅकहेड्सदेखील निघून जातील.

कोथिंबीरमध्ये असतात औषधीय गुण

कोथिंबीर (Coriander) कोणाला माहीत नाही असं शक्यच नाही. भारतामध्ये पदार्थांमध्ये सर्वात जास्त वापरला जाणारा पदार्थ जर कोणता असेल तर तो पदार्थ आहे कोथिंबीर. कोथिंबीरचा उपयोग हा साधारणतः जेवण सजवण्यासाठी आणि पदार्थांमध्ये सुगंध आणण्यासाठी केला जातो. पण कोथिंबीरची स्वतःची अशी एक वेगळी चव असते जी, पदार्थाला एक स्वाद आणते. पण कोथिंबीरमध्ये अनेक औषधीय गुण असतात याची माहिती तुम्हाला आहे का? आपल्याला फक्त जेवणापुरतंच कोथिंबीर माहीत असते. कोथिंबीरमधील पोषक तत्वामुळे त्वचेबरोबरच आपलं आरोग्यही चांगलं राहातं. खाण्याला ज्याप्रमाणे कोथिंबीर स्वाद आणते तशीच तुमच्या आरोग्यालासाठीदेखील कोथिंबीर तितकीच गुणकारी आहे. जाणून घेऊया काय खास वैशिष्ट्य आहेत कोथिंबीरची आणि कशाप्रकारे इतर बाबतीतही कोथिंबीरचा उपयोग होऊ शकतो.

कोथिंबीर फायदे

हिरवी कोथिंबीरची पानं आणि धने अर्थात याचे दाणे दोन्ही जेवणामध्ये स्वाद वाढवातात. जेवणामध्ये भलेही मिरची अथवा मसाला नसो पण तुम्ही कोथिंबीर आणि धन्याचा वापर केल्यास, तुमच्या जेवणाला उत्तम चव येते. पण तुम्हाला हे माहीत आहे का? या कोथिंबीरमध्ये अनेक गुण लपले आहेत. यामध्ये प्रोटीन, वसा, कार्बोहायड्रेट, फायबर आणि बऱ्याच प्रकारचे मिनरल्स असतात. याशिवाय कोथिंबीरमध्ये कॅल्शियम, आयर्न, थियामीन, पोटॅशियम, विटामिन सी, फॉस्फरस आणि कॅरोटीनदेखील असतं. आम्ही तुम्हाला या लेखात कोथिंबीरचे फायदे, उपाय आणि नुकसान या सगळ्या गोष्टी सांगणार आहोत. सर्वात पहिले जाणून घेऊन कोथिंबीर आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कशी उपयुक्त आहे हे पाहूया

त्वचेसाठी कोथिंबीरची पानं असतात लाभदायक

त्वचेसंबंधित असणाऱ्या काही समस्या ज्याप्रमाणे पिंपल्स, कोरडी त्वचा, टॅनिंग यासाठी कोथिंबीरचा खूपच चांगला फायदा होतो. वास्तविक कोथिंबीरमध्ये अँंटीसेप्टिक आणि अँटीऑक्सीडंट गुण असतात जे तुमच्या त्वचेसाठी खूपच फायदेशीर आहेत. यामध्ये विटामिन सी असून तुमच्या फ्री रॅडिकल्सशी लढण्यास याची मदत होते  आणि एजिंगची लक्षणं दिसत असल्यास, यावर रोख लावण्यासही कोथिंबीरीची मदत होते. याशिवाय एक्झिमा आणि फंगल इन्फेक्शनसारख्या रोगांवरही कोथिंंबीर हा चांगला उपाय आहे. कोथिंबीरच्या पानांमध्ये चिमूटभर हळद घालून याची पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. त्यानंतर 15 मिनिट्स तसंच ठेवा आणि मग थंड पाण्याने तोंड स्वच्छ धुवा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील चमक वाढेल आणि चेहऱ्यावरली ब्लॅकहेड्सदेखील निघून जातील.

कोथिंबीरची पानं केसांसाठी कशी आहेत फायदेशीर

कोथिंबीरमध्ये खरंच अनेक औषधीय गुण आहेत. त्वचेबरोबरच तुमच्या केसांसाठीही कोथिंबीर उपयुक्त आहे. तुम्हाला अतिप्रमाणात केसगळतीच्या समस्येला सामोरं जावं लागत असेल अथवा नैसर्गिकरित्या तुमचे केस तुम्हाला स्ट्रेट करून घ्यायचे असतील तर कोथिंबीरचा रस यासाठी उपयुक्त आहे. कारण यामध्ये केसांना आवश्यक असणारे विटामिन्स आणि प्रोटीन्स असतात. जे केसांची वाढ करण्यासाठी फायदेशीर ठरतात. हिरव्या कोथिंबीरचा रस काढून तो केसांमध्ये लावा आणि मग 30 मिनिट्स झाल्यावर केस धुवा. यामुळे तुमच्या केसांची गळती थांबेल. तसंच तुमचे केस जर कुरळे असतील आणि तुम्हाला ते स्ट्रेट करायचे असतील तर कोथिंबीरची पेस्ट तुम्ही तुमच्या केसांना लावा आणि साधारण 2 तास केस तसेच ठेवा आणि मग नेहमीप्रमाणे शँपूने केस धुवा. असं केल्यामुळे तुमचे केस आपोआप स्ट्रेट होतील. पार्लरमध्ये जाऊन महागडे उपाय करण्याची त्यासाठी गरज भासणार नाही.

कोथिंबीरचे आरोग्यासाठी लाभ

कोथिंबीर ही प्रत्येक घरामध्ये वापरली जाते. पण खाण्याशिवाय अन्य बाबतीतही कोथिंबीरचा फायदा होतो. कोथिंबीर आयुर्वेदिक औषध आहे. बाजारात मिळणाऱ्या औषधांपेक्षा स्वस्त उपचार आहे. आरोग्यासाठी नक्की काय फायदे होतात कोथिंबीरचे हे जाणून घेऊया

पोटासाठी अमृतच

कोथिंबीरची पानं हे विशेषतः पचनतंत्रासाठी फायदेशीर आहेत. हे यकृत नीट राखण्यासाठी मदत करतात. तसंच कोथिंबीरच्या पानांमुळे पोटाची समस्या दूर होऊन पचनशक्ती वाढते. पोटदुखी, सूज, गॅस, बद्धकोष्ठसारख्या पोटांच्या समस्यांवर कोथिंबीर हा चांगला पर्याय आहे. हेच कारण आहे की, भारतीय पदार्थांमध्ये कोथिंबीर केवळ आताच नाही तर अनादी काळापासून गार्निशिंगसाठी वापरली जात आहे. कोथिंबीरची ताजी पानं ताकामध्ये मिसळून खाल्ल्यास, पोटदुखी, कोलायटिस आणि पचन यासारख्या समस्यांपासून सुटका होते.

थायरॉईडसाठी फायदेशीर

हायपोथायराईडिज्म अर्थात थायरॉईड सारखी समस्या कोणालाही कधीही उद्भवू शकते. पण हा आजार पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो. यावर नियंत्रण ठेवायचं असल्यास, तुम्ही रोज कोथिंबीर खायला हवी. कोथिंबीर तुमच्या शरीरातील असंतुलित हार्मोन संतुलिन करण्यास मदत करतात. त्यामुळे कोथिंबीर तुम्हाला थायरॉईड होऊ नये असं वाटत असल्यास, रोज खा.

मधुमेहसाठी कोथिंबीरचा फायदा

मधुमेहग्रस्त रोग्यांसाठी कोथिंबीर खूपच उपयुक्त आहे. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात आणण्यासाठी कोथिंबीरचा चांगला उपयोग होतो. शरीरामधील मेटाबॉलिजमदेखील योग्य तऱ्हेने होतं. कोथिंबीर रक्तातील साखरेची पातळी अतिशय जलद गतीने कमी करते.

उपाय – कोथिंबीरची पानं रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी हे पाणी गाळून प्या. तुम्हाला हवं तर तुम्ही धणेदेखील तुमच्या रोजच्या जेवणाच्या पदार्थांमध्ये वापरू शकता. याचा खूप फायदा मिळतो.

Leave a Reply

Your email address will not be published.