कुटून कुटून तेलात टाकून लावा केसांच्या सर्व समस्या विसरा

फक्त या तेलाचा वापर करा आणि केसातील कोंडा किंवा केस गळणे केसांच्या कोणत्याही प्रकारच्या समस्या या सर्व समस्या पासून सुटका करून. केस घरच्या घरी अगदी सहजतेने नॅचरल पद्धतीने काळे भोर व लांब सडक बनवा. आज आम्ही तुमच्यासाठी केसांच्या समस्येपासून सुटका असा खूपच सुंदर आणि घरगुती नॅचरल उपाय सांगणार आहोत.

आज काल जर बघितले तर बऱ्याच जणांना केसांच्या समस्या होताना आपल्याला दिसत आहेत. बऱ्याच जणांचे केस गळतात केस तुटतात दाट नसतात आणि वाढ देखील खुंटलेली असते. आणि कोंडा हा तर सर्वच लोकांची समस्या झाले आहे. आणि कोंडा केसांन मध्ये असेल तर पिंपल्स देखील चेहऱ्यावर येऊ लागतात.

कारण केसांन मध्ये जो कोंडा असतो तो चेहऱ्यावर पडला तर त्यामुळे पिंपल्स येण्यास सुरुवात होते. आणि जर चिकट कोंडा असेल तर तो चिकट कोंडा आपल्या स्काल्प ला चिटकून बसतो. आणि त्यामुळे केसांची वाढ होत नाही व केसांची वाढ खुंटते व केसांना वेगवेगळ्या समस्या उदभवू लागतात.

अश्या या केसांच्या सर्व समस्या पासून सुटका करून देण्यासाठी आज आम्ही खूपच सुंदर आणि घरगुती असा नॅचरल उपाय तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. असे एक ऑइल तयार करून दाखवणार आहोत हे ऑइल जर तुम्ही केसांना रात्री झोपताना. आठवड्यातुन फक्त तीन वेळेस लावत गेला.

तुमच्या केसांच्या समस्या अगदी सहजतेने निघून जाण्यास मदत होणार आहे. हे रात्री लावण्याचे कारण असे की रात्री जर तुम्ही स्काल्पला या तेलाने मसाज केले तर ते सकाळ पर्यंत स्काल्प मध्ये सकाळ पर्यंत मुरले जाते. आणि यामुळे केसांना पोषक तत्वे मिळतात या बरोबरच केसांची मजबुती ही टिकून राहते.

आणि हे ऑइल तुम्ही तयार करून एका जार मध्ये भरून ठेवू शकता. आणि वेळो वेळी याचा वापर करत चला. यासाठी तुम्हाला लागणार आहे कोकोनट ऑइल एक वाटी कोकोनट ऑइल एक लोखंडाच्या पात्रात टाकायचे आहे. आता तुम्हाला लागणार आहे चार तुकडे काळी मिरी आणि एक छोटा तुकडा दालचिनी आणि हे बारीक करून घ्या.

हे बारीक केलेले मिश्रण यामध्ये टाकून द्या. आल्याचा एक छोटा तुकडा घ्यायचा आहे आणि याची साल न काढता. असेच हे बारीक करून घ्यायचे आहे. प्रथम हे स्वच्छ धुवून घ्या आणि हे देखील थोडेसे बारीक करून घ्यायचे आहे. एक चमचा भरून आले मिश्रण तयार होईल इतके आले घ्यायचे आहे.

हे छान उकळून तयार करून घ्यायचे आहे. हे किमान दोन ते तीन मिनिटे छान उकळू द्यायचे आहे नंतर गॅस बंद करून द्यायचा आहे. आता आपण जे आले बारीक करून घेतले आहे ते आता टाकायचे आहे त्यात. हे गॅस बंद करून मग टाकायचे आहे. याचा पूर्ण अर्क यामध्ये छान उतरला जातो.

आणि हे नॉर्मल कोमट असताना यात तुम्हाला तुळशीच्या पानांची पावडर टाकायची आहे ही पावडर तुम्हाला एक चमचा टाकायची आहे. आणि ही पावडर देखील छान प्रकारे मिक्स करून घ्या. जर तुमच्या कडे तुळशीची ताजे पाने असतील तर तुम्ही ते देखील वापरू शकता. आणिन्हे मिश्रण झाकून ठेवून द्या.

हे मिश्रण तुम्हाला लोहाच्या पत्रातच करायचा आहे. म्हणजे लोहाचे तत्व देखील त्यात उतरतात. केस जर तुमचे अकाली पांढरे झाले असतील तर केस काळे करण्याकरिता तुम्ही यामध्ये आवळा पावडर देखील टाकली तरी चालेल. हे थंड झाल्यावर असेच दोन ते तीन तास झाकून ठेवून द्या.

किंवा तुम्ही रात्री तयार करून रात्र भर झाकून ठेवले तरी देखील चालते किमान तुम्हाला तीन तास तरी झाकून ठेवायचे आहे. आणि नंतर हे गाळून घ्यायचे आहे आणि हे ऑइल तुम्ही अगदी सहजतेने दोन ते तीन महिने वापरू शकता. याचा कोणताही साईड इफेक्ट नाही आणि याचा कोणताही वास येत नाही.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.