रोज सकाळी खा लसणाची एक पाकळी आणि

साधारणपणे भारतीय खाद्यपदार्थांमध्ये लसूण आर्वजून वापरले जाते. डाळीला, भाजीच्या फोडणीला, चटणीला लसूण वापरले जाते. स्वाद वाढवण्यासाठी लसूण आवश्यक आहे. मात्र त्याचबरोबर लसणाचे अनेक फायदे देखील आहेत. खासकरून पुरूषांना मिळणारे फायदे अधिक आहेत. तर मग जाणून घेऊया लसूण खाण्याचे फायदे….

लसूण खाण्याचे फायदे:

लसणाने शरीरातील विषारी घटक दूर होण्यास मदत होते. म्हणजेच पोट साफ होते.

लसूण खाल्याने पोटासंबंधीच्या समस्या उद्भवण्यास आळा बसतो. त्याचबरोबर बॅक्टरिया नष्ट होण्यास मदत होते.

उच्च रक्तदाब असल्यास रिकाम्या पोटी लसूण खाणे फायदेशीर ठरेल.

लसणाच्या सेवनाने रक्ताभिसरण योग्य पद्धतीने होते आणि त्याचबरोबर हृदयासंबंधीत आजार होण्याचा धोका कमी होतो.

कोलेस्ट्रॉलची समस्या असल्यास लसूण खाणे फायदेशीर ठऱते. त्यामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित राहते.

त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

पुरूषांसाठी होणारे फायदे:

लसणात सेलेनियम असते. त्यामुळे इन्फर्टीलीची समस्या उद्भवत नाही.

यात असलेल्या अंन्टी बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे तोंडाची दुर्गंधी दूर होते.

यात प्रोटीन असल्याने मसल्स टोन होतात.

लसणातील कार्बोहाइड्रेट्समुळे अशक्तपणा कमी होऊन शरीराला ऊर्जा मिळते.

कॅल्शियम असल्याने हाडांना बळकटी येते.

एलिसिनमुळे फॅट्स जलद गतीने बर्न होतात. त्यामुळे वजन नियंत्रणात राहते.

यातील फायबर्समुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते

​वजन कमी होते


वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवायचे असेल तर आहारामध्ये लसणचा समावेश करा. यामध्ये अँटी-ओबेसिटी (Anti obesity) गुणधर्म असल्याने तुमचे वजन कमी होण्यास मदत मिळते. याव्यतिरिक्त लसूणमुळे शरीरातील फॅट्स देखील कमी होतात. यातील औषधी गुणधर्म वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत. लसूणच्या तेलामध्येही अँटी ओबेसिटी घटक असतात, जे वजन घटवण्यासाठी अतिशय प्रभावी ठरू शकतं. नियमित सकाळी पाण्यासोबत लसूण खाल्ल्यास पचनाशी संबंधित समस्या देखील कमी होतील.

​मधुमेहाचा त्रास राहतो नियंत्रणात

पाण्यासोबत कच्चे लसूण खाल्ल्यानं शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात. शरीर डिटॉक्स करण्यासाठी हा एक चांगला उपाय आहे. मधुमेह, नैराश्य आणि कित्येक प्रकारच्या कॅन्सरमुळे तुमचा बचाव देखील होऊ शकतो. लसूणमध्ये अँटी डायबेटीकचे गुणधर्म आहेत. मधुमेहींसाठी लसूण अतिशय लाभदायक आहे.

एक ते दोन आठवडे लसूणचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास रक्तातील शर्करा नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. सोबत यामुळे कोलेस्ट्रॉल ची पातळी देखील संतुलित राहते.

​सर्दी-खोकला, तापाचा त्रास कमी होतो


सर्दी-खोकला, तापाचा त्रास झाल्यानंतर आपली आई किंवा आजी आपल्याला घरगुती उपाय म्हणून लसूण खाण्याचा सल्ला देते. लसूणमध्ये अ‍ॅलिसिन नावाचं कम्पाउंड असतं. यामुळे सर्दी-खोकल्याची समस्या कमी होते. याचे योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणात सेवन केल्यास रोग प्रतिकारक क्षमता देखील वाढते. रोगप्रतिकारक क्षमता मजबूत असल्यास आपले गंभीर आजारांपासून संरक्षण होते.

कोलेस्ट्रॉल


शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी लसूण लाभदायक आहे. लसूणच्या सेवनामुळे शरीरातील हानिकारक कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. अँटी-हायपरलिपिडेमिया गुणधर्मामुळे शरीरातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉल कमी होते. निरोगी आरोग्यासाठी आपल्या आहारामध्ये लसूणचा समावेश करावा

माहिती आवडली असेल तर आताच मित्रांसोबत शेयर करा.
अशाच उपयुक्त आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published.