दररोज सकाळी 108 वेळा म्हणा हा माता लक्ष्मीचा मंत्र माता लक्ष्मी घरात धावत येईल

लक्ष्मी कृपे साठी दररोज सकाळी उठल्यानंतर हा एक मंत्र अवश्य म्हणा. दररोज केवळ 108 वेळा या मंत्राचा जप केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होतात. आणि आपल्या जीवनातील धन समस्या कर्ज किव्हा कोणत्याही प्रकारे तुमचा उद्योग व्यवसाय चालत नसेल तर त्या प्रत्येक कार्यातून धन निर्माण होऊ लागते.

आपले घर धन वैभव ऐश्वर्याने भरून जाते. जी व्यक्ती मनोभावे श्रद्धेने दररोज सकाळी उठल्यानंतर आपले स्नान आटोपून या मंत्राचा जप करते. त्या व्यक्तीच्या जीवनात लक्ष्मीची कृपा कायम स्वरूपी राहते. चला तर मग जाणून घेवूया हा मंत्र कोणता आहे.

या मंत्राचा जप नक्की कसा करावा त्या संबंधीत चे नियम कोणते आहेत. यासाठी तुमच्या साठी एक महत्त्वाची सूचना आहे. कोणताही उपाय करताना टोटके करताना त्या संबंधित चे नियम पुर्णतः जाणून घ्या. अर्धवट माहितीने चुकीचे केलेले उपाय हे यशस्वी होत नाहीत.

सफल ठरत नाहीत किंबहुना त्या उपयांचे फळ तुम्हाला भेटत नाही. हजारो वर्षा पूर्वी साधुमुनींनी ऋषिमुनींनी हजारो वर्षे तपस्या करून मानवी कल्याणासाठी हे मंत्र आपल्यासाठी दिलेले आहेत. जी व्यक्ती मनात किंतु परंतु शंका आणून याने काही प्रभाव होईल का हे पडताळणीसाठी उपाय करते.

या मंत्राचा या उपायांचा तितकासा लाभ होताना दिसत नाही. आणि म्हणून पहिला नियम पूर्ण श्रद्धा आणि आस्थेने आपण हे उपाय करावेत. तर आज जो तुम्ही उपाय पाहणार आहोत. या मंत्राचा जप शुक्रवारच्या दिवसापासून आपल्याला प्रारंभ करायचा आहे.

शुक्रवारीच करायचा आहे कारण शुक्रवार हा माता लक्ष्मीस प्रसन्न करतो. आणि लक्ष्मी मातेचा वार आहे शुक्रवार. म्हणून शुक्रवारच्या दिवशी ब्रह्मा मुहूर्तावर आपण उठा सूर्योदय होण्या आगोदर एक ते दिढ तास आगोदर तुम्हाला उठायचे आहे. जर तुमच्या इथे सात वाजता सूर्य उगवतोय तर.

तुम्हाला साडेपाच ते सहा वाजता तुम्हाला उठायचे आहे. व आंघोळ करून स्वतःचे शरीर स्वच्छ करायचे आहे. आणि त्या नंतर सूर्य उगवण्यास बारा मिनिटे शिल्लक असताना. तुम्ही या मंत्राचा जप प्रारंभ करायचा आहे. हा मंत्र म्हणताना तुमचे तोंड पूर्व दिशेला असायला हवे.

आणि मंत्र जाप करायला बसायच्या आगोदर 108 मणी असलेली माळा घेऊन बसायची आहे. ती नसेल तर तुम्ही 108 कोणतेही धान्य घेऊन बसू शकत. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या समोर माता लक्ष्मीचा फोटो ठेवा मनोभावे त्या फोटो ची पूजा करा.

आणि 108 वेला मनोभावे हा मंत्र जाप करण्यास सुरुवात करा. हा मंत्र पुढील प्रमाणे आहे ते लक्षात घ्या || ॐ नमो हीं श्री क्लिं श्री चिंता हरी लक्ष्मी मम गृहे धन चिंता दुरी करोतू स्वाहा || या मंत्रांचा जप तुम्हाला 108 वेला करायचा आहे. हा तुम्ही मनातल्या मनात करा किव्हा तोंडातल्या तोंडात पुटपुटला तरीही चालेल.

हा मंत्र तुमच्या जीवनातील वास्तूतील तुमच्या घरातील सर्व प्रकारचे दोष दूर करतो. व लक्ष्मी कृपेने धन पैसा येऊ लागतो. या मंत्राचा जप आठ दिवस सातत्याने करा. आणि माता लक्ष्मीच्या च्या आशीर्वादा ने तुमचे घर पैशाने भरून जाईल.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा. जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील. आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.