मार्गशीर्ष महिन्यात 12 पवित्र नावे जपा, जीवनातील सर्व संकटे दूर करा

हिंदू दिनदर्शिके प्रमाणे वर्षाचा नववा महिना अघन किंवा मार्गशीर्ष नावाने ओळखला जातो. धार्मिक ग्रँथामध्ये मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व सांगितले आहे. या महिन्यात श्री हरी विष्णू यांची पूजा करावी. या महिन्यात भगवान विष्णूंच्या या 12 नावांचे जप केल्यानं जीवनातील सर्व संकटे दूर होऊन लक्ष्मी म्हणजे धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतात. जर आपण आपल्या शत्रूंपासून त्रासलेला आहात तर हे नाव जपल्यानं शत्रू भय नाहीसे होतात. 

भगवान विष्णूंची 12 नावे खालील प्रमाणे आहेत.  

 • अच्युत, 
 • अनंत, 
 • दामोदर, 
 • केशव, 
 • नारायण, 
 • श्रीधर, 
 • गोविंद, 
 • माधव, 
 • हृषिकेश
 • त्रिविकरम, 
 • पद्मनाभ 
 • मधुसूदन

भगवान विष्णूंची ही 12 नावे घेत त्यांना पिवळी फुले अर्पण करावी. देवाचे 1 नाव घ्या आणि 1 फुल अर्पण करा. पूजा झाल्यावर संध्याकाळी या फुलांना देवाच्या समोरून काढून घ्या आणि वाहत्या पाण्यात किंवा पिंपळाच्या झाडा खाली व्हा.

हेतू

आपल्या कुटुंबाला धन- धान्य- समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतूने सुवासिनी महिला हे व्रत करतात.

पूजेचे स्वरूप

मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी एका चौरंगावर तांदूळ पसरून त्यावर कलश ठेवला जातो. त्या कलशात पाणी भरून त्यावर आंब्याची पाने लावली जातात, त्यावर नारळ ठेवला जातो.त्या नारळाला देवी समजून तिला सजविले जाते. दागिने , फुलांची वेणी घातली जाते. या देवीची पूजा केली जाते. देवीभोवती आरास मांडली जाते. या व्रताचे महत्त्व सांगणारी पुस्तिका पूजेमध्ये ठेवली जाते. पूजा झाल्यानंतर या पुस्तिकेत दिलेले देवीचे महात्म्य आणि कथा यांचे वाचन केले जाते. गोड पदार्थाचा नैवेद्य दाखविला जातो. शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते. ब्राह्मणाला दान दिले जाते. सुवासिनी बोलावून हळदी-कुंकु केले जाते आणि त्याना या व्रताचे महात्म्य सांगणारी पुस्तिका भेट दिली जाते.

महाराष्ट्रातील गावात आणि शहरात या व्रताची तयारी उत्साहाने केली जाती. देवीचे मुखवटे, पोशाख, दागिने, पूजा साहित्य विकत घेण्यासाठी महिला बाजारपेठेत जावून खरेदी करतात.

माहिती आवडली असेल तर आताच मित्रांसोबत शेयर करा.
अशाच उपयुक्त आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published.