लिंबू पाण्यात गूळ मिसळून प्यायल्याने होतात हे फायदे

पुरुष असो वा महिला वाढलेले पोट, लठ्ठपणा ही सर्वांचीच समस्या बनत चाललीये. वजन कमी करण्यासाठी लोक हल्ली काय काय करत नाही. अनेकाविध उपाय केले जातात. मात्र बऱ्याचदा हे उपाय लागू पडत नाहीत.

पुरुष असो वा महिला वाढलेले पोट, लठ्ठपणा ही सर्वांचीच समस्या बनत चाललीये. वजन कमी करण्यासाठी लोक हल्ली काय काय करत नाही. अनेकाविध उपाय केले जातात.  मात्र बऱ्याचदा हे उपाय लागू पडत नाहीत. 

घरगुती उपायानेही तुम्ही लठ्ठपणा कमी करु शकता. लिंबू पाण्यात गूळ मिसळून प्यायल्याने अनेक फायदे होतात.

लिंबामध्ये अॅसिडिक कंटेट अशतात ज्यामुळे कॅलरी बर्न होण्यास मदत होते.. रोज सकाळी लिंबू पाणी आणि गूळ एकत्र मिसळून प्यायल्यास पाचनक्रिया सुधारते

हृदय आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढते

लिंबामध्ये व्हिटामिन सी असते जे हृदयासाठी चांगले असते. तसेच ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठीही फायदेशीर आहे. 

त्वचेचा पोत सुधारतो

दररोज लिंबू पाणी प्यायल्यास शुष्क त्वचेपासून सुटका होते. तसेच चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. त्वचेचा पोतही सुधारतो. 

पचनक्रिया सुधारते

लिंबू पाण्याचे नियमित सेवन केल्याने पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. तसेच वजन कमी करण्यास मदत होते.

गुळाचे आहेत अनेक फायदे

साखरेच्या तुलनेत गुळ आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. यात कॅलरीज कमी प्रमाणात असतात. सोबतच गुळात अँटीऑक्सिडंट, झिंक आणि सेलेनियम पण मोठ्या प्रमाणात असतात, ज्यामुळे इम्युनिटी वाढते आणि सेल्स डॅमेज होण्यापासून पण गुळ आपल्याला वाचवतो. गुळाचे फक्त एव्हढेच फायदे नाहीत. गुळ आपल्या शरीरातील विषाक्त पदार्थ बाहेर काढतो आणि मेटॅबॉलिझम मजबूत करतो. जेवणानंतर एक तुकडा गुळ खाल्ल्यानं जेवण सहजपणे पचतं. याशिवाय गुळ श्वसन आणि पचनक्रिया स्वच्छ करण्यासाठी चांगला आहे.

वजन कमी करण्यासाठी खास टिप्स

लिंबाचा रस आणि गुळ कोमट पाण्यात मिसळून प्यायल्यानं वजन होतं कमी

गुळात कॅलरीज कमी असतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचं करतं काम

दररोज याचा वापर केल्यास वजन कमी होईल, शरीर फिट राहिल

जर आपल्याला फिट आणि हेल्दी राहायचं असेल तर व्यायाम करण्यासोबतच चांगलं डाएट करणं पण गरजेचं आहे. जर आपण तीन वेळा जेवण करून तृप्त असाल, तर लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपल्याला काही तरी करावंच लागेल. आपल्याला वजन कमी करण्यासाठी आपली स्नॅक्स खाण्याची सवय, जेवण करण्याच्या वेळा यासोबत शरीर डायड्रेट ठेवण्यावरही लक्ष द्यायला पाहिजे. आपल्या आहारात केलेल्या या बदलामुळे फक्त मेटॅबॉलिझमच वाढणार नाही तर पोटाची चरबी कमी होण्यास मदत मिळते. त्यामुळे वजन कमी करायचं असेल तर गुळ आणि लिंबू पाणी एक असा आयुर्वेदिक उपाय आहे, ज्याचं दररोज सेवन केल्यास बॉडी फॅट कमी होतं आणि लठ्ठपणा जातो.

गुळाचे आहेत अनेक फायदे

साखरेच्या तुलनेत गुळ आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. यात कॅलरीज कमी प्रमाणात असतात. सोबतच गुळात अँटीऑक्सिडंट, झिंक आणि सेलेनियम पण मोठ्या प्रमाणात असतात, ज्यामुळे इम्युनिटी वाढते आणि सेल्स डॅमेज होण्यापासून पण गुळ आपल्याला वाचवतो. गुळाचे फक्त एव्हढेच फायदे नाहीत. गुळ आपल्या शरीरातील विषाक्त पदार्थ बाहेर काढतो आणि मेटॅबॉलिझम मजबूत करतो. जेवणानंतर एक तुकडा गुळ खाल्ल्यानं जेवण सहजपणे पचतं. याशिवाय गुळ श्वसन आणि पचनक्रिया स्वच्छ करण्यासाठी चांगला आहे.

लिंबाचे फायदे

लिंबामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. लिंबाचा रस शरीराला हायड्रेट ठेवतं आणि मेटॅबॉलिझम पण वाढवतं. एका रिसर्चनुसार लिंबात असणारं पॉलिफिनोल अँटीऑक्सिडंट वजन प्रमाणात ठेवण्यास फायदेशीर ठरतं. पॉलीफिनोल एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करून एचडीएल कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढवतं. तर लिंबात असलेले अँटी ऑक्सिडंट मुक्त कणांमुळे सेल्स डॅमेज होण्यापासून वाचतात.

गुळ आणि लिंबू पाण्याचे एकत्र फायदे

लिंबू आणि गुळ दोन्ही पोषक तत्त्वांनी भरलेले आहेत. वर्षांनुवर्षे वजन कमी करण्यासाठी याचा वापर केला जोता. मात्र लिंबू आणि गुळ एकत्र घेतल्यानं त्याचा फायदा अधिक होतो. एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा लिंबाचा रस आणि एक लहान तुकडा गुळ मिसळावा. पाण्यात गुळ जेव्हा पूर्णपणे घोळला जाईल तेव्हा याचं सेवन करावं. वजन कमी करण्यासाठी हा एक चांगला उपाय आहे.

वजन कमी करण्यासाठी दररोज सकाळी उपाश्यापोटी एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि गुळ मिसळून प्यावं. आपण याची चव वाढविण्यासाठी यात पुदीन्याची पानं पण टाकू शकता. एक बाब लक्षात ठेवावी की, गुळ कमी प्रमाणात घालावा, नाही तर पाण्याची चव गोड होईल.

Leave a Reply

Your email address will not be published.