जिमला न जाता फॉलो करा हा देशी डाएट प्लॅन, झटक्यात होईल वज न कमी

झपाट्यानं वज न कमी करायचंय तर अस्सल देशी डाएट आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. जाणून घ्या खास देशी डाएट प्लान, हा डाएट फॉलो केला तर आपण नक्कीच वज नकमी करू शकाल.

झपाट्यानं वज न कमी करण्यासाठी फॉलो करा हा खास देशी डाएट प्लान. फक्त 10 दिवस हा डाएट प्लान फॉलो करून रिझल्ट मिळवा. या डाएट सोबत 20 मिनीटं कुठलाही व्यायाम किंवा जॉगिंग करणं आवश्यक आहे.

लठ्ठप णा हा सध्याच्या काळातील एक शाप बनलाय. लठ्ठप णामुळे शरीरात अनेक आजार बळावतात. वज न जितकं झपाट्यानं वाढतं, ते तितक्या झपाट्यानं कमी होत नाही. हेच कारण आहे की, वज न कमी करण्या बाबत अनेकांच्या तक्रारी असतात. अधिकची कॅल री बर्न करण्यासाठी कुणी जिमला जातं तर कुणी औषधं घेतात. मात्र आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, जर आपल्याला वज न कमी करायचं असेल तर आपण आपल्या डाएटवर लक्ष ठेवलं पाहिजे. योग्य डाएट घेतल्यानंच वज न कमी-जास्त करणं शक्य असतं.

यासाठी आपल्याला संतुलित आहार घेणं आवश्यक आहे. जंक फूड आणि फास्ट फूडपासून दूर राहणं गरजेचं आहे. जर आपण काही लहान-लहान गोष्टींवर लक्ष देणं सुरू केलं तर आपल्यासाठी वज न कमी करणं खूप मोठा मुद्दा राहणार नाही.

इथं आम्ही आपल्याला वज न कमी करण्यासाठी देशी डाएटचा एक चार्ट देणार आहोत. जो आपण 10 दिवस चांगल्यापद्धतीनं फॉलो केला तर आरामात किलोपर्यंतचं वज न आपण कमी करू शकाल. मात्र हे डाएट फॉलो करण्यासोबतच आपल्याला दररोज 20 मिनीटं कुठलाही व्यायाम किंवा जॉगिंग करणं आवश्यक आहे. ज्यामुळे आपल्याला रिझल्ट खूप लवकर मिळेल.

देशी डाएट प्लान

सकाळी हे ड्रिंक प्यावं

लठ्ठप णा कमी करण्यासाठी शरीरातील टॉ क्सिन बाहेर काढणं खूप आवश्यक असतं. यासाठी सकाळी-सकाळी पहिले उठल्यानंतर डि टॉक्स वॉटर किंवा दोन ग्लास कोमट पाणी प्या. असं केल्यानं शरीरात झपाट्यानं कॅल री बर्न होतील. आपल्याला हे कमीतकमी एक महिना करायचंय.

सकाळी नाश्ता करतांना हे लक्षात ठेवावं

वज न कमी करण्यासाठी सकाळी असा नाश्ता करावा, ज्यातून 250 कॅल रीज पेक्षा कमी कॅल रीज आपल्या पोटात जातील. यासाठी आपण आवडीनुसार ओट्स, दलिया, ऑमलेट, ब्राऊन ब्रेड, स्किम मिल्क किंवा पोहे खाऊ शकता.

मिड मॉर्निंग स्नॅक्स

वज न कमी करण्यासाठी आपल्या प्रत्येक दोन-दोन तासांमध्ये काही ना काही खात राहायला पाहिजे. यासाठी जेव्हा भूक लागते तेव्हा ग्रीन टी सोबत आपण बिस्किट खाऊ शकतो. आपण फळात केळं, सफरचंद, टरबूज आणि संत्र पण खाऊ शकता.

दुपारचं जेवण

दुपारच्या जेवणातील आपलं कॅ लरी इनटेक 300 हून अधिक नसावं. अशावेळी आपण लंच दरम्यान व्हेज सूप, ब्राऊन राईस, वरण, मासे, अर्धा कप स्टीम व्हेजिटेबल राईस, मल्टीग्रेन चपाती सोबत कुठलीही हिरवी भाजी किंवा वरण खाऊ शकता. आपण अंड्याचं सँडविच पण खाऊ शकता. भाज्या कमी तेलात शिजवाव्यात आणि व्हाईट ब्रेडचा वापर करणं टाळा.

संध्याकाळचा नाश्ता

संध्याकाळी जेव्हा 6 च्या सुमारास आपल्याला जोराची भूक लागते तेव्हा आपण कुठलंही फळ, ड्राय फ्रूट्स, ग्रीन टी सोबत उकडलेल्या अंड्याचा पांढरा भाग, संत्र्याचा ज्यूस किंवा ग्रिल्ड व्हेज सँडविच खाऊ शकता.

डिनरमध्ये काय खावं

रात्री डिनर नेहमी हलकं असावं. अशात आपण जर उकडलेलं चिकन ब्रेस्ट सोबत उकडलेल्या भाज्या खाऊ शकता. आपण २ मल्टीग्रेन पोळीसोबत अर्धा कप चिकन करी किंवा उकडलेल्या भाज्या पण खाऊ शकता.

(सूचना – वरील आर्टिकलमध्ये दिलेल्या टिप्स आणि सल्ला ही सामान्य माहिती आहे, याचा वापर करण्यापूर्वी आपण आपल्या डॉक्टरचा सल्ला अवश्य घ्यावा.)

अशाच माहितीपूर्ण लेखांसाठी आताच आम्हाला फॉलो आणि लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published.