कथा महाशिवरात्रीची एक पार्थि सावध शोधण्याकरीत जंगलात झाडावर बसला होता. संपूर्ण दिवस गेला परंतु शिकाऱ्याला शिकार काही भेटला नाही.
सायंकाळी हरणांचा एक कळप तिथे पाणी पिण्या करीत आला. पार्ध्या ने नेम धरला बाण सोडणार तेवढ्यात त्यातील एक हरीण पुढे येऊन त्या पार्ध्याला म्हणाले हे पार्ध्या तू बाण सोडणार आणि माझी शिकार करणार हे अटळ आहे. परंतु मी तुला एक विनंती करतो मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटून येऊ दे.
मला माझी कर्तव्य पार पाडू दे. हरणाने वचन दिले हरणाची ही विनंती पार्ध्याने मान्य केली. रात्र झाली रात्रभर पारधी त्याच झाडावर बसून होता.
दूरवरून मंदिरांच्या घंटाचे आवज त्याला ऐकू येत होते. ॐ नमः शिवाय हा महामंत्र त्याच्या कानावर पडत होता. पारधी ज्या झाडावर बसला होता ते झाड होते बेलाचे.
सहज काहीतरी करायचे म्हणून तो एक एक पान त्या बेलाचे तोडत होता आणि खाली टाकत होता. त्या झाडा खाली शिव पिंड होती. त्या शिवलिंगा वरती ती बेलाची पणे नकळत पडत होती त्या पार्ध्या च्या हातून नकळत शिव उपासना घडत होती. रात्री हरीण परत आले त्याने त्या पार्ध्या ला म्हटले आता तू मला मारू शकतोस.मी माझे कुटुंब प्रमुख असल्याचे कर्तव्य बजावले आहे.
मात्र तेवढ्यात हरणी पुढे आली आणि म्हटली त्यांना नको मला मार. मला माझे पत्नी धर्माचे कर्तव्य पार पडायचे आहे. तेवढ्यात हरणाची लहान लहान मुले पुढे झाली आणि।म्हणाली आईला नको आम्हाला मार.
आम्हाला आमच्या पुत्र धर्माचे कर्तव्य पार पाडू दे हे सर्व पाहून पार्ध्या च्या डोळ्यात अश्रू आले. त्याच्या मनात विचार आला की हे प्राणी असून देखील स्वतः च्या कर्तव्याला चुकत नाहीत मग मी तर मानव आहे मग मी माझा मानव धर्म माझा दया धर्म का सोडू. त्याने त्या सर्वांना जीवदान दिले. देवादी देव महादेव भोलेनाथ हे सर्व पाहून त्या हरणा वर आणि त्या पार्ध्या वर प्रसन्न झाले.
आणि त्या सर्वांना त्यांनी कृपा आशीर्वाद दिला सर्वांचा उधार केला. हरणाला मृग नक्षत्र म्हणून आणि त्या पार्ध्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून अवकाशात नेहमी करता स्थान दिले हा प्रसंग ज्या वेळी घडला ज्या तिथीस घडला ती तिथी होती महाशिवरात्रीची ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.