घरच्या घरी बनवा माऊथवॉश आणि घ्या तुमच्या दातांची काळजी… मोत्या सारखे चमकतील दात…

ओर ल हे ल्थची काळजी घ्यायची असेल तर तोंडाची आणि दातांची स्वच्छता राखणे अत्यंत गरजेचे आहे. तोंडाची स्वच्छता व्यवस्थित होणं खूपच महत्त्वाचे आहे.

तोंडाची स्वच्छता राखण्यासाठी केवळ दात घासणे अर्थात ब्र श करणे इतकेच करून चालत नाही. ब्र श केल्याने दातावर असणारे अन्नाचे कण साफ होतात. पण तोंडाची पूर्ण स्वच्छता करण्यासाठी तुम्हाला माऊ थवॉशची देखील तितकीच गरज भासते.

बऱ्याचदा घरामध्ये माऊ थवॉश हे आपण बाजारातूनच आणतो. पण माऊ थवॉश घरच्या घरीही आपल्याला बनवता येतो. हे वाचून तुम्हाला नक्कीच आ श्चर्य वाटलं असेल. पण हे खरं आहे.

आम्ही तुम्हाला या लेखातून घरीच माऊ थवॉश बनवून त्याचा कसा वापर करायचा हे सांगणार आहोत.

काही सोप्या टि प्सच्या मदतीने तुम्ही हे माऊ थवॉश घरीच बनवू शकता. जाणून घेऊया कसे बनवायचे हे माऊ थवॉश.

तसंच यामध्ये कोणत्याही केमि कल्सचा वापर न केल्यामुळे हे माऊ थवॉश नैसर्गिक असून वापरायला देखील सुरक्षित असतात. 

बेकिं ग सोड्याचा माऊ थवॉश

बे किं ग सोडा हा दातांच्या स्वच्छतेसाठी उत्तम उपाय आहे. माऊ थवॉश बनविण्यासाठी तुम्हाला जास्त त्रास घ्यावा लागत नाही.

अर्धा चमचा बेकिं ग सोडा आणि अर्धा ग्लास गरम पाणी घ्या. गरम पाण्यात बेकिं ग सोडा नीट मिसळून घ्या. आता ही पाणी घेऊन तुम्ही तुमचे दात साफ करा.

हे मिश्र ण तुमच्या तोंडाची पी एच ले व्हल व्यवस्थित राखण्यासाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे तोंडाला येणारी दु र्गंधी निघून जाते आणि बॅ क्टेरि याची समस्याही दूर होते.

तुम्ही याचा नियमित वापर केल्यास, तुम्हाला नक्की चांगला परिणाम दिसून येईल. बाहेरच्या केमि कलयुक्त माऊ थवॉशपेक्षा घरच्या घरी तयार केलेले हे माऊ थवॉश तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरते.

कडिलिंबाच्या पानाचे माऊ थवॉश

कडिलिंबाची पाने ही आपल्या त्वचेसाठी अतिशय फायदेशीर असतात हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र माऊथ वॉश म्हणूनही याचा चांगला वापर करून घेण्यात येऊ शकतो.

सर्वात पहिले ही पानं स्वच्छ धुवा आणि मग पाण्यात उकळून घ्या. त्यानंतर हे पाणी एका बाटलीत भरून ठेवा. तुम्ही रोज सकाळी जेव्हा ब्र श कराल तेव्हा या पाण्याचा माऊ थवॉश म्हणून वापर करा.

रात्री झोपण्यापूर्वी ब्र श केल्यानंतर नक्कीच या पाण्याने चूळ भरा. असं केल्यास, तुम्हाला तोंडाला दुर्गं धीचा त्रास होणार नाही.

टी ट्री ऑ ईल माऊ थवॉश

टी ट्री ऑई लचाही चांगला उपयोग माऊ थवॉश म्हणून तुम्ही करून घेऊ शकता. पाण्यामध्ये टी ट्री ऑ ईलचे काही थेंब घाला. या पाण्यामुळे हिरड्या निरो गी राहतात आणि तोंडाची देखील चांगली स्वच्छता राहते. तुम्ही याचा नियमित वापर केल्यास तुम्हाला याचा चांगला परिणाम दिसून येईल.

मीठाच्या पाण्याचा माऊ थवॉश

कोम ट पाण्यात मीठ घालून रोज ब्र श केल्यावर चूळ भरल्यास, हिर ड्यांवर किटा णूंचे संक्र मण होत नाही. तसंच हिर ड्यांना सूज येत असल्यास, तुमचा त्रास कमी होतो.

तसंच तोंडाला येणाऱ्या दु र्गंधीपासूनही सुटका मिळते. त्यामुळे बाजारातील महाग माऊ थवॉश वापरण्यापेक्षा हे सोप्या पद्धतीने माऊ थवॉश बनवून तुम्ही घरीच वापरल्यास, तुम्हाला त्याचा फायदा मिळेल आणि कोणताही दुष्प रिणामही होणार नाही.

तसंच तुम्हाला यामध्ये कोणतेही रा सायनिक पदार्थ नसल्याने अगदी शुद्ध माऊ थवॉश मिळेल.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा.

अशाच माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा

Leave a Reply

Your email address will not be published.