उन्हाळ्यात शिळे अन्न खाणे पडेल महागात शिळे खाल्ल्याने काय होते एकदा बघाच

मंडळी अन्न हे पूर्णब्रह्म अस आपण म्हणत असतो आणि म्हणून आपण अन्नाचा आदर करतो. आपण अन्न शीळ पडू देत नाही. उन्हाळ्यामध्ये तुम्ही जर शीळ अन्न खात असाल तर नक्कीच अनेक समस्यांना तुम्हाला तोंड द्यावं लागू शकत. प्रसंगी जीव गमावण्या इतपत सुद्धा घटना घडल्या आहेत आणि म्हणून उन्हाळ्यात शिळे पदार्थ खाऊ नयेत.

त्याने काय होतं यासंबंधी आज तुम्हाला माहिती देणार आहोत. मंडळी उन्हाळ्यामध्ये टेंपरेचर अगदी 35 डिग्री पासून 50 डिग्री पर्यंत गेलेला आपण आज-काल पाहतो आणि मग या तापमानामध्ये जे बॅक्टेरिया असतात ते बॅक्टेरिया सक्रिय होतात.

आणि म्हणून आपण जर चार तासा पेक्षा जास्त वे आपण अन्न ठरवलं तर आपलं अन्न खराब होत असतं. त्याच्यामध्ये बॅक्टेरियाचा प्रादुर्भाव होत असतो. त्याच्यामुळे आपल्याला अनेक रोग होत असतात. त्यातील 1 क्रमांक जो आहे तो म्हणजे फूड पॉयझन.

आता फूड पॉयझनिंग मध्ये उलट्या होऊ शकतात. त्याचबरोबर जुलाब, ताप अशा प्रकारच्या घटना घडतात आणि बॅक्टेरियात जर वेगळ्या प्रकारचे घटक असतील तर नक्कीच फूड पॉइझनिंग मुळे अनेक वेळा जीव सुद्धा गमवावा लागतो. म्हणून उन्हाळ्यामध्ये आपण शिळे अन्न खाल्ल नाही पाहिजे.

त्याचबरोबर आपण उन्हाळ्यामध्ये फळे खात असतो. पण अनेक जण ही फळे कापून फ्रिज मध्ये ठेवतात किंवा कापल्यानंतर ते बराच वेळ खात असतात. त्याच्यामुळे या फळांवर सुद्धा बॅक्टेरियाचा प्रादुर्भाव दिसून येतो. हे बॅक्टेरिया 2 ते 3 पटीने उन्हाळ्यामध्ये फळांवर आक्रमण करतात.

म्हणून फळे सुद्धा वेळेवर कापली तर लगेच खाल्ली पाहिजेत. कापून ठेवून खाल्ली तर नक्कीच आपल्याला पोट दुखी किंवा अनेक इन्फेक्शन यातून आपल्याला होऊ शकतात. त्याचबरोबर शिळे अन्न खाल्ल्याचा अजून 1 तोटा म्हणजे तुमची पचन संस्था हळूहळू निकामी होण्यास सुरुवात होते.

तुमची जर पचनसंस्था चांगली नसेल आणि तुम्ही शिळे अन्न उन्हाळ्यात खात असाल तर तुमच्या पचनसंस्थेतील अनेक घटक डॅमेज होण्यास सुरुवात होते आणि हळूहळू तुमची पचन संस्था तुम्हाला साथ देत नाही. म्हणून शिळे अन्न खात असाल तर नक्कीच तुमची पचनसंस्था बिघडू शकते.

म्हणून शिळे अन्न खाऊ नका. त्याचबरोबर लहान मुलांची इम्युनिटी सिस्टीम म्हणजेच प्रतिकारशक्ती अगदी कमी असते आणि म्हणून या लहान मुलांना तर शिळे अन्न देऊच नका. उन्हाळ्यामध्ये तर नक्कीच देऊ नका. कारण उन्हाळ्यामध्ये आपण पाहत असतो की लहान मुलांना डायरियाची साथ येते.

साथ येण्याचे कारण तेच असतं. की लहान मुलांची प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे बॅक्टेरिया त्यांच्यावर आक्रमण करतात. म्हणून लहान मुलांच्या आरोग्याची काळजी आपण नक्कीच उन्हाळ्यामध्ये घेतली पाहिजे व शिळे अन्न खाऊ नये.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.