मार्गशीर्ष महिन्यात गुरूवारी विशेष रूपात केली जाते लक्ष्मीची पूजा; जाणून घ्या पूजा विधी आणि महत्त्व

 श्रावण महिन्या इतकेच मार्गशीर्ष महिन्याला धार्मिक महत्त्व आहे. या महिन्यात दर गुरूवारी महालक्ष्मी म्हणजेच वैभवलक्ष्मीची पूजा करण्याची प्रथा आहे. दर गुरूवारी घरामध्ये घटाच्या स्वरूपात लक्ष्मीची स्थापना करून महालक्ष्मी किंवा वैभवलक्ष्मीची पूजा केली जाते. तसेच दिवसभर उपवास करून मार्गशीर्ष गुरूवार महालक्ष्मी गुरूवार व्रत केले जाते. मग जाणून घ्या आज मार्गशीर्ष गुरूवात व्रतामध्ये पूजा मांडणी कशी कराल?

महालक्ष्मी गुरूवार व्रत पूजा विधी

महालक्ष्मी घटाची मांडणी सकाळच्या वेळेस करून सकाळी आणि संध्याकाळी त्याची पूजा करावी, आरती करावी. उपवास असल्यास तो गुरूवारी संध्याकाळी सोडण्याची प्रथा आहे. तर दुसर्‍या दिवशी सकाळी (शुक्रवार) महालक्ष्मी व्रत पूजेतील पानं, फुलं निर्माल्यात टाकावीत तर कलशामधील पाणी तुळशीच्या रोपाला वाहण्याची प्रथा आहे. घटावरील नारळचा प्रसादामध्ये किंवा शाकाहारी जेवणात वापर करावा.

जे कुणी श्री महालक्ष्मी-व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील, त्यांना श्रीमहालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल. पण श्रीमंती आल्यावरसुद्धा माणसाने उतू नये, नित्य नेमाने श्रीमहालक्ष्मी व्रत करावे, देवीचे मनन-चिंतन करावे; म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील; तुमची कामना पूर्ण करील. अशी भाविकांची श्रद्धा आहे.

मार्गशीर्ष महिन्यातील या 10 गोष्टी जाणून घ्या

मार्गशीर्ष किंवा अघन महिना भगवान श्रीकृष्णाचे रूप असल्याचे सांगितले जाते. या महिन्यात भगवान श्रीकृष्णाची पूजा करण्याचे महत्त्व सांगितले आहे. या महिन्यात काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. जाणून घेऊ या काय आहेत त्या.

1 या महिन्यात दररोज श्रीमद्भग्वद्गीतेचे वाचन करावे.

2 संपूर्ण महिन्यात सतत ॐ नमो भगवते वासुदेवाय मंत्राचे जप करावे.

3 भगवान श्रीकृष्णाची जास्तीत जास्त वेळ पूजा करावी.

4 या महिन्यांपासून संध्याकाळची उपासना करणे अनिवार्य असते.

5 मार्गशीर्ष महिन्यात तेलाची मालिश करणे खूप चांगले असते.

6 या महिन्यात जिरे खाऊ नये.

7 या महिन्यात पवित्र नदीत स्नान करण्याची संधी मिळत असल्यास ती गमावू नये, नदीत आवर्जून स्नान करावे.

8 या महिन्यापासून जाड कपड्यांचा वापर सुरू करावे.

9 श्रीकृष्णाला तुळशीच्या पानाचा नैवेद्य दाखवून त्याला प्रसाद रूपे घ्यावे.

10 या महिन्यापासून तेलकट पदार्थ घेण्यास सुरू केले पाहिजे.

मार्गशीर्षाच्या या पवित्र्य महिन्यात आपण या गोष्टींना लक्षात घेता भगवान श्रीकृष्णाची उपासना केल्यानं, त्याचे भजन केल्यानं, नामस्मरण केल्यानं आपल्याला फायदा होणार म्हणून हा महिना व्यर्थ न गमावता काही न काही धार्मिक कार्य करत रहावे.

Leave a Reply

Your email address will not be published.