प्रत्येक स्त्रीला आपले केस हे लांबसडक आणि सिल्की असावे असे वाटते. मग, अशावेळी काय करावे असा देखील प्रश्न पडतो. तर अनेक स्त्रिया याकरता केमिकलचा देखील वापर करतात. मात्र, यामुळे केसांचे अधिक नुकसान होते. परंतु, असे काही घरगुती उपाय आहेत जे केल्यास तुमचे केस लांब आणि सिल्की होण्यास मदत होते.
रेशमी होतात
दूधामधील कॅल्शियम, प्रोटीन यांसारखे तत्त्व केसांना हेल्दी ठेवण्यात हेल्पफुल असतात. आठड्यातून एकदा दूधाने केस धुतले तर केस, मुलायम, दाट, काळे आणि रेशमी होऊ शकतात. दूधाने केस धुतल्याने केस स्वच्छ होतील आणि कोंडा दूर होईल. दूधाने केस धुतल्यानंतर हर्बल शाम्पू किंवा कोमट पाण्याने केस धुणे आवश्यक आहे. अन्यथा दुर्गंधी येऊ शकते.
मजबूत होतात
केसांच्या मुळांवर कोमट खोबऱ्याच्या तेलासोबत दूधाने मसाज करा. १५ मिनिटानंतर हर्बल शम्पूने धुवून घ्या. यामुळे केस मजबूत होण्यास मदत होते.
कंडीशनिंगकरता
स्प्रेच्या बॉटलमध्ये दूध भरुन केसांवर टाकावे. १५ ते २० मिनिटांनंतर साध्या पाण्याने धुवून घ्यावे.
सिल्की केसांसाठी
अंड्याचे योग, मध आणि दूधाची पेस्ट केसांवर अप्लाय करुन गरम टॉवेलने गुंडाळा आणि २० मिनिटांनंतर कोमट पाण्याचे केस धुवून घ्या.
हेयर रिपेयरिंग
बकरीच्या ताज्या दूधाने नियमित केस धुतल्याने केस मऊ होतात. गळणे आणि केस तुटणे टळते.
कोंडा
दूध आणि काळ्या मिऱ्यांची पेस्ट बनवून केसांच्या मुळांवर लावा. २० मिनिटांनंतर साध्या पाण्याने धुवून घ्या. केसातील कोंडा निघून जाण्यास मदत होते.
दाट केसांसाठी
कच्च्या दूधाने केसांच्या मुळांशी मसाज करा. यामधील प्रोटीन केसांना दाट आणि काळे बनवते.
केस वाढीसाठी
ताज्या दूधाने केसांच्या मुळांशी मसाज केल्याने केस लांब होतात. नियमित दूध देखील प्यावे.
दूध आणि मध
एक चमचा मध आणि एक कप दूध एकत्र करा.
नंतर हे मिश्रण मुळापासून तुमच्या केसांना लावा आणि केसांना २० मिनिटे मसाज करा.
दूध आणि मधाचा हा लेप १०-१५ मिनिटे तसाच ठेवून नंतर कोमट पाण्याने केस धुवा.
उपयोग- दूध आणि मध एकत्र वापरल्याचे बरेच फायदे आपल्याला होऊ शकतात. मधाने अँटीऑक्सिडन्ट तयार होते आणि दुधामुळे आपल्या केसांना पोषण मिळते.
माहिती आवडली असेल तर आताच मित्रांसोबत शेयर करा.
अशाच उपयुक्त आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.