मूतखड्यावर रामबाण उपाय सापडला, शरीरातच नष्ट होणार खडा


मुतखड्याचा त्रास अत्यंत वेदनादायी असतो. वेळीच त्याचा धोका ओळखता आला नाही तर दिवसेंदिवस त्रास वाढतो. मुतखड्याचा आकार वाढल्यानंतर शस्त्रक्रियेने तो बाहेर काढावा लागतो. मात्र आता मुतखड्याचा त्रास असणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आली आहे. 

मुतखड्याच्या आजारावर आता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने प्रभावी औषध शोधल्याचा दावा केलाय.. या औषधाला मान्यताही मिळाली असून अशा प्रकारचं औषध बनवणारं नांदेडचं विद्यापीठ राज्यातलं पहिलंच विद्यापीठ ठरलंय

मीठ आणि मुत्रातील खनिज पदार्थ एकमेकांच्या संपर्कात आल्याने किडनीस्टोनचा धोका संभवतो. किडनीस्टोनचे प्रकारही वेगवेगळे आहेत. यावर काही प्रमाणात का होईना पण, घरगुती उपायही करता येतात. त्यावरील हा उपाय..

मूतखड्यावर प्रभावी औषध

ओवा-


ओवा किडनीस्टोनसारख्या आजारात टॉनिक म्हणून काम करू शकतो. त्यामुळे आहारात, मसाल्याच्या रुपात ओव्याचा समावेश असावा असा डॉक्टरही सल्ला देत असतात. कारण, लघवीला चालना देण्यात ओवा मदतकारी ठरतो.

* आहारात केळी असवीत-


केळ्यात बी-६ नावाचे जीवनसत्वा असते. या जीवनसत्वामुळे मुत्र खड्यांच्या निर्मितीला आळा बसतो. तसेच किडनीस्टोन झालेल्यांना केळ्याच्या सेवनाने आराम पडतो.

* तुळस


तुळस घालून नियमित चहा घेतल्याने किडनी स्टोनच्या आजारापासून आराम पडतो. तसेच तुळशीच्या पानांचा रस प्यायल्याने खडा लघवीवाटे बाहेर पडण्यास मदत होते.

* द्राक्षे खावीत


या मोसमांत द्राक्षेही चांगली येतात आणि किडनीस्टोनवर द्राक्षांचे सेवन करणे उपयुक्त ठरते. द्रक्षात अलबुमीन आणि सोडिअम क्लोराइड यांचे प्रमाण खूप कमी असते. त्यामुळे किडनी स्टोन आजाराने ग्रस्त असलेल्यांनी फळांमध्ये द्राक्षांना प्रधान्य द्यावे.
वरील नैसर्गिक पदार्थांमुळे किडनी स्टोनच्या आजारावर आराम मिळू शकतो. मात्र, ग्रस्तांनी यावर तज्ञांचा सल्ला घेऊनच पाऊल उचलावे.

आहारनियंत्रण

मुतखड्याचे प्रकार लक्षात घेऊन खाण्यात पूर्ण दक्षता आणि पथ्य पाळण्यास मुतखडा होणे थांबवण्यात मदत मिळू शकते.

जेवणात मीठ कमी घेणे तसेच खरात पदार्थ , पापड,लोणची यांसारखे जास्त मीठ असलेले खाद्यपदार्थ खाता कामा नयेत.

लिंबूपाणी, नारळपाणी, मोसंबीचा रस , अननसाचा रस, गाजर, कारले, बिया काढून घेतलेल्या टोमँटोचा रस, केळी, जवस, बदाम इत्यादीचे सेवनमुतखडान होण्यास मदत करतात. म्हणून त्याचे प्रमाणात सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.

मुतखड्याच्या रोग्यांनी दुधाच्या पदार्थाचे (जे जास्त प्रमाणात कँल्शीयमयुक्त असतात) सेवन करता कामा नये ,हि समजूत चुकीची आहे. खाण्यात योग्य प्रमाणात घेतलेला कँल्शीयम त्या खाद्य पदार्थाच्या आॉक्झीलेट बरोबर जोडला जातो.यामुळे आॉक्झीलेटचे शोषण कमी होते आणि मुतखडा होण्यापासून अटकाव होतो.

वीटँमीन सी जास्त प्रमाणात (४ ग्रँम हून अधिक )घेऊ नये

आॉक्झीलेटवाल्या मुतखड्यासाठीचे पथ्य

खाली दिलेले आॉक्झीलेटयुक्तखाद्यपदार्थ कमी खावेत.

भाज्या– टोमँटो,भेंडी,वांगी,काकडी,पालक,चवळी

फळे– चिकू,आवळे,द्राक्ष,स्ट्रॉबेरी ,काजू

द्रवपदार्थ – कडक चहा,द्राक्षांचा रस,कँडबरी ,कोको, चॉकलेट, थम्सअप , पेप्सी ,कोका कोला.

Leave a Reply

Your email address will not be published.