“आदमी मुसफिर” है गाण्यातील ही मुलगी ओळखली का? आज मराठी सृष्टीत आहे खूप मोठं नाव

१९७७ साली जितेंद्र, सुलक्षणा पंडित, संजीव कुमार, रिना रॉय अशी स्टार कास्ट असलेला “अपनापन” हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता. “आदमी मुसफिर है, आता है जाता है….” हे या चित्रपटाला लाभलेलं गाणं आजही तितकंच लोकप्रिय असलेलं पाहायला मिळतं. या गाण्यात दोन मराठमोळे कलाकार झळकलेले पाहायला मिळाले. एक म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ आणि दुसरे म्हणजे ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी. निवेदिता सराफ आज मराठी सृष्टीतील एक मोठे नाव असले तरी सुरुवातीच्या काळात त्यांनी हिंदी चित्रपटातून एक बालकलाकार म्हणून भूमिका बजावलेल्या पाहायला मिळाल्या.

अपनापन हा त्यांनी साकारलेला पहिला हिंदी चित्रपट यात त्यांना एक बालकलाकार म्हणून ‘आदमी मुसफिर है’ या गाण्यात झळकण्याची संधी मिळाली. ह्या चित्रपटातील हे गाणं लोक आजही तितक्याच आवडीने ऐकताना पाहायला मिळतात.

नामो निशाण, मरते दम तक, घर में राम गली में श्याम हे आणखी काही हिंदी चित्रपट त्यांनी अभिनित केले. यानंतर मात्र त्यांनी आपले पाऊल मराठी चित्रपट सृष्टीकडे वळवले. नवरी मिळे नवऱ्याला, कशासाठी प्रेमासाठी, दे दणादण, अशी ही बनवाबनवी, किस बाई किस, बाळाचे बाप ब्रह्मचारी, अशा एका मागून एक येणाऱ्या अनेक धमाल चित्रपटातून नायिका म्हणून आपल्या भूमिका बजावल्या.

अग्गबाई सासूबाई, बंधन या मराठी मालिकांसोबतच सपनों से भरे नैना, ये जो है जिंदगी, केसरी नंदन या हिंदी मालिकाही त्यांनी आपल्या अभिनयाने गाजवल्या. एक बालकलाकारापासून सुरू केलेला त्यांचा हा जीवनप्रवास खरोखरच उल्लेखनियच म्हणावा लागेल. मराठी सृष्टीतील सोज्वळ अभिनेत्री म्हणून त्यांच्या यशाचा हा आलेख असाच चढता रहावा हीच एक सदिच्छा…

Leave a Reply

Your email address will not be published.