लक्ष्मी मातेचं प्रतीक असते पाल,जाणून घ्या तिचे घरात दिसण्याचे फायदे आणि तोटे ..

प्रकृतीने भविष्यात होणार्‍या विभिन्न घटनांबद्दल मनुष्याला सचेत करण्यासाठी बरेच माध्यम बनवले आहेत. पशू-पक्षी व जीव-जंतू विभिन्न क्रिया-कलपांच्या माध्यमाने आम्हाला भविष्यात होणार्‍या घटनांबद्दल सचेत करतात. वर्तमानात या गोष्टींवर पूर्णपणे भरवसा करू शकत नाही, पण शकुन शास्त्रात पशू-पक्ष्यांपासून मिळणार्‍या संकेतांचे स्पष्ट वर्णन मिळतात.  

घरात वावरणारी पाल देखील भविष्यात होणार्‍या घटनांबद्दल संकेत करते. गरज आहे तर त्या संकेतांना जाणून घ्यायची. आपण बघूया पाल आम्हाला भविष्यातील येणार्‍या घटनांची माहिती कशी देते.  

 1. पाल एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर किंवा उजव्या हातावर प‍डली तर मान सन्मान मिळण्याची शक्यता असते पण डाव्या हातावर पडल्याने धनहानी होऊ शकते. 
 2. जर पाल एखाद्या व्यक्तीच्या उजवीकडून डावीकडे उतरेल तर त्या व्यक्तीचे प्रमोशन आणि धन लाभ होण्याचे योग बनतात.  
   
 3. नवीन घरात प्रवेश करताना जर घर मालकाला मेलेली पाल दिसली तर त्या घरात राहणार्‍या लोकांना आजारपणाची भिती राहते. 
 4. शकुन शास्त्रानुसार दिवसा जेवण करताना जर पालीचे बोलणे ऐकू आले तर लवकरच शुभ बातमी मिळू शकते.
   
 5. स्त्रीच्या डाव्या बाजूवर पाल पडली तर सौभाग्यात वृद्धी आणि उजव्या बाजूवर पडली तर एखादी अशुभ बातमी मिळण्याची शक्यता असते.
   
 6. जर एखाद्या व्यक्तीच्या उजव्या गालावर पाल पडली तर त्याला सुख-सुविधा मिळतात.
   
 7. डाव्या गालावर पाल पडली तर आरोग्याशी निगडित तक्रार राहते.
 8. शास्त्रात लिहिले आहे. या अपशकुनापासून बचाव करण्यासाठी पूर्ण विधी-विधानाने पूजा करूनच नवीन घरात प्रवेश केले पाहिजे.
   
 9. जर पाल गुप्तांगावर पडली तर त्या व्यक्तीला एखादा आजार होण्याची शक्यता असते.  
   
 10. जर पाली समागम करताना दिसल्या तर जुन्या मित्राची भेट होते. 

घरातून पळवा पाल,

 ७ सोपे उपाय”

घरात पाल फिरताना दिसली की किळस वाटते, मनात शंका येते की एखाद्या खाद्य पदार्थात पडून गेली तर.. .
बाजारात पाल मारण्यासाठी अनेक विषारी लिक्विड मिळत असले तरी ते लहान मुलं आणि पाळीव जनावरांसाठीही धोकादायक असतात. अशात पाल पळविण्यासाठी काही घरगुती उपाय करावे.
पाहू काही असेच सोपे उपाय:

१)कॉफी पावडर आणि तंबाखू पावडर मिसळून घ्या.
याच्या लहान-लहान गोळ्या तयार करून तिथे ठेवा जिथे पाली येतात. हे मिश्रण खाल्ल्यानंतर पाली मरतील किंवा पळून जातील.

२)पाली मोरपंखाला घाबरतात. मोरपंख बघून त्यांना जवळपास साप असल्याचा भ्रम होतो म्हणून त्या पळतात. घरात प्रत्येक कमर्‍यात मोरपंख ठेवा.

३)नेफ्थलीनच्या गोळ्या वार्डरोब, वॉश बेसिन व इतर कोपर्‍यांमध्ये ठेवाव्या. अश्या ठिकाणी पाल येणार नाही.

४)कांदा कापून लाइटजवळ लटकवावा. याच्या तीक्ष्ण गंधामुळे पाली पळतात.

५)पाणी आणि मिरपूड मिसळून मिश्रण तयार करा. हे मिश्रण किचन, बाथरूम, सिंक, व घरातील कोपर्‍यामध्ये शिंपडा. या तीक्ष्ण वासामुळे पाली पळतात.

६)अंड्याची साले लटकवून किंवा कोपर्‍यात ठेवल्याने पाल येत नाही.

७)लसणाच्या पाकळ्या ठेवल्याने पण पाली पळतात. तसेच कांदा आणि लसणाचा स्प्रे तयार करून कोपर्‍यात शिंपडू शकतात.”

Leave a Reply

Your email address will not be published.