मासिक पाळीचा त्रास दूर करण्यासाठी सात घरगुती उपाय

अनेक महिलांना मासिक पाळीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारींना सामोरं जावं लागतं. 

कधी कधी काही महिन्यांपर्यंत पाळी न येणं तर कधी २१ दिवसांच्या अगोदरच रक्तस्राव सुरू होणं, अशा प्रकारच्या तक्रारी तर नेहमीच्याच… या सगळ्या तक्रारी निर्माण होतात त्या हार्मोन्समध्ये झालेल्या बदलांमुळे… यावर तुम्ही काही घरगुती उपाय करून हा त्रास दूर करू शकता. 

१. रात्रभर सफेद तीळ पाण्यात भिजवून ठेवा त्यानंतर हे पाणी दिवसातून दोन वेळा प्या. 

२. जीऱ्याचं पाणी पिल्यानं मासिक पाळी नियंत्रणात राहते… सोबतच त्यामुळे होणाऱ्या त्रासापासूनही आराम मिळतो. जिऱ्यांमध्ये असलेल्या लोहामुळे महिलांना मासिकपाळी दरम्यान होणारा त्रास कमी होतो. यासाठी एक चमचा जिऱ्यात एक चमचा मध मिसळून त्याचं दररोज सेवन करा. 

३. कच्ची पपई खाल्लानं तुमच्या मासिक पाळी संदर्भात अनेक तक्रारी दूर होतील. यामध्ये भरपूर पोषण, अॅन्टीऑक्सिडंट असतात. 

४. जास्वंदाचं फुल शरीरातील इस्ट्रोजेन आणि प्रोजिस्ट्रॉनला बॅलन्स करून मासिक पाळी नियमित करण्यास मदत करतं. 
५. तुळशीच्या पानांच्या रसात एक चमचा मध मिसळून घ्या… यामुळे मासिक पाळी नियमित होण्यास मदत होईल. 

६. दररोज द्राक्षांचा रस पिल्यानं तुम्हाला अनियमीत मासिक पाळीपासून सुटका मिळेल. 

७. धने किंवा बडिशेपच्या दाण्यांचा काढा दिवसातून एकदा घ्या. धने किंवा बडिशेप रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी हे पाणी प्या. यामुळेही तुमचा त्रास दूर होईल. 

मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी उपाय

मासिक पाळी सुरू झाल्यावर होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी पोटदुखी सुरू झाल्यावर थोडावेळ आराम करा. जर तुम्ही घरी असाल तर बेडवर झोपा आणि शाळा, कॉलेज, ऑफिसमध्ये असाल तर काही मिनीटे खुर्ची, सोफा अशा ठिकाणी पाच-दहा मिनीटे बसून आराम करा.

मासिक पाळी सुरू होण्याआधी, मासिक पाळी सुरू झाल्यावर काही दिवस कोमट पाणी प्या. ज्यामुळे तुमचे पोट दुखणे कमी होईल

मासिक पाळी सुरू होण्याआधी एक ते दोन दिवस नारळाचे तेल अथवा तिळाचे तेल कोमट करून ओटीपोटावर त्याने मसाज करा.

आलं, काळीमिरी, वेलची घातलेला चहा घ्या ज्यामुळे तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.

मेथीचा लाडू अथवा मेथीचे दाणे टाकून उकळलेले कोमट पाणी प्या. 

मासिक पाळी सुरू असताना आरामदायक कपडे वापरा. अती तंग कपडे वापरल्यामुळे तुमचा त्रास अधिकच वाढू शकतो.

झोपण्यापूर्वी पोट आणि कंबरेवर कोमट तेल लावून गरम पाण्याच्या पिशवीचा शेक घ्या.

मासिक पाळी सुरू असताना सकाळी आणि संध्याकाळी कोमट पाण्याने अंघोळ करा. ज्यामुळे तुमच्या स्नायूंना आराम मिळेल. 

मासिक पाळीमध्ये नेहमी सात्विक आणि हलका आहार घ्या. 

मासिक पाळी सुरू असताना मांसाहार अथवा जड आहार खाणे टाळा

मासिक पाळी सुरू असताना पपई खाण्याने मासिक स्त्राव चांगला होतो ज्यामुळे वेदना कमी होतात.

मासिक पाळीमध्ये एखादं शांत संगीत ऐका ज्यामुळे तुमचं मन निवांत होईल आणि तुमचा त्रासदेखी कमी कमी होऊ शकेल. 

या काळात एखादे आवडते पुस्तक वाचल्याने तुमच्या वेदनांकडे तुमचे दुर्लक्ष होऊ शकेल.

गाजराचा रस घ्या ज्यामुळे मासिक पाळी सुरळीत होते आणि मासिक पाळीचा त्रास कमी होतो.

मासिक पाळी सुरू असताना तेलकट आणि मीठाचे पदार्थ कमी खा

मासिक पाळी सुरू असताना जड व्यायाम करू नका. मात्र तुम्ही या काळात योगासने अथवा प्राणायम करण्यास काहीच हरकत नाही.

पोटावर हिंगाचे पाणी लावल्याने देखील तुम्हाला आराम मिळू शकतो.

मासिक पाळीत डोकं दुखत असेल तर हेडमसाज करा ज्यामुळे तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.

मासिक पाळीच्या काळात आठ तास शांत झोप घ्या

Leave a Reply

Your email address will not be published.