पाणी पिण्याचे खूप फायदे असतात विशेषत: गरम पाणी पिण्याचे….

गरम पाणी पिण्याचे फायदे


जर आपण त्वचेच्या समस्येने अस्वस्थ आहात किंवा त्वचेसाठी वेगवेगळे सौंदर्यप्रसाधने वापरुन थकला असाल तर दररोज गरम पाणी पिणे सुरू करा त्यामुळे आपली त्वचा समस्येतून मुक्तता होईल आणि चेहराही उजाळेल.

सकाळी उपाशी पोटी आणि रात्री जेवल्यानंतर गरम पाणी प्याल्याने पाचक समस्याही दूर होते.

गरम पाणी पिण्याचे खूप फायदे असतात ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. ह्याने कफ और सर्दी लवकर दूर होतात.

वजन कमी करण्यातही गरम पाणी खूप मदत करते. गरम पाण्यात थोडं लिंबू किंवा काही थेंब मधाचे मिसळून पिल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते.


नेहमी तरुण दिसण्याची इच्छा ठेवणाऱ्यांसाठी गरम पाणी एका अतिशय चांगल्या औषधाचे काम करत. 


दमा, उचकी इत्यादी आजारात आणि तळलेले पदार्थ खाल्यानंतर गरम पाणी खूप उपयोगी असते.

हल्ली सर्वत्र प्रदुषण असल्यामुळे बहुतांश लोकांच्या आरोग्य बिघडत असल्याच्या तक्रारी समोर येताना दिसतात. म्हणूनच या आरोग्यांच्या तक्रारांपासून कायमचे दूर राहायचे असेल तर गरम पाणी पिणे सर्वात उत्तम मानले जाते. गरम पाणी पचनशक्ती सुधारून, बंद नाकाला पुन्हा सुरू करण्यापासून आजारपणात आपल्या शरीराला आराम देण्यापर्यंत अनेक गोष्टींमध्ये खूपच उपयुक्त ठरते. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी गरम पाणी पिऊन दिवसाची सुरूवात करावी आणि रात्री झोपतानाही गरम पाणी प्यावं असं ज्येष्ठ मंडळी सांगतात. गरम पाणी पिण्याचे खूप फायदे असतात ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि कफ-सर्दीसारखे आजार लवकर दूर होतात. तसेच जर तुम्ही योग्य पद्धतीने गरम पाणी प्यायलात तर अनेक रोगांवर असलेल्या घरगुती उपायांपैकी तो एक रामबाण उपाय ठरू शकतो.

​चेहऱ्यावर येते चमक


गरम पानी पिल्याने आपल्या चेहऱ्यावर मस्त चमक येते यामुळे आपल्या चेहऱ्यावर तेजपाना कायम टिकून राहतो

शरीरातील टॉक्सीन बाहेर पडतं

योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने घाम आणि लघवीच्या माध्यामातून शरीरातील टॉक्सीन बाहेर पडतं. यामुळे किडनी स्टोनसारख्या समस्या होणार नाहीत. 

अजुन एक :-

आपल्याला कधीकधी जाणवते कि जरावेळ उन्हात किवा थंडीत बाहेर गेल्यावर सर्द्दी खोकला होता. याच्यावर जास्त काही करण्याची गरज नाही. आपण रोज ३ ग्लास गरम पाणी पीत जा, असे केल्याने आपल्याला आराम मिळेल. कधी कधी बेमोसम आपल्याला सर्दी खोकला होतो अशावेळी गरम पाणी पिल्याने सर्द्दी खोकला जातो. गरम पाणी पिल्याने घश्या संबंधी आजार दूर होतात उदा. घश्यात खवखवणे, कफ, आवाज बसणे ई.

महिलांनी गरम पाण्याचा पिण्यासाठी वापर जास्तीत जास्त करावा, कारण पाळी मुळे महिलांना अनेक अडचणीना सामोरे जावे लागते, यावेळी गरम पाण्याने पोटाला शेक दिल्याने आराम मिळतो. यावेळी थोडे थोडे गरम पाणी पीत जा.

Leave a Reply

Your email address will not be published.