परफेक्ट फिगर मिळवण्यासाठी करा ‘हा’ परफेक्ट डाएट, फक्त 10 दिवसात मिळवा एखाद्या मॉडेल सारखी फिगर…

एखादा आवडता ड्रेस घट्ट झाल्यानंतर डाएट करण्याचा विचार 100 पैकी 95  मुली तरी नक्कीच करत असतील आणि मग झिरो फिगर मिळण्याच्या नादात अनेक जण उपवास करु लागतात.

पण बारीक असणे म्हणजे परफेक्ट फिगर नाही. तर परफेक्ट फिगरचीरही काही माप आहेत. या परफेक्ट फिगरमध्ये तुम्ही कुपोषित किंवा थकलेले दिसत नाही. तर या परफेक्ट फिगरमध्ये तुमच्या बॉ़डी शेपसोबतच तुमच्या चेहऱ्यावरही तेजही येते.

आज आम्ही तुम्हाला परफेक्ट फिगरसाठी परफेक्ट असा डाएट सांगणार आहोत.जो तुम्हाला करणे अगदीच सोपे आहे जो महिन्याभरातच तुमच्यामध्ये बदल घडवून आणेल.

वजन कमी करण्यासाठी डाएट प्लॅन

सकाळी उठल्यानंतर काय कराल?

सकाळी उठल्यानंतर जर तुम्हाला बेड टी किंवा कॉफी प्यायची सवय असेल तर ती थांबवा आणि सकाळी सकाळी बेडमधून बाहेर आल्यावर म्हणजेच उपाशी पोटीकोमट पाण्यात लिंबाचा रस घालून एक ग्लासभर पाणी घ्या.

तुमच्या शरीरासाठी हा नवा बदल चांगला आहे. पण प्रत्येक गोष्टीची शरीराला सवय नको म्हणून साधारण एक महिन्यांनी यात बदल करा.

एक महिन्यानंतर ग्रीन टी सुरु करा. आणि त्यानंतर ब्लॅक कॉफी प्यायली तरी चालेल. पण लक्षात ठेवा महिन्यानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्यात याची सवय बदलायची आहे.

आता वेळ नाश्ताची

सकाळी उठल्यावर नाश्ता करण्याची अनेकांना सवय नसते. पण लक्षात ठेवा नाश्ता हा सुद्धा नाश्त्याचा महत्वाचा भाग आहे. आता नाश्तामध्ये काय खायचे असा प्रश्न असेल तर आठवड्याभरासाठी एक वेळापत्रक बनवून ठेवा.

सोमवार – पोहे

मंगळवार – उपमा

बुधवार – ब्राऊन ब्रेड, मल्टीग्रेन ब्रेड आणि पीनट बटर

गुरुवार – ओट्स

शुक्रवार – ब्राऊन ब्रेड आणि अंड्याचे आम्लेट किंवा उकडलेली अंडी

शनिवार – पोहे

रविवार – उकडलेली अंडी किवा स्क्रॅमबल्ड एग्ज

हे आम्ही साधारणपणे बनवलेले वेळापत्रक आहे. तुम्ही यात तुमच्या आवडीप्रमाणे बदल करु शकता आणि घरी तयार केलेल्या नाश्त्याइतके पौष्टिक काहीच नसते हे देखील लक्षात ठेवा.

सकाळचा नाश्ता भरपेट हवा. म्हणूनच हे काही पर्याय चांगले आहेत. पोहे, उपमा, आम्लेट करताना त्यात कमी तेल वापरा. ऑलिव्ह ऑईल वापरल्यास उत्तम. शाकाहारी लोकांनी अंडी वगळता सगळ्या गोष्टी आलटून पालटून खाल्या तरी चालतील.

नोकरी करणाऱ्यांना नाश्ताचे वेगवेगळे प्रकार करुन खाण्यासाठी वेळ मिळत नसला तरी तुम्ही सकाळी लवकर ऑफिसमध्ये जाऊन हे पदार्थ खाऊ शकता.पण तुमचा प्रवास खूप असेल तर तुम्ही घराबाहेर खाऊन जाणेच उत्तम.

पुन्हा भूक लागली?

घरुन  नाश्ता करुन निघालो तरी देखील ऑफिसमध्ये गेल्यावर काहीना काही नक्कीच खावेसे वाटते. अशावेळी तुम्ही शेंगदाण्याची चिक्की, शेंगदाणे किंवा मग फळे खाऊ शकता. त्यामुळे तुम्हाला लागलेली भूक शमेल. यावेळी थोडा तजेला येण्यासाठी ब्लॅक कॉफी घेतली तरी चालू शकेल.

दुपारच्या जेवणाचे काय?

असं म्हणतात की, दुपारचे जेवण हे राजासारखे आणि रात्रीचे जेवण हे भिकाऱ्यासारखे असायला हवे. ते अगदी खरे आहे. कारण दुपारी सगळेच कामात असतात. अशावेळी जेवण रात्रीच्या तुलनेत दुपारी अधिक पचतं आणि शरीराला लागते.

जर तुम्ही वरण, भात, भाजी, पोळी असा साग्रसंगीत डबा नेत असाल तर फारच छान. कारण हेच जेवण योग्य आहे.  शरीराला आवश्यक प्रमाणात प्रोटीन असते. त्या निमित्ताने तुम्ही भाज्याही खाता.

भाज्या करताना त्यामध्ये तेलाचे प्रमाण कमी असू द्या. शक्य असल्यास आणि आवडत असल्यास भाज्या ऑलिव्ह ऑईल किंवा कमीत कमी खोबरेल तेलात बनवा.

जेवणाआधी एक ग्लास पाणी

तुमची पचनशक्ती वाढवण्यासाठी जेवणाआधी साधारण १० ते १५ मिनिटे आधी एक ग्लासभर पाणी प्या.प्रत्येक जेवणाआधी पाणी आल्यास उत्तम साधारण सकाळी ८, ११ दुपारी १ आणि ३ यावेळेत आवर्जून पाणी प्या.

संध्याकाळी काय खाल?

दुपारी १ वाजता जेवल्यानंतर साधारण चार- एक वाजता पुन्हा पोटात भुकेची कावकाव सुरु होते. मग असावेळी भरपूर लोक शेवपुरी, पाणीपुरी, सॅण्डवीच असे काही पदार्थ खाल्ले जातात. पण आजपासून ते बंद करायचे आहे. हे लक्षात घेऊन तुम्हाला संध्याकाळी भूक लागल्यानंतर फळे खायची आहेत.

यामध्ये तुम्हाला पोटभरीची फळे हवी असतील तर कलिंगड, केळ,पपई, असे काही तरी खा. या शिवाय उकडलेले अंड, शाकाहारी असल्यास एक ते दोन छोटे क्युब वाफवलेलं पनीर असं काहीतरी खा.

जर तुम्ही संध्याकाळी व्यायाम करणे पसंत करत असाल किंवा तुम्हाला संध्याकाळीच जीमला जाणे किंवा व्यायम करणे शक्य असेल तर जीमला जाण्याआधी यापैकी काहीही आहार घेऊ शकता.

रात्रीच्या जेवणाची वेळ महत्वाची

नोकरीमुळे जेवणाच्या वेळा पाळणे शक्य नाही. हे अगदी खरे आहे. रात्रीचे जेवण हे 8:30 नंतर होता कामा नये. या जेवणात भाजी पोळी असून द्या. भात यावेळी टाळाच.

जर तुम्ही रात्री अंड खाणार असाल. तर अंड्याच्या पांढऱ्या बलकाचे आम्लेट करुन खाल. या शिवाय जर तुम्हाला दूध आवडत असेल तर मिल्कशेक करुन प्या. बदाम आणि फळांचे मिल्कशेक हे रात्रीच्या वेळी पूरक अन्न असते. यातून तुम्हाला प्रोटीन मिळते.

रात्री कमी खाण्याचे कारण इतकेच असते की, त्यावेळी तुमच्या सगळ्या शारिरीक क्रिया मंदावलेल्या असतात. साहजिकच तुमची पचनशक्ती कमी झालेली असते. म्हणून रात्री थोडं कमीच जेवावे.

अनेकांना गव्हाच्या पोळ्या आवडत नाहीत. त्यांनी भाकरी आवडत असल्यास ती खावी. ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदुळाची भाकरी केव्हाही खाण्यास उत्तम.

शिवाय तुम्ही मासे खात असाल तर माशाची कढी आवर्जून खा. फळांचा किंवा सुका मेव्याचा मिल्कशेक करताना त्यात साखर घालू नका. महत्वाची गोष्ट अशी की, यासाठी स्किम्ड मिल्क म्हणजेच दुधाच्या पावडरचा वापर करा.

डाएटची सुरुवात केल्यानंतर

आता एखादा नवा बदल करायचा म्हटलं की, थोडा फार त्रास होणारच. साधारण एक आठवडाभर तुम्हाला तुमचे पोट भरलेच नाही असे वाटेल.

काहीतरी कमी कमी वाटेल. अरबटचरबट खाण्याची इच्छा होईल पण ते अगदीच सर्वसाधारण आहे. एक गोष्ट तुम्हाला सारखी लक्षात ठेवायची आहे की, तुम्हाला तुमच्या शरीराची काळजी घ्यायची आहे.

भूक लागतेय म्हणून काहीही खाण्यापेक्षा चांगले खा, असे आपल्या मनाला वारंवार समजावून सांगायचे आहे. डाएटचा  परीणाम तुमच्या शरीरावर तर होईलच पण तुमची त्वचा नितळ होऊ लागेल आणि हा बदल तुम्हाला नक्कीच तुम्हाला हवाहवासा वाटेल. कारण चांगली नितळ त्वचा कोणाला आवडत नाही.

डाएट म्हणजे उपाशी राहणे नाही. फक्त वेळा पाळणे आणि योग्य आहार घेणे असे आहे. हेच सांगण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. आता जर तुम्ही किती खायचे याचा विचार करत असाल तर  पोट अगदी पूर्ण भरेपर्यंत खाऊ नका. पोटात थोडी जागा असू द्या. डाएट तुम्हाला तुमच्या क्षमतेनुसार खाण्यासाठी प्रवृत्त करत असते.

डाएट केल्यानंतर बदल लगेच दिसून येत नाही. बदलाला थोडा वेळ जातो. त्यामुळे लगेचच ते बंद करु नका. तुम्हाला काही अडचणी असल्यास तुम्ही त्यात बदल करु शकता.

म्हणजे खाण्याचा अगदीच मोह आवरत नसेल तर आठवड्यातून एकदा तुम्हाला खावासा वाटणारा पदार्थ खायला हरकत नाही. पण तो अगदी खूप दिवस उपाशी असल्यासारखे खाऊ नका. उदा. बर्गर, पिझ्झा, फ्रेंच फ्राईज, कोल्ड्रींक असे काही खावेसे वाटत असेल तर खा. पण मापात खा.

नुसत्या डाएटने तुमच्या शरीराला सुडौलपणा येणार नाही. त्यामुळे तुम्हाला थोडा व्यायाम करणे आवश्यक आहे. शक्य असल्यास घरी व्यायाम करा. पण शरीराची हालचाल असू द्या.

वेळ मिळेल तेव्हा चालायला जा. जीमला जाणे शक्य असेल तर नक्की जा. त्यामुळे नेमके कोणते व्यायाम करायचे याचे योग्य मार्गदर्शनही तुम्हाला मिळेल.

मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणीं सोबत शेयर करा.

अशाच माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

One thought on “परफेक्ट फिगर मिळवण्यासाठी करा ‘हा’ परफेक्ट डाएट, फक्त 10 दिवसात मिळवा एखाद्या मॉडेल सारखी फिगर…

Leave a Reply

Your email address will not be published.