गरोदर बायकांनी हिवाळ्यात अशी काळजी घ्यावी

हिवाळ्याच्या काळात आपल्या आरोग्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचे असते. जेणे करून आजारांपासून लांब राहता येते. त्याच वेळी जर आपण गरोदर असाल तर आपल्याला अधिक काळजी घेण्याची गरज असते. कारण या परिस्थितीत काळजी निव्वळ आपलीच नाही तर येणाऱ्या बाळाची देखील असते. त्या मुळे आपल्याला दुपटीने काळजी घ्यावयाची आहे. हिवाळ्यात योग्य आहार आणि काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊ या की हिवाळ्याच्या काळात कोणती काळजी घ्यावयाची आहे.

  • हिवाळ्याच्या काळात स्वतःला सक्रिय ठेवण्यासाठी गरोदर महिलांनी योगा करायला पाहिजे पण लक्षात असू द्या की एखाद्या तज्ज्ञाच्या सल्ल्यानुसारच योगाचा आपल्या नित्यक्रमात समावेश करावा.
  • गरोदर महिलांना सर्दी पासून संरक्षण आवश्यक आहे. म्हणून उबदार कपडे घाला. जेणे करून आपण थंडी पासून वाचू शकाल. कारण गर्भात वाढणाऱ्या बाळांवर बाहेरच्या हवामानाचे परिणाम होते, म्हणून आपल्याला स्वतःची चांगल्या प्रकारे काळजी घ्यावयाची आहे. पायात मोजे घाला. घरात देखील चपला वापरा.
  • आरोग्यासाठी पौष्टिक आहार घेणं खूप आवश्यक असते. हिवाळ्यात रोग प्रतिकारक शक्ती बळकट राहण्यासाठी आपल्या आहाराची काळजी घ्या. 
  • हिवाळ्यात गरोदर महिलांची त्वचा खूप कोरडी होते या पासून मुक्त होण्यासाठी चांगल्या प्रतीचे मॉइश्चरायझर लावा.या शिवाय आपण बेबी ऑइल देखील वापरू शकता.आंघोळ केल्यावर आपल्या संपूर्ण शरीरावर बेबी ऑइल ने हळुवार हातांनी मॉलिश करून उबदार कपडे घाला.  
  • हिवाळ्याच्या काळात आपल्याला सर्दी,पडसं, ताप सारखी समस्या असल्यास, त्वरितच डॉक्टरांशी संपर्क साधा.स्वतःच्या मनाने कोणत्याही गोष्टींचे सेवन करू नका. या साठी चिकित्सकांचा सल्ला आवर्जून घ्यावा

गरोदर महिलांनी कशी घ्यावी काळजी

जेव्हा स्त्री गर्भव्यस्थेत असते त्यावेळी तिने खाण्या-पिण्यावर विशेष लक्ष देण्याची गरज असते. अशा अवस्थेत त्यांना सर्वसाधारण नेहमीपेक्षा जास्त ऊर्जा आणि कॅलरीची आवश्यकता असते. मातृत्व आणि मुलं या दोघांना एकाच प्रमाणात कॅलरी मिळणे आवश्यक असते त्यासाठी गर्भवती महिलांनी खाण्यांवर विशेष लक्ष दिले पाहिजे.  

गरोदर असताना फळ आणि ज्यूस खूप फायदेशीर असतात. फळे खाल्ल्याने प्रोटीन, कॅल्शियम आणि सिलिकॉन मिळते. तसेच ज्यूस घेतल्याने शरीर ताजेतवाण होते. मात्र ज्यूस पिताना लक्ष ठेवावं की ते ज्यूस ताज्या फळांपासून बनलेलं असावं. ट्रेटा पॅक ज्यूस पिऊ नये. गरोदर महिलांना नाश्तांच्या वेळी दूध आणि डेअरी प्रोडक्टांचा ही वापर करावा.  

तसेच नाश्ताला अंडे किंवा ऑम्लेट ही त्या घेऊ शकतात. पालकसोबत ऑम्लेट खाल्लास ते खूप फायदेशीर असते. यातून एकूण 41 कॅलरीसोबत लोह, फॉस्परस, अॅसिड आणि कॅल्शियम मिळते. 

संपूर्ण आहार म्हणजे ओटचे जाडे भरडे पीठ, मका, डाळी, ब्राऊन तांदूळ देखील गरोदरपणी लाभदायक आहे. त्यात व्हिटॅमिन, प्रथिने, कॅल्शियम आणि फायबर असते जे गरोदर महिलांसाठी जरुरी आहे. 

गरोदर महिलांनी भरपूर पाणी प्यावे. फिल्टर्ड पाण्यांचा उपयोग करावा. फिल्टर्ड पाणी नसल्यास पाणी उकळून प्यावे. बाहेर असताना नेहमी फिल्टर्डयुक्त किंवा बिस्लरी पाणी  प्यावे. 

Leave a Reply

Your email address will not be published.