रामनवमीला अश्या प्रकारे दाखवा श्री राम यांना प्रसाद प्रत्येक इच्छा पूर्ण होईल

चैत्र मासाच्या नवमीला रामनवमी साजरी केली जाते. भारतभर अगदी आनंद आणि उत्साहात हा सण साजरा केला जातो. या वर्षी रामनवमीचा सण हा 21 एप्रिलला साजरा केला जाईल. वेदशास्त्रानुसार त्रेतायुगात रावणाच्या अत्याचारांचा अंत करण्यासाठी आणि पुन्हा धर्माची स्थापन करण्यासाठी भगवान विष्णूंनी पृथ्वीवर मनुष्याच्या रूपात राम अवतार घेतला होता.

साधारणतः दरवर्षी रामनवमीचा सण हा मार्च-एप्रिल दरम्यानच येतो. हिंदू कॅलेंडरनुसार रामनवमी चैत्र महिन्याच्या नवव्या दिवशी असते. जो चैत्र महिन्याचा शेवटचा दिवस असतो. त्यामुळेही हिंदू सणांमध्ये रामनवमीला विशेष महत्त्व आहे. संपूर्ण देशात जरी रामनवमी साजरी केली जात असली.

तरी खासकरून उत्तर भारतात भगवान रामाची जन्मभूमी अयोध्या येथे या सणाचं भव्यदिव्य आयोजन केलं जातं. रामनवमीच्या दिवशी देवळांमध्ये भजन-किर्तनाचं आयोजन केलं जातं आणि अनेक ठिकाणी या निमित्ताने शोभायात्राही काढली जाते. या दिवशी बरेच जण उपवास धरतात.

प्रसाद स्वरूपात पंचामृत श्रीखंड, खीर हलवा यांचा नैवेद्य दाखवला जातो. रामाच्या पूजेसाठी दूध आणि तूपाच्या वापराचं फार मह्त्त्व असतं आणि याच कारणामुळे रामनवमीच्या शुभदिवशी तूपापासून बनवलेले गोड पदार्थ आवडीने खाल्ले जातात. हे पदार्थ नेवैद्य म्हणून दाखवल्यास श्रीराम प्रसन्न भक्तांच्या कष्टाचं निवारण नक्कीच करतात.

उपवास आणि नेवैद्य हा या सणाचा महत्त्वपूर्ण भाग आहेत. रामनमीची माहिती तुम्हाला असेलच. तुम्ही रामनवमी शुभेच्छाही आवर्जून देत असाल. पण तुम्हाला हे माहीत आहे का, या दिवशी प्रभू रामांना तुमच्या राशीनुसार नैवेद्य दाखविल्यास त्यांची अपरंपार कृपा तुमच्यावर होते.

मेष – मेष राशीच्या लोकांनी शुद्ध तुपातील लाडू आणि डाळिंब्याचा नैवेद्य रामाला दाखवावा. यामुळे तुम्हाला नक्कीच लाभ होईल. तुमच्या प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल. तुमचे घरचे तुम्हाला कामात मदत करतील.

वृषभ – तुमची रास वृषभ असेल तर रामनवमीला श्रीरामाला रसगुल्ले नेवैद्य म्हणून ठेवा. तुमची प्रत्येक इच्छा निश्चितच पूर्ण होईल. तुमचे आरोग्य सुधारेल. जुना रोग असेल तर त्यावर तुम्ही विजय मिळवाल.

मिथुन – मिथुन राशीच्या लोकांना काजूपासून बनवलेली कोणतीही मिठाई जसं काजूकतली काजू बर्फी किंवा काजूरोलचा नैवेद्य श्रीरामाला दाखवावा. तुमच्या प्रत्येक कष्टाचं निवारण होईल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील.

कर्क – तुमची रास कर्क असल्यास माव्यापासून बनवलेली मिठाई आणि नारळाचा भोग भगवान रामासमोर दाखवावा. भगवान श्री रामाची कृपा तुमच्यवर सदैव राहील. तुम्हाला अचानक धनप्राप्ती होऊ शकते.

सिंह – सिंह रास असणाऱ्यांनी गूळ किंवा बेलाच्या फळाचा नैवेद्य श्रीरामापुढे ठेवावा. या श्री राम तुम्हाला आशीर्वाद देतील आणि तुमच्यवर खुश होतील. तुमची थांबलेली कामे मार्गी लागतील.

कन्या – कन्या राशीच्या लोकांनी तुळशीची पानं आणि नासपती किंवा कोणतंही हिरव्या रंगाचं फळ रामाला अर्पित करावं. तुमच्या समस्याचं निवारण नक्कीच होईल. तुम्हाला तुमच्या शत्रूपासून सुटका मिळेल. तुम्हला प्रत्येक कामात यश मिळेल.

तूळ – तूळ रास असल्यास कलाकंद आणि सफरचंदाचा नैवेद्य दाखवावा. तुम्ही कुठेतरी प्रवासाला जाण्याचा मार्ग बमवल याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. घरचे तुमच्यवर खुश होतील.

वृश्चिक – तुमची रास वृश्चिक असल्यास गुळाची रेवडी भगवान रामाला अर्पित करावी. तुम्हाला अचानक धनप्राप्ती होणार आहे. तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात.

धनू – या राशीच्या लोकांनी भगवान रामाला बेसनाची चिक्की किंवा बेसनापासून बनवलेली शुद्ध तुपातली कोणतीही मिठाई नैवेद्य म्हणून दाखवावी. नक्कीच लाभ होईल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही कामात यश मिळेल.

मकर – मकर रास असल्यास रामनवमीच्या निमित्ताने गुलाबजाम आणि काळ्या द्राक्षांचा नैवेद्य श्रीरामाला दाखवावा. तुम्हाला लवकरच वाहन आंनद मिळेल. तुम्ही लवकरच कुठेतरी लांब प्रवासाला जाल.

कुंभ – कुंभ राशीच्या लोकांनी चॉकलेटी रंगाची कोणतीही बर्फी आणि चिकूचा प्रसाद श्रीरामापुढे ठेवावा. तुमची सर्व कामे पूर्ण होतील. तुम्हाला तुमचा पगार वाढवून मिळेल. तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल.

मीन – भगवान श्रीरामाला मीन रास असल्यास जिलबी आणि केळ्याचा नैवेद्य दाखवावा. सर्व अडकलेली कामे नक्कीच मार्गी लागतील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराची तुम्हाला साथ मिळेल. जुने भांडण तुमचे मिटतील.

तुमची कुंडली व राशिभविष्य तुमच्या ग्रहांन वर अवलंबून असते. आणि त्याला अनुसरून तुमच्या जीवनात गोष्टी घडत असतात यात काही फरक देखील असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही कोणत्याही पंडित ला किंवा ज्योतिषशास्त्र ला दाखवू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published.