साप्ताहिक राशीभविष्य – दि. १३ डिसेंबर ते १९ डिसेंबर २०२०

मेष – आशावादी आठवडा

एकूण ग्रहमान पाहता पुष्कळशा गोष्टी आपल्या इच्छेनुसार होण्याची शक्यता आहे. कामाची धावपळ करावी लागेल. कृती करण्यावर भर देणे हितकारक ठरू शकते. कौटुंबिक वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करणे योग्य राहील. नोकरदारांनी वरिष्ठांशी मिळते-जुळते घेण्याचे धोरण स्वीकारावे. एखाद्या गोष्टीचा ध्यास घेणे टाळा. व्यवहारात सावधानता बाळगावी. रागावर व खर्चावर योग्य नियंत्रण ठेवा. प्रवासात सावध राहा. प्रकृतीची पथ्ये पाळा, मोसमी आजारांपासून सावध राहा. वैवाहिक जोडीदाराची साथ मिळेल.

वृषभ – नव्या गोष्टी शिकाल

एकूण ग्रहमान पाहता नवनवीन गोष्टी शिकण्याचा आपला मानस राहील. स्थावर-जंगम बाबतीतील प्रश्न सोडविता येतील. एखादी महत्त्वाची खरेदी करण्याची इच्छा राहील. नोकरदारांना दिलासा मिळेल. स्वतःचे कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. कौटुंबिक गोष्टींना, विशेषतः मुलांकडे अधिक लक्ष द्या. प्रवासाचे योग संभवतात. बौद्धिक क्षेत्राला वाव मिळेल. मंगल कार्यात सहभागी व्हाल. दुसऱ्यांना जामीन राहणे टाळा. आपल्या वागण्याचा इतर मंडळी गैरवापर करणार नाही याची दक्षता घ्या. प्रकृतीस्वास्थ्य जपा, खाण्यापिण्याची पथ्ये पाळा, दंतदुखीच्या त्रासाकडे विशेष लक्ष द्या. जोडीदाराची साथ मिळेल.

मिथुन – नवीन आव्हानांना स्वीकारा

एकूण ग्रहमान पाहता काही नव्या आव्हानांना, विशेषतः कार्यालयीन व कौटुंबिक आव्हानांना आपणास सामोरे जावे लागणार आहे. कामाचा उत्साह राहील. नोकरदारांना दिलासा मिळेल. व्यवसायात प्रगती साधता येईल. प्रवासाचे योग येतील. महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. हितशत्रूंच्या कारवायांपासून सावध राहावे. सरकारी नियमांचे पालन करा. आर्थिक बाजू ठीक राहील. ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्या. खाण्यापिण्याची पथ्ये पाळा, सांधेदुखी व पित्त विकारांपासून दक्ष राहा. जोडीदाराची साथ मिळेल.

कर्क – कार्यक्षेत्रात कौशल्य दाखवाल

आपले ग्रहमान पाहता कार्यक्षेत्रात आगळेवेगळे कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. वरिष्ठांशी संबंध चांगले राहतील. स्थावर-जंगमबाबतच्या व घराच्या गोष्टी सुलभ होतील. प्रवासाचे योग येतील. विद्यार्थ्यांनी अध्यय़नात श्रम वाढवावेत. राजकीय मंडळींना दिलासा मिळेल. प्रकृतीची व खाण्यापिण्याची पथ्ये पाळा, पोटाच्या तक्रारींबाबत सावध राहा. जोडीदाराची साथ मिळेल.

सिंह – नियोजन करा 

या सप्ताहाचे ग्रहमान पाहता कामाचा व्याप वाढल्याने आपण प्रत्येक गोष्टींचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षित गोष्टी साध्य होतील. नोकरदारांना दिलासा मिळेल. उद्योग-व्यवसायाला चालना मिळेल. सरकारी नियमांचे पालन करा. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्या. आर्थिक बाजू ठीक राहील. प्रकृतीस्वास्थ्य जपा, खाण्यापिण्याची पथ्ये पाळा, विशेषतः पोटाच्या तक्रारी व उष्णतेच्या विकारांसंबंधी सावध राहा. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. 

कन्या – काहीसा अडथळ्यांचा आठवडा 

आपले ग्रहमान पाहता अनेक प्रकारच्या अडथळ्यांना सामोरे जावे लागणार आहे. वरिष्ठांची मर्जी सांभाळण्याचा प्रयत्न करा. कलाक्षेत्राला चांगले प्रोत्साहन मिळेल. कौटुंबिक वादविवाद होणार नाही याची दक्षता घ्या. एखाद्या राजकीय क्षेत्रात आपला जम बसवू शकाल. प्रवासाचे योग येतील. जीवनसाथीच्या प्रकृतीची काळजी घ्या. बोलण्यावर योग्य नियंत्रण ठेवा. कोणाशीही नाराजी पत्करू नका. प्रकृती जपा, खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. जोडीदाराशी जुळवून घ्या. 

तुळ – प्रगती कराल 

एकूण ग्रहमान पाहता विविध कार्यात प्रगती करण्याची संधी या सप्ताहात मिळेल. आपल्या रागावर व बोलण्यावर योग्य नियंत्रण ठेवल्यास पुष्कळशा गोष्टी सफल होतील. आपल्या कल्पनाशक्तीचा योग्य उपयोग करून पुढे जाण्याचा, ध्येय गाठण्याचा प्रयत्न करा. कलाक्षेत्राला प्रोत्साहन मिळेल. नोकरदारांना दिलासा मिळेल. प्रवासाचे योग येतील. कौटुंबिक वातावरण बिघडणार नाही याची दक्षता घ्या. प्रकृतीची काळजी घ्या, खाण्यापिण्याची पथ्ये पाळा व उष्णतेच्या विकारांकडे लक्ष द्या. जोडीदाराची साथ मिळेल.

वृश्चिक – कार्यक्षेत्रात आगेकूच कराल 

एकूण ग्रहमान पाहता कार्यक्षेत्रात बहुतांश गोष्टींत आपण आगेकूच करू शकाल. नोकरदारांनी वरिष्ठांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा. आपल्या रागावर योग्य नियंत्रण ठेवून आपल्या कार्यात झोकून द्या. कोणत्याही व्यवहारात डोळे झाकून निर्णय घेऊ नका. आपल्या कामाचे चीज झाल्याचे समाधान मिळू शकेल. जीवनसाथीला खूश ठेवा. आपल्या कलात्मक बुद्धिमत्तेचा वापर करा व पुढे चला. प्रकृतीस्वास्थ्य जपा, मोसमी आजारांपासून सावध राहा. जोडीदाराचे सहाय्य मिळेल. 

धनु – सर्वोत्तम राशी 

एकूण ग्रहमान पाहता राशीचक्रातील आपली राशी सर्वोत्तम असणार आहे. विविध कार्यक्षेत्रात प्रगती करण्याची संधी मिळेल. कामकाजात स्पष्टपणा ठेवणे उत्तम राहील. नातेसंबंध बिघडणार नाही याकडे लक्ष द्या. नोकरदारांना दिलासा मिळेल. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्या. भावी योजनांबाबत गुप्तता बाळगा. आर्थिक बाजू ठीक राहील. हाती घेतलेली कामे पार पाडा. प्रकृतीस्वास्थ्य जपा, खाण्यापिण्याची पथ्ये पाळा, मोसमी आजारांपासून सावध राहा. वैवाहिक जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. 

एकूण ग्रहमान पाहता या सप्ताहात आपल्या आशा बहुतांश प्रमाणात पुऱ्या होण्याची शक्यता राहील. स्थावर-जंगमबाबतच्या प्रश्नांना चालना मिळेल. घरातील ज्येष्ठांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या. नको त्या प्रलोभनात अडकू नका. सरकारी नियम व कायदा कटाक्षाने पाळा. आपल्या बोलण्यावर योग्य नियंत्रण ठेवा, कोणाशीही नाराजी पत्करू नका. नोकरदारांना दिलासा मिळेल. उद्योग-व्यवसायात प्रगती साधता येईल. प्रकृतीच्या किरकोळ तक्रारी उद्भवू शकतात. जोडीदाराची साथ मिळेल.

मीन – यशाचे शिखर गाठाल

आपले ग्रहमान पाहता आपण करीत असलेल्या श्रमाने यशाचे शिखर गाठणे सुलभ होईल. आपल्या जबाबदाऱ्या पार पाडता येतील. आपल्या रागावर य़ोग्य नियंत्रण ठेवा. कोणाशीही नाराजी पत्करू नका. नोकरदारांनी वरिष्ठांशी जुळवून घेण्याचे धोरण स्वीकारावे. कलाक्षेत्राला चांगले प्रोत्साहन मिळेल. प्रवास योग संभवतात. मुलांच्या विविध प्रश्नांना सामोरे जा. प्रकृती जपा, मोसमी आजारांपासून सावध राहा. जोडीदाराची साथ मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published.