थंडी सुरू झाल्यानंतर पाय अथवा टाचा फुटणे ही अत्यंत सामान्य गोष्ट आहे. काही जणांच्या पायांच्या टाचा या बारा महिने फुटलेल्या असतात. यामुळे बऱ्याचदा त्रास होतो. चालतानाही आणि अगदी न चालतानाही याचा त्रास होतो.
तसंच फुटलेल्या टाचांमुळे इन्फे क्शन होण्याचा धोकाही जास्त असतो. शिवाय तुम्हाला हव्या तशा फॅशने बल चप्पलही तुम्ही यामुळे घालू शकत नाही.
पण या फुटलेल्या टाचांवर तुम्हाला नक्कीच घरच्या घरी राम बाण इला ज करता येतो. पण त्याआधी नक्की याची कारणे काय आहेत ते आपण पाहूया.
पायाच्या टाचा फुट ण्याचे कारण
पायाच्या तळव्यांची आणि टाचांची त्वचा ही संवेद नशील असून ती पटकन कोरडी होते आणि फाटते. पायाच्या कोरडेपणामुळेच टाचांना भेगा पडतात. याची अनेक कारणं असतात.
पायांमधील कमी मॉई स्चरा ईजमुळे पायांना भेगा पडतात.
जास्त काळ उभे राहिल्यास आणि पाय तुम्ही जर गरम पाण्यात जास्त वेळ ठेवलेत तरीही पायांना भेगा पडतात आणि टाचा फुटतात.
काही जणांना चपलेशिवाय फिरण्याची सवय असते. जमिनीवर चपलेशिवाय फिरण्याने पायाचे तळवे खराब होतात आणि त्याला भेगा पडतात.
थंडीच्या दिवसात गरम पाणी अति प्रमाणात वापरले गेल्यास त्याचा परिणाम पायांवर भेगा पडण्यात होतो.
तुम्ही जर दूध पित नसाल तर त्याचा परिणामही पायाच्या टाचा फुटण्यावर होतो.
मेणबत्ती आणि तिळाच्या तेलाचा करा वापर
पायाला भेगा पडल्या अथवा पायाच्या टाचा फुटल्या तर आपण सहसा क्रिमचा वापर करतो. पण तरीही पायाच्या भेगा तशाच राहतात. तर काही जणी घरगुती उपाय आजमावूनही पाहतात.
पण असं असूनही जर पायाच्या भेगा ठीक होत नसतील तर तुम्ही मेणबत्ती आणि तिळाच्या तेलाचा फुटलेल्या टाचांसाठी उपयोग करा.
तिळाचे तेल हे आपल्या त्वचेसाठी उत्तम मानले जाते. यामुळे तुमच्या पायांच्या टाचा अधिक मऊ आणि मुलायम होण्यास मदत मिळते.
मेणबत्ती आणि तिळाच्या तेलाची पेस्ट हा यावरील उत्तम उपाय आहे. याचा वापर कसा करायचा ते आपण पाहूया.
यासाठी तुम्हाला केवळ मेणबत्ती आणि तिळाच्या तेलाची गरज भासते.
सर्वात पहिले चार चमचे तिळाचे तेल आणि दोन चमचे मेण घ्या.
तेल गरम करा आणि त्यात मेण मिसळा. जेव्हा हे मेण वितळेल तेव्हा हे मिश्रण थंड करा. या मिश्रणात तुम्हाला हवं तर तुम्ही कापूरही मिक्स करू शकता.
रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही हे कोमट करून फुटलेल्या टांचाना लावा.
रोज तुम्ही हे करा आणि आठवड्याभरात तुम्हाला याचा योग्य परिणाम दिसून येईल.
ग्लिस रीन आणि गुलाबपाणी
फुटलेल्या टाचांचा त्रास दूर करण्यासाठी ग्लिस रीन आणि गुलाबपाणी हादेखील एक चांगला उपाय आहे. ग्लिस रीन आणि गुलाबपाणी नीट मिक्स करून घ्या.
त्यानंतर फुटलेल्या टाचांवर लावा. यामुळे तुमचे पाय अधिक मऊ आणि मुलायम होतील. तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. थंडीच्या दिवसात तुम्ही हा उपाय नक्कीच करून पाहू शकता.
मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेयर करा.
अशाच माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.