मनासारखा राजा, राजासारखं मन – श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती

सकाळी मुंबईहून रेल्वेने मी पुण्याला निघालो होतो. गाडी सुटण्यास अजून 10 मिनिटांचा अवधी होता. स्टेश नवरच्या गमती-जमती पाहात वेळ घालवणे सुरु होते.

अचानक माझे लक्ष एका प्रवासी बॅगवर बसलेल्या व्यक्तीवर गेले. मी जरा निरखून पाहिले पण माझा विश्वासच बसत नव्हता कि माझ्यासमोर एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे माझा राजा रेल्वेची वाट पाहत बॅगवर बसून वर्तमानपत्र वाचत बसला होता.

वर्तमानपत्र वाचत बसलेले हे व्यक्तीमत्व म्हणजे दस्तुरखुद्द कोल्हापूरचे युवराज खासदार संभाजीराजे छत्रपती आहेत.

माझी व राजेंची व्यक्तीशः ओळख नाही पण राजे मात्र संपूर्ण महाराष्ट्राच्या परिचयाचे आहेत. महाराष्ट्रात राहणाऱ्या लाखो तरुणांच्या मनात शिवरायांचे वंशज म्हणून त्यांच्याबद्दल जी आदराची भावना आहे तीच माझ्याही मनात आहे. त्यामुळे लगेचच मी उठून महाराज ज्या ठिकाणी बसले होते तिथे गेलो.

बोलण्याचे धाडस होत नव्हते तरीही त्यांच्याशी बोलण्याची इच्छा तीव्र असल्याने धाडस केले.

महाराजांना मुजरा केला. नमस्कार महाराज मी म्हटलं, महाराजांनी हसून प्रत्युत्तर दिले, नमस्कार, कोणत्या गावाचे?

महाराज मी पुण्याचा आहे. एवढ्यावर संभाषण थांबणार असे वाटत असतानाच महाराजांनी आपुलकीने संवाद सुरु केला तसे मनावरचे दड पण कमी झाले व मनमोकळ्या गप्पा सुरु झाल्या.

महाराजांची प्रचंड धावपळ सुरु असते, ते मला कळाले. संपूर्ण महाराष्ट्रभर असलेल्या कार्य कर्त्यांच्या आग्रहास्तव स्विकारलेल्या विविध सांस्कृतिक, सामाजिक कार्य क्रमाला उपस्थित राहण्यासाठी सतत प्रवास करावा लागत असतो.

कोल्हापूरातील त्यांच्या राजवाड्यात ते अभावानेच मुक्कामाला असतात. महाराज जमिनीवर कमी आणि गाडी मध्येच जास्त विश्रांती घेतात असे म्हटले तरी अतिश योक्ती होणार नाही.

औप चारिक चर्चा झाल्यानंतर त्यांना मी रायगड उत्ख ननाच्या संदर्भात आज सोशल मिडीयावर प्रसिद्ध झालेली पोस्ट दाखवली. त्यांनी ती वाचून आनंद व्यक्त केला व म्हणाले, रायगडाच्या विकासा विषयी अनेक लोकांच्या मनात गैरसमज होते ते यानिमित्ताने दूर होत आहेत यात मला समाधान आहे. शिवाजी महाराजांचा वंशज म्हणून मी ही जबाबदारी पेलतच आहे पण याही पेक्षा मी एक शिवभक्त आहे आणि गडावर चुकीचं काही होणार नाही याची दक्षता घेण हे माझ प्रथम कर्तव्य आहे.

बोलणी सुरु असतानाच रेल्वे सुटण्याची सुचना देणारी घंटा वाजली आणि आम्ही उठलो. महाराजांना मी प्रश्न केला, आज रेल्वेनी पुण्याला कसं काय?

त्यावर म्हणाले, कोल्हापूरातून मी बऱ्याच वेळा रेल्वेने प्रवास करत असतो, पण आज मुंबईहून रेल्वेने प्रथमच पुण्याला जात आहे. मुंबई-पुणे रेल्वे प्रवास कसा असतो ते पाहूया म्हणत हसत हसत त्यांनी निरोप घेतला.

मी ही माझ्या डब्यात जाऊन बसलो पण बराच वेळ महाराजांचा चेहरा डोळ्यासमोरुन जात नव्हता.

ओळख नसताना सुध्दा अत्यंत आपुल कीने चौकशी करणे, सुसंवाद साधणे, स्वतः राजा असूनही कोणताही अहं कार मनी लागू न देणारा हा खरोखरच शिवरायांचा व शाहू राजांचा वंशज शोभत आहे.

व्हाट्सऍप वरून साभार. पोस्ट आवडली असेल तर शेयर करायला विसरू नका. आणि अशाच पोस्ट साठी पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *