सकाळी दरवाजा उघडताच करा सर्वात अगोदर हे काम पैसे येण्याचे सर्व मार्ग होतील खुले

सकाळी उठल्या नंतर सर्वात आधी घरातील महिलांनी कायकरावे म्हणजे घरात देवी लक्ष्मीचा वास राहुन सुख व समृद्धी येईल. घराचे मुख्य दार हे नेहमी इतर दारांपेक्षा मोठे व स्वछ असावे. मुख्य दारापुढे कधीही केरकचरा पसारा असू नये. कारण येथूनच देवी लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते. घरातील पाहिलेले सकाळी उठल्या नंतर स्नान झाले की लगेचच एका तांब्यात पाणी घेऊन ते पाणी उंबरट्यावर थोडे थोडे शिंपडावे.

जर यात गंगेचे पाणी असेल तर फारच चांगले पण गंगेचे पाणी नसेल तर घरातील शुद्ध पाणी टाकावे. परंतु रात्री झोपण्यापूर्वीच एक तांब्याच्या तांब्यात पाणी भरून ठेवावे व सकाळी हे पाणी उंबरट्यावर शिंपडावे यामुळे रात्रभर जमलेली उबरट्यावरील नकारात्मकता दार उघल्यावर लगेचच सरळ घरात प्रवेश न करता तिथल्या तिथे नष्ट होईल व आपले घर नकारात्मक उर्जे पासून दूर राहील.

तसेच आपल्यावर जर कोणी काळीजादू करणी केली असेल तर शनिवारी व रविवारी सकाळी आपण अंगण झाडतो त्यापूर्वी अंगणात 2 मग पाणी टाकावे व त्या नंतर झाडून काढावे. या उपायाने ज्या व्यक्तीने आपल्यावर काही करणी केली असेल ती हा आपल्यावर काहीही प्रभाव पडत नाही. ती करणी त्यांच्याकडेच परत जाते.

तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही रोजही करू शकता आणि शक्य नसेल तर फक्त शनिवारी व रविवारी केला तरीही चालेल. घरातील फारशी पुसताना त्यात एक मूठ मीठ टाकावे व त्या पाण्याने फारशी पुसावी. यामुळेही घरातील नकारात्मकता नोघून जाते. प्रत्येक सोमवारी मुख्य द्वारावर आंब्याच्या पानांचे तोरण जरून लावावे.

व पुढील सोमवारी जुने तोरण काढून टाकून द्यावे व नवीन लावावे. यामुळे घरातील सर्व सदस्यांचे स्वास्त्य चांगले राहते व कोणी नेहमी वरचेवर आजारी पडत असेल तर तेही बंद होते. जर तुम्हाला धन प्राप्तीची इच्छा असेल तर बुधवारी अशोकाच्या पानांचे तोरण मुख्य दरवाजावर लावावे व हे तोरणही आठवडाभर राहू द्यावे व पुढील बुधवारी बदलावे.

यामुळे घरात कधीही धनाची कमतरता जानवत नाही. घराच्या मुख्य दरवाज्यावर गणपतींचे फोटो किंवा चित्र जरूर लावावे. पण असे म्हणतात की गणपतीच्या पाठीमागे दरिद्रता असते म्हणून आपण घराच्या बाहेर एक गणपतीचा फोटो लावला असेल तर अगदी त्याच्या मागेच गणपतीचा फोटो आतील भिंतीवरही लावावा. यामुळे गणपतीच्या पाठीमागील दरिद्रता आपल्या घरात येणार नाही.

आपल्या घरात जागोजागी देवी देवतांचे फोटो किंवा मुर्त्या आपण आणून ठेवू नये. करणं देव ही काही शोभेची वस्तू नाही. जर आपण त्यांना शोकेसमध्ये शोभेची वस्तू म्हणून लावले तर तेही आपली शोभा करून टाकतात. म्हणून त्यांना घरातील देवघरातच ठेवावे इतर ठिकाणी मांडून ठेवू नये. त्या शिवाय देवघरात त्यांचे पूजन होते. घरातील इतर ठिकाणी असलेल्या फोटो किंवा मूर्तींचे पूजनहोत नाही.

हे चुकीचे आहे. तसेच गजरात हिंसक प्राण्यांचे फोटो किंवा मूर्तीही ठेवू नये. तसेच बुडणार जहाज ताजमहाल युद्धाचे फोटो नटराजची मूर्ती आशा वस्तूही घरात ठेवू नये. यामुळे घरातील शांतता भंग पावते. घरात भांडण तंटे व वादविवाद होऊ लागतात. तसेच वाहत्या झऱ्याचाही घरात फोटो असू नये. यामुळे घरात पैसा टिकत नाही. पैसा पाण्यासारखाच वाहून जातो.

मुख्य दाराच्या आजूबाजूला 2 स्वस्तिकची चिन्हे जरूर बनवावीत ही चिन्हे काढताना राईच्या तेलात कुंकू टाकून त्या मिश्रणाने स्वस्तिक काढून त्याच्या आजूबाजूला 2 रेषा काढाव्यात. यामुळे आपल्या घरात देवी लक्ष्मी टिकून राहील. थोडेसे तांदूळ घेऊन अर्धा तास भिजत घालावे मग त्यांचे मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून त्यात थोडी हळद टाकावी आणि त्या मिश्रणाने उंबरट्यावर अगदी मधोमध ओम लिहावे.

या उपयामुळेही घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकणार नाही. मुख्य दाराच्या बाहेर तुळशीचे रोप जरूर लावावे. यामुळे घरात सुख समृद्धी येते व नकारात्मक शक्तींना तेथेच रोखले जाते. जर अंगणात जागा असेल तर रुईचे किंवा मंदाचे झाड जरूर लावावे. यामुळे करणी शत्रूभय सर्व निघून जाते व आपल्या घरावर या सर्वांचा काहीही परिणाम होत नाही.

जर आपल्या घराच्या आवारात पिंपळाचे झाड असेल तर ते तेथून अलगत पणे काढून एखाद्या मंदिरात किंवा सर्वजणी ठिकाणी लावावे. घराच्या आवारात पिंपळाचे झाड असेल तर त्यामुळे शनिदोष लागू शकतो. घरात मणी प्लांट असेल तर त्यामुळे घरात देवी लक्ष्मीचे वास्तव्य असते. म्ह ऊन घरात मनी प्लांट जरूर असावा. परंतु घरात मनी प्लांट दक्षिण दिशेला असावा. मनी प्लांट लावताना तो कुंडीत असावा.

जमीनिवर लावू नये नाहीतर त्याची पाने खूप मोठी होतात. मोठ्या पानांच्या मनी प्लांट मुळे दोष निर्माण होतात. म्हणून लहान पानांचाच मनी प्लांट असावा घराच्या मुख्य दारावर आतील बाजूस 3 मोराची पिसे जरूर लावावीत. यामुळे घेरातील कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तो निघून जातो. आपल्या डायनिंग टेबलच्या आसपासही एक मोरपंख जरूर ठेवावे यामुळेही घरात सुख व समृद्धी येते.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.