संकष्टी दिवशी बाप्पांना अर्पण करा हा नैवेद्य सर्व इच्छा पूर्ण होतील

ॐ नमः शिवाय मित्रानो 31 मार्च 2021 बुधवार या दिवशी संकष्टी आलेली आहे. अमावस्या नंतर येणारी संकष्टी ला संकष्ट चतुर्थी असे म्हटले जाते. या दिवशी बळ बुद्धी विद्येचे देवता श्री गणेश यांची पूजा केली जाते. असे मानले जाते की यादिवशी व्रत व श्री गणेशाची पूजा केल्याने जीवनात सफलता प्राप्त होते.

आणि संकटांन पासून सुटका मिळते या दिवशी श्री गणेशांना प्रसन्न करून घेण्यासाठी काही विशेष उपाय तुम्ही केले तर श्री गणेश त्वरित प्रसन्न होतात. व तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. मान्यतेनुसार संकष्ट चतुर्थी ची पूजा ही संध्या काळी करण्याचे विधान आहे. सकाळी लवकर उठून स्नान करून व्रताचा संकल्प करावा.

पूजे मध्ये श्री गणेशांना पिवळी फुले अर्पण करावीत. धूप डीप दाखवावा. श्री गणेशांना प्रिय अश्या दुर्वा अर्पित कराव्यात पूजे नंतर लाडू किंवा मोदकांचा नैवेद्य अर्पण करावा. श्री गणेश हे सर्व देवी देवतांन मध्ये प्रथम पूजनीय आहेत. त्यामुळे कोणतेही कार्य असो श्री गणेशांचे पूजन अवश्य केले जाते.

त्यांची पूजा आराधना करताना तुम्ही काही नियमांचे पालन करून छोटे छोटे उपाय केले तर श्री गणेश बळ बुद्धी व विद्येचे वरदान देतात. त्याच बरोबर सर्व्ह संकटांचा नाश करून तुमची मनोकामना पूर्ण करतात. चला तर मग जाणून घेऊयात संकष्ट चतुर्थी ला केले जाणारे उपाय. संकष्ट चतुर्थी च्या दिवशी व्रत करून.

श्री गणेशांना 21 मोदकांचा नैवेद्य अर्पण केल्याने घरात सुख समृद्धी येते. मघ फाल्गुन महिन्यातील चतुर्थीला श्री गणेशांना समोर चौमुखी दिवा प्राज्वलीत करावा. यामुळे करू सिद्धी होते. या दिवशी श्री गणेशांना गुलाल अर्पण केल्याने धन वृद्धी होते. मित्रांनो जर तुमच्या मनात एखादी इच्छा असेल.

आणि ती पूर्ण व्हावी असे तुम्हाला वाटत असेल. तर या दिवशी श्री गणेशांच्या मस्तकावर 21 दुर्वा अर्पण करायच्या आहेत. लक्षात ठेवा की श्री गणेशांच्या मस्तकावरच या दुर्वा तुम्हाला अर्पण करायच्या आहेत. आणि तुमची जी इच्छा असेल ती मनोमन बोलायची आहे.

आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी श्री गणेशांन जवळ प्रार्थना करायची आहे. या उपायाने तुमच्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण होईल. तसेच तुम्हाला धना संबंधित काही तक्रार असेल. तुम्हाला असे वाटत असेल की जीवनात आर्थिक उन्नती होत राहावी किंवा तुमचे एखादे कार्य असेल जे अनेक अडचणींन मुळे पूर्ण होत नसेल.

तर यासाठी एक आठ मुखी रुद्राक्ष संकष्ट चतुर्थी च्या दिवशी श्री गणेशांना अर्पण करावा. तर यामुळे तूंमची कोणत्याही प्रकारची धन संबंधित कोणतीही समस्या असो ती नक्कीच पूर्ण होईल. हाती घेतलेल्या कार्यात सफलता अवश्य मिळेल.

श्री गणेश हे विग्नहर्ता आहेत त्यांच्या कृपेने जीवनातील सर्व विघ्न दूर होतात. तर मित्रानो धन प्राप्ती साठी मनोकामना पूर्ती साठी किंवा कार्य सिद्धी साठी संकष्टी चतुर्थी च्या दिवशी वरील उपाय नक्की करून पहा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.