कोरड्या आणि निस्तजे केसांची सम स्या ज्यांना असते त्यांना खूपच त्रास होतो. यामुळे केसग ळती आणि सतत हेअर ट्रीट मेंट घेत राहणं हे परवडण्याासारखं नक्कीच नाही.
पण इतकं करूनही केसांवर योग्य परिणाम होतोच असं नाही. अशावेळी तुम्ही घरच्या घरी हेअरमास्क तयार करून तुम्ही केसांची काळजी घेऊ शकता.
केसांसाठी मोहरीचा मास्क अत्यंत उपयोगी ठरतो. मोहरीमध्ये नैसर्गि करित्या हेअर कंडि शनर आढळते. त्यामुळे मोहरीच्या वापराने केसांची ग ळती कमी होते आणि तुम्हाला अधिक घनदाट केस मिळतात.
केसांचा वाढ चांगली होते. त्यामुळे या मोहरीचा हेअरमास्क कसा फायदेशीर ठरतो आणि कसा वापरायचा ते आपण या लेखातून पाहूया.
मोहरी तर सगळ्यांच्याच घरात असते त्यामुळे याचा हेअरमास्क तयार करणेही अत्यंत सोपे आहे. तसंच यामुळे तुमचे केस नैसर्गि करित्या चमकदार आणि घनदाट राहतात.
चमकदार केस
बदलती लाईफ स्टाईल आणि धूळ, मातीमुळे केसांची चमक नेहमीच कमी होत असते. त्यामुळे केसांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे ठरते. तुमच्या केसांची चमकही अशीच निघून गेली असेल तर तुम्हाला केसांची काळजी घ्यायला हवी.
केसांमध्ये चमक आणण्यासाठी मोहरीचा हेअर मास्क तुम्ही वापरू शकता. यामुळे तुमच्या केसांची गेलेली चमक परत येईल आणि तुम्हाला पुन्हा चमकदार केस मिळतील. यामुळेच बरेच जण केसांना मोहरीचे तेल लावतात. याचा वास जरी वेगळा येत असला तरीही याचा गुण मात्र अप्रतिम आहे. आठवड्यातून एक दिवस घरी असताना तुम्ही याचा वापर नक्कीच करून घेऊ शकता.
मोहरीचा हेअर मास्क कसा बनवायचा
मोहरीचे दाणे, अंडे आणि बदाम तेल या तीन गोष्टींचा वापर करून आपण मोहरीचा मास्क घरच्या घरी तयार करू शकतो. याचा वापर कसा करायचा ते आपण जाणून घेऊ.
एका भांड्यात अंडे व्यवस्थित फेटून घ्या.
त्यामध्ये मोहरीची पावडर आणि बदाम तेल घाला आणि मिक्स करा.
हे मिश्रण तुम्ही केसांच्या मुळांपासून लावा.
अर्धा तास तसंच ठेवा आणि मग मा ईल्ड शँ पूने केस धुवा, अन्यथा केसांना येणारा वास जाणार नाही.
केस धुतल्यानंतर ड्राय रचा वापर अजिबात करू नका अन्यथा केस अधिक कोरडे होतील. नैसर्गि करित्या केस सुकू द्या आणि परिणाम पाहा.
मोठ्या केसांसाठी कसा करावा मोहरीच्या हेअर मास्कचा उपयोग
काही मुलींना लांब केस ठेवायला आवडतं. केसांमध्ये पोषण कमी झाल्यास, केस वाढत नाहीत. अशावेळी केसांची काळजी घेणं अत्यंत गरजेचे आहे. लांब केसांसाठीही तुम्ही मोहरीचा उपयोग करून हेअर मास्क तयार करू शकता.
मोहरीची पावडर, अर्धे केळं, ऑ लि व्ह ऑईल आणि विटा मिन ई ची कॅप्सुल घ्या.
मोहरी पावडर आणि केळं व्यवस्थित मिक्स रून घ्या आणि त्यानंतर त्यानंतर त्यात ऑ लि व्ह ऑईल आणि विटा मिन ई ची कॅ प्सुल मिक्स करा.
पेस्ट तयार झाल्यावर केसांना मुळापासून लावा.
अर्धा तास तसंच ठेऊन नंतर केस धुवा.
कोंड्यापासून सुटका
कोंड्यापासून सुटका हवी असेल तर तुम्ही मोहरीपासून तयार केलेला हा हेअरमास्क नक्की वापरायला हवा. यामुळे कोंड्यापासून तुम्हाला त्वरीत सुटका मिळते.
मोहरीची पावडर एक चमचा घ्या त्यामध्ये 2 चमचे दही, लिंबाचा रस आणि मध घालून नीट मिक्स करा.
सर्वात आधी दही आणि मोहरी पावडर मिक्स करून त्यानंतर त्यात लिंबाचा रस आणि मध घाला.
ही पेस्ट तुम्ही केसांना लावा.
साधारण अर्धा तास केसांना तसंच लाऊन ठेवा आणि मग शँ पूने केस धुवा तुम्हाला परिणाम दिसून येईल.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत जरूर शेयर करा.
अशाच माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.