केस ग ळती, कोंडा होणे आणि केस पांढरे होणे यामुळे आपल्यापैकी कित्येक जण काळजीत असतात. केसांना पुरेशा प्रमाणात पो षण न मिळाल्यामुळे केसांच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. घातक रसा यने असलेले प्रोड क्टचा वापर करून केसांवर दुष्प रिणाम होतात. हे धोके टाळण्यासाठी साधे आणि सोपे घरगुती उपचार करा. घरगुती उपायांमध्ये केमि कल आणि रासा यनिक घटकांचा धोका कमी होतो.
केसांसाठी घरगुती उपचार म्हणून तुम्ही बटाट्याची मदत घेऊ शकता. प्रत्येकाच्या घरामध्ये बटाटा सहजरित्या आढळतो. कारण लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच बटाट्यापासून तयार केलेले पदार्थ आवडतात. याचा केवळ खाण्यासाठीच नव्हे तर त्वचा आणि केसांचे आ रोग्य सुधारण्यासाठीही उपयोग केला जाऊ शकतो.
केसांसाठी पोष क असलेले घटक बटाट्याच्या सालीमध्ये आहेत. बटाट्याच्या सालीमुळे केसग ळती रोखली जाऊ शकते आणि केस देखील नैसर्गिकरित्या काळे होतात. यामुळे बटाट्याची साल कचऱ्यामध्ये फेकण्याऐवजी त्यांचा केसांसाठी वापर करावा.
जाणून घेऊया बटाट्याच्या सालीचा कसा करायचा वापर…
बटाट्याच्या सालीतील पोषक घटक
बटाट्याच्या सालीमध्ये पॉ लीफेनोल ऑ क्सिडेज नावाचं एं झाइम असते. या पोषक तत्त्वामुळे केस निरोगी राहण्यास मदत मिळते. याव्यतिरिक्त लो ह, झिं क, कॉ पर, कॅ ल्शिअम, पोटॅशि अम, नियासिन आणि मॅग्नेशि अम हे घटक देखील आहेत. बटाट्याच्या सालीतील या घटकांमुळे केस काळे होण्यास मदत मिळते. केसांची योग्य देखभाल केल्यास समस्या उद्भवणार नाहीत.
साहित्य
आठ ते दहा बटाट्याच्या साली
दोन ते तीन कप पाणी
गुलाब पाणी
स्वच्छ सुती कापड
वाटी
बटाट्याच्या सालीचा वापर कसा करावा?
गॅसच्या मंद आचेवर एक पॅन ठेवा. पॅनमध्ये पाणी घेऊन ते तीन-पाच मिनिटांसाठी उकळत ठेवा. पाणी कोमट झाल्यानंतर पॅनमध्ये बटाट्याच्या साली टाका आणि पॅनवर झाकण ठेवा. बटाट्याच्या साली ३० ते ३५ मिनिटांपर्यंत उकळू द्या. यानंतर गॅस बंद करा आणि बटाट्याच्या साली १५ ते २० मिनिटांसाठी पाण्यामध्येच राहू द्या. गाळणी किंवा स्वच्छ सुती कापड्याचा वापर करून पाणी एका वाटीमध्ये गाळून घ्या. या पाण्यामध्ये एक मोठा चमचा गुलाब पाणी मिक्स करा. हे पाणी थंड होऊ द्या. थोड्या वेळानंतर एका स्प्रे बॉटलमध्ये हे पाणी भरून ठेवा आणि त्याचा वापर करा.
बटाट्याच्या सालीचे पाणी वापरण्याची पद्धत
सर्व प्रथम शॅम्पूनं आपले केस स्वच्छ धुऊन घ्या. यानंतर कंडिशनर लावा. केस नैसर्गिक पद्धतीनं सुकू द्या. यासाठी ड्राय रचा वापर करू नये. केस सुकल्यानंतर कंगवा करा. यानंतर बॉटलमधील पाणी केसांवर स्प्रे करा. सर्व केसांवर हे पाणी स्प्रे करून घ्यावे. बटाट्याच्या सालीचे पाणी ३० मिनिटे केसांमध्ये राहू द्या. यानंतर साध्या पाण्यानं आपले केस स्वच्छ धुऊन घ्या. केस सुकल्यानंतर सी रम लावा. आठवड्यातून एक किंवा दोन वेळा हा उपाय केल्यास केसांच्या समस्या कमी होण्यास मदत मिळेल.
केसग ळतीची कारणे
पौष्टिक घटकांची कमतरता असणे.
आजारपणामुळे केस ग ळणे.
ग र्भधारणेदरम्यान केस ग ळणे.
ताणत णाव असल्यामुळे केस ग ळणे.
अनुवांशिकता हेही एक कारण आहे.
औ षधोपचारांमुळे साई ड इफेक्ट मुळे.
अति प्रमाणात हेअर डाय केल्यामुळे.
केमि कलयुक्त शॅम्पू आणि कंडिशनर.
स्पा ट्री टमेंट मुळे.
अवेळी आणि अर्धवट झोप घेणे.
पुरेशी विश्रांती न घेणे.
सातत्याने चिं तेत राहणे.
फास्ट फूडचे अति सेवन.
तसंच तुम्ही केसांची कशा पद्धतीनं देखभाल करत आहात, हे देखील महत्त्वाचे आहे. कारण यामुळे ही केसांच्या आरो ग्यावर परिणाम होत असतात. चेहऱ्याच्या त्व चेप्रमाणे केसांचीही काळजी घेणे आवश्यक आहे.
केस काळे करण्यासाठी दुसरे घरगुती उपाय
चहा तयार केल्यानंतर बहुतांश जण चहा पावडर देखील कचऱ्याच्या डब्यात फेकतात. या पावडरचा तुम्ही केस काळे करण्यासाठी वापर करू शकता. चहा पावडरमध्ये टॅ निन अॅ सिड असतं, या घटकामुळे पांढरे केस काळे होतात.
साहित्य
१ लीटर पाणी
१० चमचे चहा पावडर/ टी बॅग
असा करा उपयोग
एका पॅनमध्ये पाणी उकळण्यास ठेवा. त्यामध्ये १० चमचे चहा पावडर टाका. मध्यम आचेवर चहा पावडर उकळत ठेवा. यानंतर गॅस बंद करा आणि चहाचं पाणी थंड होण्यास ठेवून द्या. एका हेअर ब्रशच्या मदतीनं चहा पावडरचं मिश्रण आपल्या केसांना त्यांच्या मुळांपर्यंत लावा. ३० मिनिटांसाठी हा पॅक केसांना लावून ठेवा आणि त्यानंतर कोमट पाण्यानं केस स्वच्छ धुवा.
किती दिवस करावा लागेल हा उपाय?
केस काळे करण्याचा हा उपाय केल्यास तुमचे पांढरे केस लगेचच काळे होणार नाहीत. पण मार्केटमध्ये मिळणाऱ्या केमि कलयुक्त डायऐवजी ही पद्धती नैसर्गिक आणि दुष्प रिणाम विरहीत आहे. केस काळे करण्यासाठी आणि केसांवर नैसर्गिक चमक मिळवण्यासाठी याचा प्रयोग एक दिवसाआड करावा.
चहा पावडर आणि कॉफी
साहित्य
१ लीटर पाणी, १० चमचे चहा पावडर आणि ६ चमचे कॉफी
असा करा उपयोग
एका पॅनमध्ये पाणी आणि चहा पावडर एकत्र घ्या. चहा पावडर उकळल्यानंतर त्यामध्ये कॉफी पावडर देखील मिक्स करा. पाच मिनिटांपर्यंत हे मिश्रण उकळू द्यावे. यानंतर गॅस बंद करावा आणि मिश्रण थंड होण्यास ठेवून द्या. हे पाणी गाळून घ्या आणि संपूर्ण केसांना लावा. ३० मिनिटानंतर कोमट पाण्यानं केस स्वच्छ धुवावेत.
केसांसाठी बऱ्याच ह र्बल वस्तू आहेत ज्यांच्या प्रयोगामुळे केसांचे ग ळणे आपण कमी करू शकतो.
जाणून घ्या, आयुर्वेदातील पाच सोपे उपाय जे केसांची ग ळती कमी करू शकतात.
भृंगराज
मजबूत आणि दाट केसांसाठी आयुर्वेदात भृंगराजचे फार महत्त्व आहे. भृंगराज तेलामुळे ट क्कल पडणे कमी तर होतेच, पण अवेळी केस पांढरे होण्यापासूनही बचाव होतो.
ब्राह्मी
ब्राह्मी आणि दह्याचे पॅक तयार करून केसांवर लावल्याने केसांचे ग ळणे कमी होते. ब्राह्मीच्या तेलाने नियमित मसाज केल्यामुळेदेखील केस दा ट होतात.
आवळा
आवळ्यात व्हि टॅमिन सी आणि अँटि ऑक्सि डंट्स भरपूर मात्रेत आहे, जे केसांची वाढ करण्यास मदत करतात. आवळ्यात हिना, ब्राह्मी पावडर व दही मिसळून पॅक तयार करून केसांवर लावावे.
कडूलिंब
कडूलिंबाच्या प्रयोगाने केस फक्त दाटच होत नाही, तर त्यामुळे कोंडा व उवांची समस्यादेखील दूर होते. कडूलिंबाच्या पानांची पावडर तयार करून घ्या. त्यात दही किंवा नारळाचे तेल मिसळून मसाज करायला पाहिजे.
रिठा
रिठ्याच्या प्रयोगाने केस काळे आणि दाट होतात. रिठा पावडरमध्ये तेल मिसळून डोक्याची मसाज केल्याने केसांची ग ळती थांबते.
माहिती आवडली असेल तर मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेयर करा.
अशाच माहितीपूर्ण लेखांसाठी आताच आपले पेज लाइक करा.
खुपचसुंदर छान सल्ला