10 मिनिटात चेहरा बनवा चमकदार

लग्न कार्यात किंवा एखाद्या कार्यक्रमात, पार्टी मध्ये जाण्या अगोदर काय करावे? लग्न, पार्टी किंवा इतर कार्यक्रमात जाण्यासाठी सगळेच आपण कसे आकर्षित दिसू यासाठी वेगवेगळे उपाय करतात, खासकरून महिला. आपण जास्तीत जास्त सगळ्यांपेक्षा सुंदर दिसण्याचा प्रयत्न करतात. आणि सगळ्यांना आपल्या कडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. लग्नकार्य, पार्टी मध्ये त्यांना फोटो शूट करायला आवडते यासाठी त्या सजतात. पण आजकालच्या काळात त्यांना यासाठी वेळ भेटत नाही आणि स्वताची त्यांना नीट तयारी करता येत नाही.

त्यांच्याकडे वेळ नसल्यामुळे त्यांना मना नुसार सजता येत नाही. आपण सुंदर दिसत नाही, आपला मेक अप नीट झाला नाही म्हणून त्या फोटो काढायला लाजतात. आणि बऱ्याच वेळा त्यांच्या कडे वेळ नसल्या मुळे त्यांना आपल्या चेहऱ्याची देखरेख करता येत नाही. यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स उठणे, डार्क सर्कल, तेलकट त्वचा, शुक्ष्क त्वचा यांसारख्या समस्या होतात. यामुळे आपण आकर्षित दिसत नाही.

आपल्याला लग्नकार्यात, पार्टी किंवा इतर कार्यक्रमात जाण्याआधी आपण काही घरगुती उपाय करून पहा. आपल्या त्वचेवर जमलेली धुळ आणि मृत त्वचा काढायची असेल तर आपण २ चमचे मध, २ चमचे ऑंरेंज जूस (संत्राचा रस) आणि त्यात १ चमचा साखर मिळवा, यात लिंबाचा रस मिळवा आणि मध. संत्र्याचा रस व साखर एका वाटीत घेऊन चांगले मिसळून घ्या व त्याच्यात लिंबाचा रस टाका आणि नंतर हा मिश्रण आपल्या चेहऱ्यावर लावा. लिंबाचा तुकडा आपल्या चेहऱ्यावर हळू हळू फिरवा असे कमीत कमी १५ मिनिटे करा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या. साखरेचा वापर फक्त पदार्थान मध्ये गोडवा आण्यासाठी होत नाही तर साखरेचे इतर अनेक उपयोग आहेत.

साखर चेहर्याच्या साफ सफाई साठी खूप फायदेमंद आहे. कारण साखरेमुळे चेहऱ्यावरील डाग, धब्बे, धूळ दूर होते. आणि याच्यासोबत लिंबाचा वापर केला तर अजून फायदेमंद ठरेल कारण लिंबामध्ये ब्लिचिंग property खूप असते आणि संत्र्यामध्ये पोषक तत्व असतात ज्यामुळे आपली स्कीन टोन वाढते. जर आपण या मिश्रणाचा वापर आपल्या चेहऱ्यावर करत असाल तर आपल्या चेहऱ्यावरील धूळ, डेड स्कीन सेल्स, निघून जाईल आणि याच्या नंतर आपल्याला एक फेस प्याक लावायचा आहे ज्यामुळे आपण सुंदर व आपली त्वचा चमकदार होईल. हा फेस प्याक बनवण्यासाठी ३ चमचे बेसन घ्या व यात बदाम तेल मिळवा आणि यात अर्धा चमचा हळद मिळवा तसेच यात एक चमचा मध आणि थोडा दुध मिळवा आणि चांगल्या प्रकारे हा मिश्रण मिसळून घ्या आणि याची एक पेस्ट तयार होईल हि पेस्ट हलक्या हलक्या हातानी आपल्या चेहऱ्यावर लावा आणि काही वेळा साठी तसेच ठेवा. सुकल्यावर हि सुकलेली पेस्ट हळू हळू काढा आणि थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या. आपल्याला कदाचित माहित नसेल बेसन च्या पिठामुळे आपल्या चेहऱ्या वरील नको असलेले केस दूर करायला मदत करते. मधा मुळे आपल्या चेहऱ्याची स्कीन कोमल होते व आपल्या त्वचेतील ओलावा(moisture) राहतो. बदामाचा तेलामुळे आपली त्वचा चमकदार होईल. कच्च्या दुधामुळे आपल्या चेहऱ्यावरील डेड स्कीन सेल्स निघून जातील व आपल्या चेहऱ्यावर ग्लो येईल. या प्रक्रीयेमुळे आपल्या चेहऱ्यावर लगेच चमक येईल.

या वरील घरगुती उपायांचा वापर करून आपण कोणत्या हि कार्यक्रमात जाऊ शकता. आणि हे खूप कमी खर्चीक आहेत व या मुळे आपला जास्त वेळ सुद्धा वाया जात नाही

काळजी घ्या

तीव्र उन्हात जाणे टाळा. आवश्यकता असेल तरच उन्हातून प्रवास करावा.

अति धूम्रपान टाळा. यामुळे चेहऱयाची चमक निघून जाते. त्वचेवरील सुरकुत्या वाढतात.

एक मिनिटात चेहरा चमकदार

बटाटय़ाचे बारीक तुकडे करून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱयाला लावा. १० मिनिटांनी चेहरा धुवा. बटाटय़ामधे ब्लिचिंगचे गुणधर्म असतात. त्यामुळे डेड स्किन निघून जाते. रंग उजळतो. चेहऱयावरील डाग दूर होतात. हा उपाय करताना बराच वेळ तयार करून ठेवलेल्या बटाटय़ाची पेस्ट वापरू नका. यामुळे त्वचेला संसर्ग होण्याची शक्यता असते. जर तुम्हाला कमीत कमी वेळात चेहरा उजळ करायचा असेल तर बटाटय़ाच्या चकत्या कापून त्या चेहऱयावर ठेवा. यामुळे चेहऱयाचा ग्लो वाढतो

चेहरा उजळ होण्यासाठी आहारात केळं, दूध, दही, फरसबी अशा पौष्टिक भाज्या, फळे आणि पदार्थांचा आहारात समावेश करा. यामुळे चेहऱयाची चमक वाढते

माहिती आवडली असेल तर आताच मित्रांसोबत शेयर करा.
अशाच उपयुक्त आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published.