जाणून घ्या…रात्री झोपण्यापूर्वी काय करावे,काय करू नये !

झोपण्यापूर्वी काय कराल?

ध्यान करा :
अंथरूणावर जाण्यापूर्वी १० – २० मिनिटं ध्यान करा. यामुळे दिवसभराच्या चिंता दूर होतात. तुमचा मेंदू शांत राहील. संशोधकांनीसुद्धा हे सिद्ध केले आहे की, ध्यान हे नैराश्य, उत्तेजना, अनिद्रा यामध्ये खूप उपयुक्त ठरते.

बाथरूमला अवश्य जा :
जर तुम्हाला लघवीला जावं, अस वाटत नसलं तरी झोपण्यापूर्वी एकदा जाऊन या. ब्लॅडर जेवढा रिकामा करू शकता तेवढा करा. आपल्या किडन्या रात्रभर सतत काम करत असतात. सकाळपर्यंत ब्लॅडर लघवीने पूर्ण भरून जातो. जर तुम्ही लघवीला जाऊन आला नाही तर तुम्हाला रात्री मध्येच बाथरूमला जाण्याची गरज भासू शकते.

यामुळे झोपेत अडथळा येतो.

आठ वाजेपर्यंत जेवा :
आठ वाजल्यानंतर जेवू नका. यामुळे पचन यंत्रणा खराब होते. वजनही वाढतं. रात्री स्नॅक्सचे सेवन करणं टाळा. झोपण्यापूर्वी दोन – तीन तास आधी जड अन्न खाणं टाळा. रात्रीचे जेवण झाल्यानंतर द्रव पदार्थांचे सेवन करणं टाळा.

झोपण्यापूर्वी हे करू नका :

चहा – कॉफी पिऊ नका :

पाच वाजेनंतर चहा – कॉफीचं सेवन करू नका. शुगर इन्शुलिनच्या पातळीला वाढवते. ज्यामुळे झोपण्यात अडचण येऊ शकते.

गॅजेट्सचा वापर टाळा :

रात्रीच्या वेळेस अधिक वेळ टीव्ही बघणे किंवा इंटरनेटचा वापर करण्याने मेंदुमध्ये हार्मोनच्या पातळीवर परिणाम होतो. झोपण्यापूर्वी एक तास आधी गॅजेट्सचा वापर करणं बंद करा

रात्री व्यायाम करू नका :

व्यायामामुळे हृदयाची धडधड वेगवान होते. ज्यामुळे रक्तप्रवाह वेगवान होतो. म्हणून रात्री व्यायाम करणं टाळा.

रात्री झोपण्यापूर्वी नियमित खा नारळाचा एक तुकडा, होतील ‘हे’ ७ फायदे

धार्मिक कार्य, पूजाविधी यामध्ये नारळाला खूप महत्व आहे. शिवाय नारळाचे इतरही अनेक फायदे आहेत. म्हणूनच नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात. रात्री झोपण्यापूर्वी नारळाचा एक तुकडा खाल्ल्यास विविध आरोग्यदायी फायदे होतात. याचे इतरही अनेक फायदे असून त्याची सविस्तर माहिती घेवूयात.

हे आहेत फायदे

सनस्क्रीन

नारळाचे तेल उत्कृष्ट सनस्क्रीन असून उन्हात जाण्यापूर्वी नारळाचे तेल लावून बाहेर पडावे. यामुळे महागडे सनस्क्रीन वापरण्याची गरज नाही.

मळमळ

मळमळ होत असल्यास नारळाचा एक तुकडा हळूहळू चावून खाल्ल्याने मळमळ बंद होते.

हृदयरोग

नारळामध्ये गुड कोलेज असते यामुळे हृदय निरोगी राहते.

अ‍ॅलर्जी

हे एक चांगले अँटीबायोटीक आहे. यामुळे प्रत्येक प्रकारची अ‍ॅलर्जी दूर राहते.

पिंपल्स

पिंपल्स दूर करण्यासाठी काकडीच्या रसामध्ये नारळाचे तेल मिक्स करून लावा.

पोट होईल साफ

पचनाची समस्या असल्यास नारळाचा एक तुकडा खाऊन झोपावे. यामुळे सकाळी पोट साफ होते. यातील फायबरमुळे पोट साफ होते.

नाकातून रक्त


नाकातून रक्त येते असल्यास नारळ हे औषधाप्रमाणे आहे. अशा वेळी खोबरे खडीसाखरेसोबत खावे.

Leave a Reply

Your email address will not be published.