तुम्ही सुद्धा सनस्क्रीन वापरत असाल तर एकदा नक्की पहा याने चेहऱ्याला काय नुकसान होते ते

खरं तर सनस्क्रिन लावण्याचा सल्ला प्रत्येक ऋतूमध्ये देण्यात येतो. पण उन्हाळ्याच्या दिवसात तर याचा आवर्जून वापर करायला हवा. आपण नेहमीच सनस्क्रिनचा वापर आणि त्यामुळे होणारे फायदे वाचत आलो आहेत. सूर्याच्या हानिकारक किरणांपासून आपल्या त्वचेला संरक्षण देण्यासाठी नक्ची याचा उपयोग होतो.

इतकंच नाही तर त्वचेवर येणारे काळे डाग, पिगमेंटेशन आणि स्किन टोन खराब झाल्यास त्यापासूनही सनस्क्रिनमुळे संरक्षण मिळते. पण जर सनस्क्रिनचा अधिक वापर केला आणि त्याचा योग्य वापर झाला नाही तर नक्की काय होते याबाबतही तुम्हाला माहिती असण्याची गरज आहे. सनस्क्रिनमुळे नक्की काय नुकसान होऊ शकतात हे आपण या लेखातून जाणून घेऊया.

तसं तर सनस्क्रिनचा वापर हा प्रत्येक महिलेने करायला हवा. जेणेकरून त्वचेची योग्य काळजी घेता येईल. पण तुमची त्वचा जर संवेदनशील असेल तर तुम्हाला कोणते सनस्क्रिन वापरत आहात याची योग्य पद्धतीने खात्री करून घेता यायला हवी. सनस्क्रिनमधील घटक हे संवेदनशील त्वचेवर नेहमी त्रासदायक ठरतात.

त्वचेला कोरडेपणा, खाज आणि सूज तसंच जळजळ निर्माण करण्यासारख्या समस्या यामुळे निर्माण होतात. सनस्क्रिन खरेदी करण्यापूर्वी नेहमी पॅच टेस्ट करून घ्या. विशेषतः तुमची त्वचा संवेदनशील असेल तर तुम्ही हा मार्ग स्वीकारायला हवा. जर सनस्क्रिन तुमच्या त्वचेला त्रासदायक ठरत असेल तर लगेच चेहरा धुवा.

तुम्हाला जर अॅक्नेची समस्या असेल तर सनस्क्रिन लावल्यानंतर तुमच्या त्वचेची ही समस्या अधिक वाढीला लागते. जर तुम्ही ऑईल बेस्ड सनस्क्रिनचा वापर करत असाल तर ही समस्या अधिक वाढते. सनस्क्रिनमध्ये असणारे केमिकल्स तुमच्या त्वचेला हानिकारक ठरू शकतात आणि अॅक्नेशिवाय लालपणा.

खाज आणि सूज येण्यासही कारणीभूत ठरू शकते. साधारणतः अॅक्नेची समस्या वाढण्याचे कारणच सनस्क्रिन ठरू शकते. त्यामुळे तुम्ही अशा सनस्क्रिनचा वापर करा जे तुमच्या त्वचेच्या टाईपला योग्य ठरते. नॉन ग्रीसी आणि नॉन कॉमेडोजेनिक सनस्क्रिन हे तुमच्या त्वचेसाठी जास्त फायदेशीर ठरू शकते.

याशिवाय तुमच्या चेहऱ्यावर वापरण्यात येणारे सनस्क्रिन हे शरीरासाठी असणाऱ्या सनस्क्रिनपेक्षा वेगळे असते हे लक्षात घ्या. सनस्क्रिनच्या अतिवापरामुळे डोळ्यांनाही त्रास होतो. डोळे हा अत्यंत कोमल भाग आहे. सनस्क्रिन चुकूनही डोळ्याच्या आत गेलं तरीही डोळ्यांची जळजळ होऊन तुम्हाला डोळ्यांचा त्रास सुरू होऊ शकतो.

तसंच यामुळे डोळ्यांची संवेदनशीलता कमी होऊ शकते. त्यामुळे याचा वापर अति करू नका. चेहऱ्यावर सनस्क्रिन लावताना आपल्या डोळ्यांच्या खाली अथवा डोळ्यांच्या आजूबाजूला लाऊ नका. या गोष्टीची काळजी घेणे गरजेचे आहे. सनस्क्रिनमध्ये अनेक तऱ्हेच्या केमिकल्सचा वापर करण्यात येतो.

यामुळे तुमच्या त्वचेवर अलर्जी निर्माण होते. लालपणा, खाज, सूज आणि चेहऱ्यावर चट्टे येणे या गोष्टीचे संकेत देतात की तुमच्या सनस्क्रिनमुळे तुम्हाला अलर्जी येत आहे. तसंच यामुळे तुमची त्वचा अधिक संवेदनशील होते. काही सनस्क्रिनमध्ये वापरण्यात येणाऱ्या PABA अर्थात पॅरा अमिनो बेंजॉईक अॅसिडमुळे तुम्हाला ही अलर्जी येऊ शकते.

त्यामुळे सनस्क्रिनचा वापर करताना हा योग्य प्रमाणात करायला हवा. सनस्क्रिन घेताना त्यामध्ये कोणते घटक आहेत याची शहानिशा करून घ्यावे. तसंच हायपोलेर्गेनिक लेबल असणारे सनस्क्रिन तुम्ही खरेदी करा. याशिवाय तुम्ही 24 तासाची एक पॅच टेस्टही करून पाहू शकता. यामुळे सनस्क्रिनचा तुमच्या त्वचेवर कोणताही वाईट परिणाम होत नाहीये हे तुम्हाला कळेल आणि वापरणं सहज शक्य होईल.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.