स्वयंपाक करताना करा 1 काम गरिबी दारिद्रय जाईल कायमचे घर सोडून

नमस्कार मित्रांनो ज्योतिषशास्त्र व वास्तुशास्त्र यामध्ये आपल्या प्रत्येक अडचणींचा उपाय सांगितलेला आहे. घरात काही संकट आले काही अडचण आली तर त्याचे समाधानही घरातच असते. आपल्या घरात काही वस्तू अशा ठेवलेला असतात किंवा केल्या जातात.

की त्यामध्ये भगवंतांचा आशीर्वाद तर असतोच परंतु त्यात त्यांचा निरादर ही होतो. त्यामुळे आपल्याला आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. तसेच कामांत अडथळे सततचे आजारपण अशांतता अस्थिरता या सर्व संकटांचा सामना करावा लागतो.

मी आज तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहे. ज्यांना घरातील सर्व सदस्यांनी लक्षात ठेवावे. विशेष करून घरातील स्त्रियांनी या गोष्टीकडे जास्त लक्ष द्यावे. कारण घरात जास्तीत जास्त वावर स्त्रियांचाच असतो. स्त्रियांनी फक्त ही चार कार्य केली तरीही घरात कधीही संकट अडचणी बाधा प्रवेश करू शकणार नाही.

सकाळी उठल्या बरोबर लगेच सर्वात आधी घराची स्वच्छता करावी आणि मग स्नान करून त्यानंतरच किचनमध्ये प्रवेश करावा. स्नान न करता किचनमध्ये प्रवेश केल्यास देवी अन्नपूर्णेचा निरादर केल्यासारखे होते व अशा घरात अन्नाला बरकत राहत नाही.

घरातील झाडू अशा ठिकाणी ठेवावा जेथे कुणाची नजर पडणार नाही. म्हणजे झाडू नेहमी कोणाला दिसणार नाही अशा ठिकाणी लपवून ठेवावा. तसेच झाडू कधीही उभा ठेवू नये. झाडूला कधीही पाय लावू नये आणि चुकून पाय लागलाच तर आधी झाडूला नमस्कार करावा. झाडूला पाय लागणार नाही अशा ठिकाणी झाडू ठेवावा.

आपले पैसे दागिने धन ठेवण्याची जी जागा असते म्हणजेच तिजोरी या तिजोरीत एक लाल कपडा अंथरून ठेवावा. असे मानले जाते की तिजोरीत लाल कपडा टाकल्यास घरातील धनात नेहमी वृद्धी होत राहते. सकाळी स्वयंपाक झाल्यानंतर आपण जे काही भोजन बनविले असेल त्यातील भगवंतांना नेवेद्य दाखवावा.

आणि त्यानंतरच आपण व आपल्या परिवाराला भोजन द्यावे. यामुळे देवी अन्नपूर्णा आपल्यावर नेहमी प्रसन्न राहते. आशा घरात कधीही अन्नधान्याची कमतरता राहत नाही. मित्रांनो या साध्या सोप्या गोष्टी करा आणि आपले जीवन सुखी समाधानी व समृद्ध बनवा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.