स्वयंपाक घरातील या गोष्टींचा वापर करा फाटलेल्या टाचा एका रात्रीत बऱ्या होतील

हिवाळा आणि उन्हाळ्याच्या रुतूमध्ये दोन्ही हंगामात फाटलेल्या टाचांची समस्या उदभवते. आणि फाटलेल्या टाचा पायांचे सौंदर्य खराब करतात. फाटलेल्या टाचांमुळे बर्‍याच वेळा मुली हिल्स चे सँडल घालण्यास असमर्थ असतात. कारण फाटलेल्या टाचा.

तिला कुणालाही दाखवायला आवडत नाहीत. अनेक कारणांमुळे टाचा आणि खोटे फुटतात. आज आम्ही आपल्याला या समस्येपासून मुक्त होण्यासाठी घरगुती टिप्सबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात.

नैसर्गिक मॉइश्चरायझर केळीच्या आत आहे. व्हिटॅमिन A, B6 आणि C केळीच्या आत असतात जे आपल्या त्वचेची लवचिकता टिकवून ठेवतात. रात्री झोपण्यापूर्वी केळीची योग्य पेस्ट बनवून फाटलेल्या टाचांनवर लावा.त्यानंतर 20 मिनिटे तसेच राहूद्या.

आणि 20 मिनिटा नंतर फाटलेल्या टाचा गरम कोमट पाण्याने धुवून घ्या दोन आठवड्यांपर्यंत हा उपाय रोज सतत करा. नैसर्गिक मॉश्चरायझर म्हणून मध देखील ओळखले जाते. मध त्वचेतील ओलावाची समस्या दूर करते. फाटलेल्या टाचांना कोमट पाण्यात 10 मिनिटे भिजवा आणि नंतर त्यावर मध घाला.

प्यूमीस स्टोन किंवा बोटांनी मध चोळून फाटलेल्या टाचा स्वच्छ करा. झोपेच्या आधी हा उपाय दररोज करा. तीळाचे तेलदेखील फाटलेल्या टाचांचा उग्रपणा दूर करते आणि त्यांना ओलावा देते तसेच फुटणे टाळते. रात्री झोपेच्या आधी टाचा व्यवस्थित धुवून त्यावर तिळाचे तेल लावा.

त्यानंतर पायाला मोजे घाला आणि झोपा. सकाळी उठल्यानंतर त्याला कोमट पाण्याने धुवा हे तुम्हाला दररोज रात्री झोपताना करायचे आहे. स्क्रब म्हणून बेकिंग सोडा खूप चांगला आहे. हे आपल्या टाचांन मधून मृत त्वचेचे पेशी काढून टाकते आणि मऊ ठेवते.

यामुळे पायांचा घाण वासही दूर होतो. अर्धा टब कोमट पाण्यात 3 चमचे बेकिंग सोडा घाला आणि त्यात आपले पाय 15 मिनिटे भिजवा. त्यानंतर फाटलेल्या टाचांना प्युमीस स्टोनने घासून घ्या आणि नंतर पाय धुवून त्यावर मॉइश्चरायझर लावा.

तांदळाचे पीठ हे पायांच्या स्किनला एक्सफोलिस्ट करण्यासोबतच डेड स्किनची समस्या दूर करते. यामुळे उलणा-या टाचा आणि ड्रायनेस पासुन आराम मिळतो. तांदळाच्या पीठाला घरगुती स्क्रब म्हणून वापरता येते.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.