टॉमेटोने आरोग्य आणि सौंदर्य दोन्ही मिळवा

टॉमेटोचा वापर अन्नाच्या चववाढी साठी करतात. पौष्टिक गुणधर्माने समृद्ध टॉमेटो आरोग्य आणि सौंदर्यासाठी खूप फायदेशीर आहे. नियमितपणे टमाट्याच्या रसाचे सेवन केल्याने आरोग्य आणि सौंदर्य दोन्ही मिळवता येत. टॉमेटो आपल्याला सुंदर त्वचेची इच्छा मिळविण्यासाठी उपयुक्त आहे. बरेच लोक टॉमेटो सॅलड किंवा कोशिंबीरच्या रूपात घेणे पसंत करतात. तसेच आपणास सांगू इच्छितो की टॉमेटोचे रस किंवा ज्यूस दररोज प्यायल्याने त्वचेचे आजार बरे होतात चेहऱ्यावर तजेलपणा आणि चकाकी येते.

फायदे जाणून घ्या-


* अपचनाच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी टोमॅटोच्या रसात सैंधव मीठ आणि सुंठ मिसळून प्यायल्याने आराम मिळतो. 

* टॉमेटोच्या रसात काळी मिरी आणि वेलचीपूड मिसळून सेवन केल्याने जीव घाबरणे, मळमळण्यापासून आराम मिळतो.

* पचन क्रिया दुरुस्त करण्यासाठी टॉमेटोच्या रसात आलं आणि लिंबाचा रस, थोडंसं सैंधव मीठ टाकून प्यायल्याने पचन सुरळीत राहतं.

* टॉमेटोच्या रसाचे दररोज सेवन केल्याने पोटाशी निगडित सर्व त्रासापासून सुटका मिळू शकते.


* टॉमेटोच्या सूप मध्ये काळी मिरी टाकून नियमितपणे प्यायल्याने बद्धकोष्ठतेसारख्या त्रासापासून सुटका होते. तसेच चेहऱ्यावर चकाकी आणि शरीरात स्फूर्ती बनून राहते.

* कफ किंवा खोकल्यापासून त्रस्त असाल तर टॉमेटोच्या सुपात काळी मिरपूड किंवा लाल तिखट टाकावे आणि या सुप दररोज गरम प्यायल्याने कफ, खोकला, श्लेष्मा किंवा थुंकीच्या त्रासापासून आराम मिळतो.


टोमॅटोचे त्वचेसाठीचे फायदे –

* त्वचेसाठी टोमॅटो फायदेशीर असल्याचे मानले जाते. याचे सेवन केल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. तसेच टोमॅटो अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून त्वचेचे रक्षण करतं, जे त्वचेवर रेषा आणि सुरकुत्या होण्याचे प्रमुख कारण असतं.

* टोमॅटोचे रस त्वचेसाठी फायदेशीर आहे. जर आपल्याला मुरुमांचा त्रास होत असल्यास, टमाट्यांचे सेवन करून आणि याला चेहऱ्यावर लावल्याने आपण मुरूम आणि पुळ्या, पुटकुळ्यांपासून सुटका मिळवू शकता.

* एक चमचा टोमॅटो रसात हरभऱ्याच्या डाळीचे पीठ आणि अर्धा चमचा मलई मिसळून लावल्याने चेहऱ्यावर चमक आणि तजेलता येते.

* टॉमेटोच्या रसाला प्यायल्याने रक्त स्वच्छ होतं आणि चेहरा चमकतो.


* टॉमेटो रस नियमितपणे प्यायल्याने चेहऱ्यावर तेज येतो.

वजन कमी करतो टोमॅटो (Tomato Also Reduce Weight)

तुम्हाला माहीत आहे का, टोमॅटोचं सेवन वाढत्या वजनाला आटोक्यात आणू शकतं. खरंतर यामध्ये खूप कमी प्रमाणात चरबीसोबतच जीरो कॉलेस्टॉल असतं, जे वजन वाढू देत नाही. टोमॅटोमधील भरपूर पाणी आणि फायबरमुळे विना कॅलरीज तुमचं पोट भरण्यास मदत होते. त्यामुळे भूक कमी लागते. जर तुम्ही वाढत्या वजनामुळे चिंतीत असाल आणि वजन कमी करण्याबाबत विचार करत असाल तर आजच टोमॅटोचं नियमित सेवन सुरू करा.


टोमॅटोच्या ज्यूसचे फायदे (Benefits Of Tomato Juice)

टोमॅटोमध्ये पाणी आणि फायबरची मात्रा जास्त असते. त्यामुळे पोट लवकर भरतं आणि फॅट्सही वाढत नाहीत. तुम्ही टोमॅटोचं सेवन ज्यूस, सूप, सॅलड कोणत्याही प्रकारे करू शकता. आम्ही तुम्हाला सांगत आहोत टोमॅटोच्या ज्यूसचे फायदे.


1- जर तुम्हाला लो किंवा बैचेन वाटत असेल तर टोमॅटो ज्यूस प्या. कारण टोमॅटोचा ज्यूस शरीराला उर्जा देतो.


2- टोमॅटोचं सेवन हाय बीपीने त्रस्त असलेल्या लोकांसाठीही फायदेशीर आहे. कारण टोमॅटोमध्ये पॉटेशिअम भरपूर प्रमाणात आढळतं. त्यामुळे टोमॅटोचा एक कप ज्यूसही फायदेशीर आहे. हृदयरोगांमध्येही टोमॅटो ज्यूसचं सेवन गुणकारी असतं. पण हा ज्यूस घेण्याआधी एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.  


3- टोमॅटोचा ज्यूस फक्त मोठ्यांनाच नाहीतर लहानग्यांसाठीही फायदेशीर आहे. मुलांच्या मानसिक आणि शारीरिक विकासात यामुळे मदत होते. याशिवाय मुलांच्या पोटात जंत झाल्यास सकाळी रिकाम्या पोटी टोमॅटो ज्यूसमध्ये काळीमिरी घालून दिल्यास फायदा होतो.


4- टोमॅटोमध्ये व्हिटॅमीन ए आणि सी आढळतं, जे डोळ्यांची नजर वाढवण्यास मदत करतं.  याशिवाय टोमॅटोमुळे डोळ्यांना होणारा रांताधळेपणाही कमी होतो. टोमॅटो मोतीबिंदूची वाढही रोखतो

Leave a Reply

Your email address will not be published.