तेलात ही पाने टाकून लावा केस मुळापासून काळे लांब व मजबूत राहतील

फक्त हा उपाय करा केसांच्या सर्व समस्या घरच्या घरी अगदी सहजतेने दूर करा. आज आम्ही तुमच्यासाठी केसांविषयी काही समस्या असतील जसे केस गळणे, केस तुटणे, अकाली काली पांढरे होणे केस कमकुवत होत जाणे. या सर्व समस्या पासून सुटका करून देणारा. असा खूपच सुंदर आणि नॅचरल उपाय आज आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत.

हा उपाय केल्याने केसांची पोत सुधारेल केसांचा रंग टिकून राहील केस गळणार नाहीत केस तुटणार नाहीत. व केस अकाली पांढरे देखील होणार नाहीत. व केसांची वाढ देखील भरभरून होण्यास मदत होणार आहे. हा उपाय एकदम नॅचरल असून याचा कोणताही साईड इफेक्ट न होता.

केसांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. यासाठी तुम्हाला लागणार आहे कोरफड की आपल्या केसांन करीत उपयुक्त आहे. परंतु कोरफड मधड व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन E, व्हिटॅमिन B, व्हिटॅमिन B2, व्हिटॅमिन B6, व्हिटॅमिन B12 तसेच फोलिक ऍसिड, कॅल्शियम, मॅग्नेशियम,

झिंक, आयरण, पोटॅशियम, ही तत्वे भरपूर प्रमाणात आढळतात. आणि म्हणूनच कोरफड ही तुमच्या केसांन साठी वरदान ठरली आहे. प्रथम कोरफड तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आणि त्या पानांचे साईड चे काटे कट करून घ्या. फक्त साईड चे काटेच कट करायचे आहेत कारण आपण त्याच्या सालीचा देखील वापर करणार आहोत.

कारण याच्या सालीत देखील बरेच तत्वे असतात. म्हणून याची साल आपण काढायची नाही. फक्त काटेच काढायची आहेत. आता याचे तुम्हाला लहान लहान तुकडे करून घ्यायचे आहे. तुमच्या केसांच्या लेंथ नुसार तुम्ही कोरफड कमी जास्त घेऊ शकता. आणि मिक्सर च्या भांड्यात एकत्र टाकून घ्या. आता या मध्ये दोन ते 3 कडुलिंबाची पाने टाकायची आहेत.

कडुलिंबाची पाने घेतल्यामुळे फंगल इन्फेक्शन असेल तर ते फंगल इन्फेक्शन निघून जाते. डोक्यात जर खाज येत असेल तर खाज निघून जाते. तसेच उवा किंवा लिखा असतील तर त्या पासून देखील सुटका होण्यास कडुलिंबाची पाने महत्वपूर्ण ठरतात. आणि यासाठी तुम्हाला कडीपत्ता देखील लागणार आहे.

कडीपत्याची पाने प्रथम स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. आणि ही छान वाळवून घ्यायची आहेत. ही तुम्हाला सावलीतच वाळवायची आहेत. ही पणे एकदम कडक वाळवून घ्यायची आहेत जसे की हातानं प्रेस केल्यावर लगेच मोडतील अश्या पद्धतीने. एक लहान वाटी भरून ही पाने तुम्हाला घ्यायची आहेत.

कडीपत्याच्या पाणा मुळे केस सिल्की होतात केसांची वाढ होते. व केसांचा जो नॅचरल कलर आहे तो देखील टिकून राहण्यास मदत होते. हे मिश्रण छान बारीक मिक्सरला वाटून घ्यायचे आहे. यात कोणत्याही प्रकारे पाणी न टाकता तुम्हाला वाटून घ्यायचे आहे. हे मिश्रण तयार झाल्यावर यात तुम्ही जे तेल वापरता त्या तेलाचा एक चमचा भरून वापर करायचा आहे.

तुम्ही यासाठी आळशीचे तेल खोबरेल तेल किंवा तिळाचे तेल देखील वापरू शकता. आता हे तयार झालेलं मिश्रण केसांच्या स्काल्प पासून ते केसांच्या टोका पर्यंत छान लावून घ्यायचे आहे. आणि दोन तासाने तुम्ही जे प्रोडकट्स वापरता त्याने तुमचे केस धुवून घ्यायचे आहेत. आणि केस धुताना फक्त कोमट पाण्याचाच वापर करायचा आहे.

यामुळे तुमच्या केसांच्या सर्व समस्या निघून जाण्यास मदत होते. आणि हा उपाय तुम्ही आठवड्यातुन किमान तीन दिवस तरी करत चला. असे जर तुम्ही एक महिना केले तरी देखील तुमच्या केसांची पोत सुधारेल. फंगल इन्फेक्शन निघून जाईल. केसांचा नॅचरल कलर आहे तो येण्यास सुरुवात होईल.

म्हणजेच केस दाट काळेभोर लांब सडक होतील आणि एक महिन्या नंतर तुम्ही हा उपाय आठवड्यातुन एक दिवस केला तरी चालेल. पुढे पंधरा दिवसातून एक वेळेस महिन्यातून एक वेळेस केला तरी चालेल. अश्याने तुमच्या केसांच्या सर्व समस्या निघून जातील. व तुम्हाला केसांची समस्या परत कधीच होणार नाहीत.

आणि ज्यावेळेस तुम्ही हे लावणार आहेत त्याच वेळेस तुम्हाला हे मिश्रण तयार करायचे आहे. एकाच वेळेस जास्त मिश्रण तयार करून ठेवू नये. कडीपत्याची पाने तुम्ही जास्त प्रमाणात वाळवून ठेवू शकता. आणि हा उपाय तुम्ही रात्री झोपताना देखील करू शकता.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.