लक्ष्मी देवीच्या मूर्ती बद्दल हे जाणून घ्या, सगळी संकटं होतील दूर…

देवी लक्ष्मी धन-धान्य, सुख-समृद्धीचं प्रतिक आहे. प्रत्येक जणाला आपल्या घरावर लक्ष्मीची कृपा असावी, असं वाटतं. मात्र अनेकदा लक्ष्मी देवीची स्थापना करतांना होणारी क्षुल्लक चू क नुक सानदायक ठरू शकते.

आपल्या घरात देवी लक्ष्मीची मूर्ती आणली की देवीची आपल्यावर कृपा होईल, असं अनेकांना वाटतं. मात्र फक्त देवी घरात आणल्यानं किंवा देवीची पूजा केल्यानं उपयोग नाही, तर लक्ष्मी देवीची योग्य ठिकाणी स्थापना करणंही खूप आवश्यक असतं.

देवी लक्ष्मीची प्रतिमा जर योग्य दिशा आणि योग्य पद्धतीनं ठेवली नाही, तर त्याचा फायदा नाही तर नुक सान जास्त होऊ शकतो. अशाप्रकारची छोटीशी चूक नकळत लोक करतात.

देवी लक्ष्मीची आपल्या देवघरात स्थापना करण्यापूर्वी त्याची योग्य दिशा माहिती असणं खूप गरजेचं आहे. सोबतच देवी लक्ष्मीसोबत कोणत्या देवतेची पूजा करावी हे पण महत्त्वाचं आहे.

साधारणपणे देवी लक्ष्मीसोबत गणेशाची पूजा केली जाते. मात्र याबद्दलची सर्व योग्य माहिती असणं गरजेचं आहे, कारण आपली लहान चूक आपल्याला लक्ष्मीच्या कृपेपासून दूर करू शकते.

तर जाणून घ्या देवी लक्ष्मीची कृपा मिळविण्यासाठी आपल्या देवघरात देवीची स्थापना कशी करावी ते.

देवी लक्ष्मीला नेहमी भगवान विष्णू सोबत ठेवावं

अनेक घरांमध्ये देवी लक्ष्मी स्थापना गणपती बाप्पासोबत केली जाते, मात्र हे योग्य नाहीये. देवी लक्ष्मीची फक्त दिवाळीच्या पूजनावेळीच गणेशाबरोबर मूर्ती स्थापन करावी.

मात्र इतर दिवशी देवी लक्ष्मीची पूजा ही भगवान विष्णू सोबत करावी. देवी लक्ष्मी भगवान विष्णूची पत्नी आहे, म्हणून त्यांची मूर्ती सोबत असावी.

लक्ष्मीची उभी मूर्ती घरी आणू नये

घरात पूजा करण्यासाठी देवी लक्ष्मीची प्रतिमा ही उभी कधीच आणू नये. उभ्या लक्ष्मीची पूजा गृहस्थाश्रमातील लोकांनी करु नये.

घरात देवी लक्ष्मीची बसलेली मूर्ती ठेवावी. शास्त्रानुसार उभ्या स्थितीतील मूर्ती ही चालण्याच्या स्थितीतील असते आणि ती एका ठिकाणी जास्त वेळ थांबत नाही. त्यामुळे घरी देवी लक्ष्मीची बैठी मूर्ती ठेवावी.

घुबडावर बसलेली देवी लक्ष्मीची प्रतिमा घरी आणू नये

देवी लक्ष्मीचं वाहन घुबड असतं. मात्र, घुबडावर विराजमान असलेली देवीची प्रतिमा घरात आणू नये. कारण वाहनावर बसून देवी चालत असते आणि घरात स्थिर राहत नाही. असं याकरिता होतं, कारण घुबड चंचल असतो आणि कधीच एका स्थानावर थांबत नाही.

भितींपासून दूर ठेवा देवीची प्रतिमा

देवी लक्ष्मीची प्रतिमा भितींपासून दूर ठेवावी. अनेक जण भितींला टेकवून देवीची स्थापना करतात. मात्र, त्यात अंतर असणं आवश्यक आहे. कारण यात वास्तुदोषाचा संबंध आहे.

या दिशेला ठेवा देवीची प्रतिमा

देवी लक्ष्मीच्या प्रतिमेचं मुख नेहमी उत्तरेला असावं. हे शुभ असतं.

एकाहून अधिक मूर्ती ठेवू नका

घरात देवी लक्ष्मीची एकाहून अधिक मूर्ती ठेवू नये. असं जर तुम्ही केलं तर देवीची कृपा होणार नाही.

वरील लहान-लहान पण महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देवीच्या स्थापना करतांना अवश्य लक्ष द्यावं. खासकरून जेव्हा आपण घरात देवीची स्थापना करत असाल तेव्हा. देवीची कृपा आपल्या सर्वांवर होवो.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा तुमच्या एका शेयर ने या नवरात्रीत त्यांचं कल्याण होऊ शकतं.

अशाच माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published.