थंडी मध्ये एक चमचा मध खाल्ल्याने होतात हे फायदे

मधाला एक नैसर्गिक औषध असे म्हणतात. तसेच मध खाणे हे कायमच फायदेशीर असते. 
दररोज दोन चमचे मध खाल्ल्याने आपले शरीर निरोगी, उर्जवान, स्वस्थ राहते,तसेच थंडीमध्ये देखील मध खाणे खुप फायदेशीर आहे. थंडी मध्ये हवेत गारवा येतो तसेच वातावरणात आणि शरिरात होणारे बदल यासाठी मध हे अतिशय उपयुक्त ठरते.

मधामध्ये काय असते?
मधामध्ये फ्रुक्टोज,ग्लुकोज,सुक्रोज,माल्टोज अशा सर्व प्रकारच्या महत्वाच्या आणि आवश्यक शर्कारा असतात. या सर्वांमध्ये मिळुन 75% साखर असते. तसेच मधामध्ये एन्जाइम,अमीनो एसिड,प्रोटीन,एल्ब्युमिन,कार्बोहायड्रेट्स,आयोडीन,लोह,सोडियम,फॉस्फरस,कॅल्शियम,क्लोरीन इत्यादी गुणकारी तत्व असतात त्यामुळे मधाला गुणाकरी असे देखील म्हणतात.

मध खाल्ल्यामुळे होणारे फायदे-

● मध खाल्ल्या मुळे आपली रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. थंडी मध्ये सर्दी खोकल्याचा त्रास हा सर्वांनाच होतो. मात्र जर तुमची रोग प्रतिकारक शक्ती चांगली असेल तर असे व्हायरल आजार पटकन होत नाहीत.

● जर तुम्ही खाज,खरूज यासारख्या त्वचेसंबंधीत आजारांनी त्रस्त असाल तर, ग्लासभर पाण्यात एक चमचा मध घालून सकाळी रिकाम्या पोटी प्यावे. त्यामुळे या त्वचा रोगांचा त्रास कमी होतो.

● थंडीमध्ये आपल्याला लवकर भूक लागत नाही त्यामुळे भरपूर भूक लागण्यासाठी मध उपयोगी ठरतो.

● मध खाल्ल्याने आपल्याला ताजेतवाने राहण्यास मदत होते,तसेच आपली पाचन शक्ती देखील सुधारते.

● रोज पाण्यात मध टाकून ते पाणी पिल्याने आपले पोट हलके राहते.

● तसेच कफ आणि दम्यासाठी मध हा एक खूप रामबाण उपाय आहे. यामुळे कफ आणि दमा दूर होतो. व आल्यासह मध घेतल्यास खोकला ही थांबतो.

● उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लॅड प्रेशरमध्ये असणार्यांना देखील मध खूप उपयोगी ठरते.

● मध खाल्ल्याने आपल्या शरीरातील रक्त शुद्ध होते.

● हृदय मजबूत करण्यासाठी आणि हृदय योग्य पद्धतीने कार्य करण्यासाठी आणि हृदय रोगापासून वाचण्यासाठी मध खाल्ले पाहिजे.

● दररोज मध खाल्याने आपले आरोग्य चांगले राहते आणि शरीर स्थूल होत नाही तसेच मेंदूतील कमकुवतपणा देखील दूर होतो.

● पिकलेल्या आंब्याच्या रसात मध टाकून खाल्ल्यास पिल्यास कावीळ कमी होण्यासाठी मदत होते.

● चेहऱ्या वरील कोरडेपणा दूर करण्यासाठी मध,दुधाची साय आणि बेसन यांचे मिश्रण लावल्यास चेहरा चमकदार आणि मुलायम होतो.

● दररोज मधाचे सेवन केल्याने किडनी आणि आतडे चांगले राहतात.

● मधाचे सेवन केल्याने चेहर्यावरील पिंपल्स कमी होतात. तसेच तुम्ही गुलाब पाणी, लिंबू आणि मध एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यास फायदा होतो.

● मधा मध्ये अँटी-बॅक्टे-रियल आणि एन्टी मायक्रो-बियल गुण असतात. मध हे बॅक्टेरियाची होणारी वाढ रोखते. त्याशिवाय जखम, कापणे आणि भाजलेल्या ठिकाणी किवा जखमेला लावल्यास फायदा होतो.

● मध हे जखमेला स्वच्छ करणे, दुर्गंधी आणि दुखण्याला दूर करणे आणि लवकर बरी करण्यात उपयोगी ठरते.

● भाजलेल्या त्वचेचा उपचार करण्यात मध मदत करते. एक्झिमा, त्वचा सुजणे आणि इतर विकारांध्ये देखील मध प्रभावशाली आहे.

● टॉमॅटोच्या किंवा संत्र्याच्या रसात एक चमचा मध टाकून दररोज घेतल्यास अपचन, बद्धकोष्ठचा त्रास दूर होतो.

सोर्स-इंटरनेट

पोस्ट आवडली असेल तर मित्रमैत्रिणींसोबत शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published.