या उपायांनी केस होतील लांबसडक आणि काळेभोर, एकदा नक्की करून पहा

व्हिटामि न ई आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. नैसर्गिक वस्तूंमध्ये व्हिटामि न ई भरपूर प्रमाणात असते. आज जाऊन घेऊयात कोणत्या पदार्थामध्ये व्हिटॅमि न ई जास्त असते आणि त्याने आपल्या केसांना काय फायदे होतात.

व्हिटामि न ई हे एक असे नैसर्गिक अँटी ऑक्सि डंट आहे ज्यामुळे आपले केस चांगले राहतात आणि त्यांची वा ढ होण्यास मदत करतात. या व्यतिरिक्त व्हिटामि न ई केसांच्या मुळांशी असलेला रक्त प्रवाह वाढवण्यास आणि सुरळीत राहण्यास सुद्धा मदत करतं. केसांच्या मुळाशी रक्तप्रवाह सुरळीत असेल तर केस वाढण्यास मदत होते. यासोबतच केसांची मुळेही मजबूत होतात. एवढंच नाही तर व्हिटामि न ई मुळे केसांमध्ये कोंडा होणे, कोरडेपणा तसेच दोन टोकांच्या समस्या कमी होतात.

जाणून घेऊया कोणत्या गोष्टींमध्ये व्हिटॅमि न ई च प्रमाण सर्वात जास्त असतं.

नारळाचे तेल

नारळाचे तेल हा व्हिटॅमि न ई चा सर्वात स्वस्त असा स्रोत आहे. नारळाच्या तेलामुळे केसांची प्रो टीनची कमतरता भरून निघते. त्यामुळे केस सुंदर आणि मजबूत बनतात.

नारळाच्या तेलाचा उपयोग कसा कराल?

दोन चमचे नारळाचे तेल घेऊन ते हलकेसे गरम करून घ्यावे. यात 2-3 थेंब टी ट्री ऑइल चे थेंब मिसळा. आणि तयार झालेलं तेल केसांच्या मुळाशी लावा. 3 ते 5 मिनिटं हलक्या हाताने केसांचा मसाज करा. नंतर केसांना टॉवेल गुंडाळून ठेवा. त्यानंतर शाम्पू ने केस धुवा. नियमित असं केल्याने केसां ची वाढ चांगली होते आणि केस मजबूत होण्यास मदत होते.

कडुनिंब

कोंडा असेल तर के स गळणे आणि त्यांची वाढ न होणे ही मोठी समस्या असू शकते. कोंडा दूर करण्यासाठी कडुनिंबाचा वापर फायदेशीर ठरतो. कडुनिंब कोंडा दूर करण्यासोबतच केसांच्या इतर समस्याही दूर करतो.

कडुनिंबाचा वापर कसा करावा?

2 चमचे कडुनिंबाची पावडर घ्यावी, त्याच्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून थोडी घट्ट अशी पेस्ट बनवावी. ही पेस्ट केसांच्या मुळाशी लावून ठेवावी. 30 मिनीटांनी शाम्पू ने केस धुवून घ्यावेत.

रिठा

केसांच्या देखभालीसाठी आयुर्वेदात रिठाचा वापर सर्वाधिक सांगितलं गेला आहे. रिठा वापरल्यामुळे केसां ची मुळे मजबूत होतात, केसांना मोठ्या प्रमाणात पोषण मिळते, त्यामुळे केसांची वाढ योग्य होते आणि केस गळती कमी होते. रिठा सोबत आवळा आणि शिकाकाई वापरली तर सोने पे सुहागा.

असा करा रिठा, आवळा आणि शिकाकाई चा वापर

1 चमचा रिठा पावडर, 1 चमचा शिकाकाई पावडर, 1 चमचा आवळा पावडर, एक अंडे आणि मध अर्धा चमचा घ्या. एका वाटीत हे सर्व पदार्थ मिसळून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट आपल्या केसांना लावून 5 ते 10 मिनिटे केसां ना मसाज करा. त्यानंतर 25 ते 30 मिनिटांनी थंड पाण्याने केस धुवून घ्या. हा उपाय नियमित केल्याने केसां ची वाढ होऊन केसां ना एक वेगळीच चमक येईल.

ऍवोकॅडो चा वापर

ऍवोकॅडो हा व्हिटॅमि न ई चा खूप मोठा स्रोत आहे. यामुळे केसां ची गळती कमी होऊन के स घनदाट आणि मजबूत होतात.

ऍवोकॅडो चा वापर कसा कराल?

ऍवोकॅडो चा एक छोटा तुकडा घेऊन वाटीत त्याचा लगदा बनवा. त्याच्यात नारळाचे तेल घालून त्याच मिश्रण बनवा. तयार झालेलं मिश्रण केसांच्या मुळाशी लावून हलक्या हाताने केसांची मालिश करा. 30 मिनिटे ठेवा आणि नंतर शाम्पू ने केस धुवून घ्या. नियमित हा उपाय केल्याने केसां ची वाढ मोठ्या प्रमाणात होईल.

बदामाचे तेल

ऍवोकॅडो प्रमाणेच बदामाच्या तेलात व्हिटॅमि न ई चं प्रमाण जास्त असतं. बदाम तेलामुळे केसांची मुळे मजबूत होतात. केस चमकदार होण्यास बदाम तेल मदत करते.

असं वापरा बदाम तेल

2 चमचे बदाम तेल घेऊन त्याच्यात एक चमचा जोजोबा ऑइल मिक्स करा. तयार झालेलं तेल केसांच्या मुळाशी लावा. 30 मिनिटांनी शाम्पू करून धुवून घ्या. केस मजबुत आणि लांब सडक होतील.

माहिती आवडली असेल तर शेयर करायला विसरु नका आणि अशाच इतर घरगुती उपायांसाठी आताच आम्हाला लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published.